Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

सर्वांग सुंदर चित्रपट अंगूर

 Blog No. 2023/161       

Date: 23rd, June 2023.

 

मित्रांनो,

            हिन्दी चित्रपटसृष्टी एक काळ असा ही होता की जेव्हा,अॅक्शन चित्रपटांना खूप गर्दी होत असतांना,कॉमेडी चित्रपटांनी देखिल भरपूर मनोरंजन तर केलेच पण धंदा ही जबरदस्त केला.चुपके चुपके,गोलमाल,चष्मेबद्दूर,अंगूर,पती पत्नी और वो इत्यादि.मुख्य म्हणजे बासू चॅटर्जी किंवा ऋषिकेश मुखर्जी यांच्या सारख्या दिग्दर्शकांचे हे चित्रपट म्हणजे निव्वळ हसवणूक असे.धकाधकीच्या जीवनात एक छानसा विरंगुळा मिळतं असे.आताशा मी चित्रपट विशेष पहात नाही.विनोदी एकही पाहिल्याचं आठवतं नाही किंवा पाहिला असेल तर आठवतं नाही,कारण लक्षात ठेवण्यासारखं विशेष नसतं.”नवीन गोष्टींना तुम्ही नांव ठेवू लागलात की समजायचं की तुम्ही म्हातारे झालात.” असं व्हॉटस् अप यूनिवर्सिटीवर ऐकल्याचं आठवतं.पण असं काही नाही,कारण नवीन मुलांना विचारलं की इतक्यातला कॉमेडी चित्रपट कुठला म्हटलं की तेही थोड्या वेळ विचारात पडतात.तर मला आज गुलजार यांचा “अंगूर” आठवला. त्यावर आजचा ब्लॉग. 

प्रास्ताविक

            सुप्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांनी 1982 ला शेक्सपियरच्या “कॉमेडी ऑफ एररस्” या नाटकावर आधारित “अंगूर” हा चित्रपट प्रकाशित केला.यात संवेदनशील अभिनेता संजीवकुमार आणि देवेन वर्मा हे दोघेही दुहेरी भूमिकेत होते.त्यांच्या सोबतीला मौशुमी चॅटर्जी, दीप्ती नवल, अरुणा इराणी, उत्पल दत्त,युनूस परवेज,सी.एस.दुबे हे कलाकार होते. राहुल देव बर्मन यांचे संगीत होते. 

कथानक

            “अंगूर” चे कथानक हे राज तिलक (उत्पल दत्त) यांच्या परिवाराभोवती फिरते.राज तिलक यांना दोन जुळी मुले असतात.दोन्ही मुलांचे नांव अशोक (संजीवकुमार) ठेवण्यात येते.एक दिवस राज तिलक,त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले बाहेर गेलेले असतांना राज तिलक यांना आणखी एक जुळे सापडते.ते या जुळ्या भावंडांचा स्वीकार करुन त्यांना घरी आणतात.त्या दोघांचे नांव बहादूर (देवेन वर्मा) ठेवतात.पुढे एका अपघातात या परिवाराची विचित्र फाळणी होते.वडिलांसोबत दोन मुलं एक अशोक आणि एक बहादूर आणि आई सोबत एक अशोक आणि एक बहादूर असे एकमेकांपासून दूर होतात.यातील एका अशोकचे लग्न सुधाशी (मौशुमी चॅटर्जी) होते आणि बहादूरचे लग्न प्रेमाशी (अरुणा इराणी) शी होते.  

            दूसऱ्या अशोकला डिटेक्टिव कादंबऱ्या आवडतात आणि त्याचा सोबती बहादूरला भांग आवडत असते.कर्मधर्म संयोगाने दोन्ही जोड्या एकाच शहरात येतात.त्या नंतर जोडया अदलाबदली होणे, आणि खूप साऱ्या प्रासंगिक विनोदांनी भरलेला हा चित्रपट पुनः पुनः पहावा असं वाटतं.यातील मौशुमी चॅटर्जीसाठी अशोकने बनवायला दिलेला दागिना,सोनाराने दुसऱ्या अशोकच्या हाती सोपवणे.एका बहादूरने दोरी आणण्यासाठी जाणं आणि दुकानदाराने बोलावून ती दुसऱ्याच बहादूरला सोपविणे.डिटेक्टिवची आवड असणाऱ्या संजीवकुमारचे सारखे “गॅंगवाला लगता है” असे म्हणणे देखिल विनोद उत्पन्न करुन जाते.अरुणा इराणीचा नवरा बहादूर तिथे नसतांना दूसरा बहादूर तिथे पोहोचणे. त्याच्या तोंडी असलेले “प्रीतम आन मिलो” हे गाणं मनोरंजक आहे. 

सारांश

            “अंगूर” हा एक सर्वांग सुंदर कॉमेडी चित्रपट होता.महत्वाचे म्हणजे हा चित्रपट संजीवकुमार आणि देवेन वर्मा यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांभोवती फिरत असला तरी देखिल तो कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सगळ्या परिवाराने एकत्र बसून बघण्यासारखा हा चित्रपट होता.आर.डी.चे चित्रपटाच्या कथानकाला साजेसे संगीत, खुमासदार संवाद असलेला “अंगूर” मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये सर्वोत्तम असा होता आणि त्या वेळेस रेटिंग वगैरे द्यायची पद्धत असती तर मी या चित्रपटाला नक्कीच 5 पैकी 5 मार्क्स दिले असते.  

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.       

Comments

  1. मीनल ओगले.June 23, 2023 at 9:44 AM

    अतिशय आवडता चित्रपट.संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांनी धमाल उडवून दिली होती.पुनःप्रत्ययाचा अनुभव मिळाला.👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान विनोदी चित्रपट होता.Very nice write up.

    ReplyDelete
  3. हा चित्रपट केंव्हाही , कधीही , कुठेही पहावा . सॅटिस्फाक्शन गैरंटीड . आपल्या प्रभावशाली लिखाणातून जुन्या सोन्याला नवीन झळाळी लाभली आहे .

    ReplyDelete

Post a Comment