Blog No.2023/247 Date:-23rd , Sept, 2023. मित्रांनो, काल मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं की,इतक्यात माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झालं. मला जगाकडे पहाण्याची नवी दृष्टी मिळाली.मला सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या.त्या सर्वांचे मनपूर्वक आभार.पण गणेश चतुर्थी पासून नियमित ब्लॉग लिहिण्याचे प्रोत्साहन आणि त्यासाठी ही नवी दृष्टी यशस्वीपणे देण्याचं काम करणारे तरुण आश्वासक आणि कुशल नेत्रतज्ञ,डॉ.अनुप सदाफळे आणि त्यांच्या या कार्यात सहभागी असलेले त्यांचे सहकारी जसे की हॉस्पिटलचे रिसेप्शनिस्ट,माझी डोळ्याची प्राथमिक तपासणी करणारे तज्ञगण,डॉ. सदाफळे यांचे डोळ्यांच्या शस्त्रकियेसाठी सोबत असलेले सहकारी, पहिल्यापासून काल सर्जरी पश्चात तपासणीसाठी मदत करणारी कौंन्सीलर जस्मिन आणि त्यांचे फर्ग्युसन कॉलेज रोड,शिवाजी नगर,पुणे येथील एएसजी आय हॉस्पिटल ( ASG Eye Hospital ) या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होतीच, पण त्यासोबत माझ्या सारखेच ज्या कुणाला मोतीबिंदू झाला आहे.अशा सर्व माझ्या पुणे आणि आसपासच्या मित्रांना आणि त्या...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .