Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

ASG Eye Hospital एएसजी आय हॉस्पिटल नेत्रसुखद अनुभव

 Blog No.2023/247

Date:-23rd, Sept, 2023.

 

मित्रांनो,

            काल मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं की,इतक्यात माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झालं. मला जगाकडे पहाण्याची नवी दृष्टी मिळाली.मला सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या.त्या सर्वांचे मनपूर्वक आभार.पण गणेश चतुर्थी पासून नियमित ब्लॉग लिहिण्याचे प्रोत्साहन आणि त्यासाठी  ही नवी दृष्टी यशस्वीपणे देण्याचं काम करणारे तरुण आश्वासक आणि कुशल नेत्रतज्ञ,डॉ.अनुप सदाफळे आणि त्यांच्या या कार्यात सहभागी असलेले त्यांचे सहकारी जसे की हॉस्पिटलचे रिसेप्शनिस्ट,माझी डोळ्याची प्राथमिक तपासणी करणारे तज्ञगण,डॉ. सदाफळे यांचे डोळ्यांच्या शस्त्रकियेसाठी सोबत असलेले सहकारी, पहिल्यापासून काल सर्जरी पश्चात तपासणीसाठी मदत करणारी कौंन्सीलर जस्मिन आणि त्यांचे फर्ग्युसन कॉलेज रोड,शिवाजी नगर,पुणे येथील एएसजी आय हॉस्पिटल (ASG Eye Hospital) या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होतीच, पण त्यासोबत माझ्या सारखेच ज्या कुणाला मोतीबिंदू झाला आहे.अशा सर्व माझ्या पुणे आणि आसपासच्या मित्रांना आणि त्यांच्या संपर्कातील  लोकांना या चांगल्या आय हॉस्पिटलची माहिती व्हावी आणि त्या माहितीचा त्यांना फायदा व्हावा या उद्देश्याने हा आजचा ब्लॉग.    

एएसजी आय हॉस्पिटल (ASG Eye Hospital)

            पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड येथे हे आय हॉस्पिटल आहे. झालं असं की मला 2-3 नेत्रतज्ञांनी असं सुचविलं होतं की मला मोतीबिंदू झाला आहे.पण माझ्या मनाची ऑपरेशन करण्यासाठी तयारी होतं नव्हती. माझ्या घराजवळ किंवा घरापासून खराडी वगैरेला आय हॉस्पिटल आहेत.पण मी ब्लॉग लिहीत असल्याने गूगलवर मला नेहमीच सर्च करण्याचं काम करावं लागतं आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टीचं गूगल रेटिंग पहायचं आणि मगच पुढे पाऊल टाकायचं हे ठरून गेलयं. म्हणून मी एएसजी आय हॉस्पिटल (ASG Eye Hospital) चं गूगल रेटिंग  बघितलं जे 4.9/5 एवढे आहे.


            मी साधारणतः 23 ऑगस्ट 2023 ला एएसजी आय हॉस्पिटलला जाऊन पोहोचलो. अतिशय भव्य असे हे हॉस्पिटल आहे, जिथे फक्त डोळेविषयक पेशंट तपासले जातात.हॉस्पिटलचा परिसर हा अतिशय नेत्रसुखद असाच आहे. आत अतिशय स्वच्छता आणि शिस्तबद्ध कामाचा मला प्रत्यय आला.हॉस्पिटल मध्ये बसायची पर्याप्त व्यवस्था आहे.पेशंट उभे आहेत हे दृश्य अगदी गर्दी असतांना सुद्धा नजरेस पडत नाही.हा एक नेत्रसुखद अनुभव.हॉस्पिटलमध्ये आत गेल्यावर रिसेप्शनिस्टने सगळी माहिती घेतली,थोड्या वेळ बसायला सांगितलं. अवघ्या दहा पंधरा मिनिटांत माझी फाइल पुढील तपासण्यासाठी पोहोचली  आणि माझ्या सुरुवातीच्या काही तपासण्या झाल्या.त्या नंतर माझी फाइल डॉ.अनुप सदाफळे यांच्याकडे पोहोचली. डॉ.अनुप सदाफळे हे एक तरुण नेत्रतज्ञ, हसतमुख,प्रसन्न,आश्वासक चेहरा असलेले,त्यांनी माझ्या डोळ्यांची तपासणी केली आणि त्यांनी डाव्या डोळ्यांची शस्त्रकिया आधी करावी लागेल.असे निदान केले.माझ्या मनातील शंकाचे त्यांनी फार परिणामकारक निरसन केले. मी जो शस्त्रक्रियेला तयार नव्हतो, तो तयार झालो.

            मग माझी फाइल कौंन्सीलर जस्मिनकडे पोहोचली. तिने मला सर्जरी नंतर लेन्स जे बसवावे लागतात ते कोणकोणते आहेत. प्रत्येक लेन्स सोबत शस्त्रक्रिया करण्याचा खर्च किती ते समजावून सांगितले. हेल्थ इन्शुरेंस कुठला आहे हे विचारून त्या बाबत व्यवस्थित माहिती दिली. मला त्या आधी काही ब्लड रिपोर्ट जसे ब्लड शुगर, एचआयव्ही, हेपॅटीटिसच्या तपासण्या, ईसीजी आणि एमडीचे फिटनेस सर्टिफिकेट सांगितले. हे सर्व केल्यानंतर शस्त्रक्रियेचा दिवस ठरविण्यासाठी हॉस्पिटलला गेलो.

6 सप्टेंबरला शस्त्रक्रियेसाठी 9.00 वाजता हॉस्पिटलला पोहोचलो. शस्त्रक्रिया म्हटल्यावर अगदी लेसरनी होईल म्हटलं तरी थोडी धाकधूक होतेच. डॉ. सदाफळे यांनी मात्र मला धीर दिला. अगदी पाचच मिनिटांत मी तुम्हाला मोकळं करतो, विश्वास बसेना.नंतर डॉ. सदाफळे यांच्या सहकाऱ्यांनी मला तो पेशंटसाठीचा पांढरा शर्ट घालून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं.मला ऑपरेशनसाठी टेबलवर घेतल्यावर,अगदी काही मिनिटांत माझं ऑपरेशन सुरू झालं. अवघ्या 2-3 मिनिटातच डॉ. सदाफळे यांनी मला सांगितलं की मी तुमचा मोतीबिंदु काढून टाकला आहे.मग त्यानंतरच्या 2-3 मिनिटातच डॉ. सदाफळे यांनी मला लेन्स बसविल्या सांगितलं.ऑपरेशन अतिशय छान पार पडल्याचे सांगितले. पुढील 2-4 मिनिटात मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलो. आता बाकी काही गोष्टी होत्या,त्या म्हणजे माझा इन्शुरेंसचा क्लेम जो हॉस्पिटलने आधीच भरून पाठविला होता आणि त्याचं approval मला आलं होतं. त्या क्लेम वगैरेचे काम हॉस्पिटलनेच केले, मला एकही बिल गोळा करणे वगैरे करावे लागले नाही.डोळ्यावर कुठलीही काळी किंवा हिरवी पट्टी नव्हती,न गॉगल,फक्त डोळ्याला हात लागू नये म्हणून एक चष्मा दिला आहे.ऑपरेशन नंतर 10 दिवस डोक्यावरून स्नान करायचं नाही आणि डोळ्याला हात लावायचा नाही.फक्त याच सूचना डॉ. सदाफळे यांनी मला दिल्या. त्याच प्रमाणे दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन 17 सप्टेंबरला झाले. तेही पहिल्या सारखेच सुरळीत पार पडले. काही ड्रॉपस दिले आहेत.कुठल्याही अतिरिक्त सूचना नव्हत्या. बँकेत नोकरीला असतो तर जॉइन सुद्धा होता आलं असतं. 

सारांश

एएसजी आय हॉस्पिटलला 5 मार्क्स मधून 5 पेक्षा जास्त रेटिंग देता येत नाही. म्हणून माझं 5* रेटिंग.अर्थात प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असू शकतो. मी मला आलेला अनुभव लिहिला आहे आणि ASG चे रेटिंग 4.9 देखिल हेच सुचविते असे मला वाटते. इतकं सुत्रबद्ध कार्य, स्वच्छ आणि नेत्रसुखद परिसर, हॉस्पिटलच्या स्टाफचे उत्तम सहकार्य आणि अगदी सहजतेने डॉ. सदाफळे यांनी केलेली दोन्ही ऑपरेशन्स,माझ्या नेहमीकरता लक्षात राहतील. एक गोष्ट आहे की इतक्या सहज होणाऱ्या शस्त्रक्रियेला शस्त्रक्रिया कां म्हणतात हे मला अजूनही कळलेलं नाही.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे

फोटो सौजन्य@ASG Eye Hospital,Pune    

Comments

  1. Good information for Puneities in particular. The procedures followed by this hospital based on your experience needs to be codified and standardised and to be followed by the medical fraternity. There is also an utmost need about Regulation of rates followed by the medical fraternity, drug manufacturers, the service service providers like chemists, hospital rates, health insurance premium and the 18% GST etc. After the advent of Covid these set of people are behaving like organised criminals. Good blog

    ReplyDelete
  2. Good information. What was the total expenditure for both operations. Since you had a health insurance financials were not that important for you.
    But for those not covered under insurance can you share your expenses

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...