Skip to main content

Posts

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

तुमचा ईको तुम्ही निवडा

  Blog No. 2023/163          Date: 25 th , June 2023.   मित्रांनो             आज कालच्या जगात लोकांना प्रेरणा देणं,प्रोत्साहन देणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचे करिअर झाले आहे.याला कारण जीवनात अनेक कारणांनी येणारी निराशा, वैफल्य. खरं तरं निराशा किंवा वैफल्य यायची कारणे अनेक आहेत. काही अगदी सामान्य कारणे देखिल असतात. कदाचित जीवनापासून आपल्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. किंवा सध्याची जी व्यवस्था आहे, तिला तोंड देण्यास किंवा सामोरे जाण्यास आपण कमी पडतो,सक्षम नाही आहोत.पण एकंदरीत, motivational speaker ना महत्व आले आहे किंवा आपणच ते प्रदान केले आहे.आज आपण एक अशीच गोष्ट बघणार आहोत.ती जीवनाकडे बघायला शिकवते.   आपला ईको स्वतः निवडा                                   एकदा एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन गावाजवळच्या जंगलात फिरायला ग...

एकसमान नागरी संहिता (UCC)

  Blog No. 2023/162          Date: 24 th , June 2023.   मित्रांनो, एकसमान नागरी संहिता ( UCC) हा भारतातील नागरिकांचे वैयक्तिक कायदे तयार करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे , जो सर्व नागरिकांना त्यांचा धर्म , लिंग आणि लैंगिक प्रवृत्ती विचारात न घेता समान रीतीने लागू होतो.सध्या , विविध समुदायांचे वैयक्तिक कायदे त्यांच्या धार्मिक ग्रंथांद्वारे शासित आहेत.देशभरात एकसमान नागरी संहितेची अंमलबजावणी हे भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केलेल्या आश्वासनांपैकी एक आहे. तुम्ही गूगल वर सर्च करा “ Is there any country in the world has different civil codes for its citizen ” त्याचे उत्तर असे येईल , “and even in 21 st century, on a way developing nation, India is one of the nations, which lacs Uniform Civil Code.           प्रास्ताविक भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहितांना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये असे नमूद केले आहे की , राज्य भारताच्या संप...

सर्वांग सुंदर चित्रपट अंगूर

  Blog No. 2023/161          Date: 23 rd , June 2023.   मित्रांनो,             हिन्दी चित्रपटसृष्टी एक काळ असा ही होता की जेव्हा,अॅक्शन चित्रपटांना खूप गर्दी होत असतांना,कॉमेडी चित्रपटांनी देखिल भरपूर मनोरंजन तर केलेच पण धंदा ही जबरदस्त केला.चुपके चुपके,गोलमाल,चष्मेबद्दूर,अंगूर,पती पत्नी और वो इत्यादि.मुख्य म्हणजे बासू चॅटर्जी किंवा ऋषिकेश मुखर्जी यांच्या सारख्या दिग्दर्शकांचे हे चित्रपट म्हणजे निव्वळ हसवणूक असे.धकाधकीच्या जीवनात एक छानसा विरंगुळा मिळतं असे.आताशा मी चित्रपट विशेष पहात नाही.विनोदी एकही पाहिल्याचं आठवतं नाही किंवा पाहिला असेल तर आठवतं नाही,कारण लक्षात ठेवण्यासारखं विशेष नसतं.”नवीन गोष्टींना तुम्ही नांव ठेवू लागलात की समजायचं की तुम्ही म्हातारे झालात.” असं व्हॉटस् अप यूनिवर्सिटीवर ऐकल्याचं आठवतं.पण असं काही नाही,कारण नवीन मुलांना विचारलं की इतक्यातला कॉमेडी चित्रपट कुठला म्हटलं की तेही थोड्या वेळ विचारात पडतात.तर मला आज गुलजार यांचा “अंगूर” आठवला. त्यावर आजचा ब्लॉग.   ...

आहार-विचार पपई

  Blog No. 2023/160          Date: 22 nd , June 2023.   मित्रांनो,             आज गुरुवार आहार-विचारचा हा चौथा ब्लॉग.आज पर्यन्त आपण अननस,आंबा आणि केळी या फळांची सविस्तर माहिती जाणून घेतली.आजच्या आहार-विचारमधे आपण पपई या फळाची सविस्तर माहिती घेणार आहोत.   प्रास्ताविक             पपई हे देखिल एक उष्णकटिबंधीय फळ आहे.जे वैज्ञानिकदृष्ट्या कॅरीका पपई म्हणून ओळखले जाते .पपई हे एक गोड फळ असले तरी त्याचा गोडवा तेवढा नाही जेवढा आंब्याचा किंवा द्राक्षाचा असतो. Moderate असा गोडपणा यात असतो.हे फळ अगदी ताजेतवाने असते आणि सेवनाने ताजेतवाने वाटते.पपईचे मूळ मध्य आणि दक्षिण अमेरिकेचे , परंतु आता जगातील इतर अनेक भागांमध्ये लागवड केली जाते.पण आपण खातो ती देशी पपई आणि विदेशी पपई यात आपल्याला चांगलाच फरक जाणवतो. याशिवाय seedless आणि with seed असे दोन प्रकार आढळून येतात. पपई केवळ स्वादिष्टच नाही तर त्यातील अंगभूत गुणधर्मामुळे अनेक आरोग्य फाय...

योग आणि चॅटजीपीटी

  Blog No. 2023/15 9         Date: 21 st , June 2023 मित्रांनो,             आज 21 जून,2023 अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिवस.तुम्हाला सगळ्यांना योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा.आज वर्तमानपत्र, टी.व्ही. आणि अर्थात सोशल मीडियावर सर्वत्र योग दिनाबद्दल बरेच काही लिहून झाले आहे आणि तुमचे वाचून झाले आहे.म्हणून मी हा विषय टाळला.पण नुकताच एक विडियो पहात असतांना आज हेल्थ सेक्टर मधील तज्ञ देखिल ChatGPT सारख्या AI च्या माध्यमांचा उपयोग आजाराचे निदान करण्यासाठी करू लागलेत ऐकलं. आणि तुम्हाला काही तरी वेगळं सादर करावा म्हणून आजचा हा दूसरा ब्लॉग.   प्रास्ताविक             मी   ChatGPT वर लॉगिन केले आणि त्याला एक प्रश्न विचारला. योगाबद्दल तुमचे मत काय आहे ? ते तुमच्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे ? क्षणाचा विचार करीत ChatGPT उत्तरले.                  योग ही एक सर्वांगीण...