ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
Blog No. 2023/17 Dated 20th , January 2024. मित्रांनो, विविध मंदिरे जशी श्रद्धास्थान आहेत. तशी शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांची शाळा ही श्रद्धास्थान असायचे. माझ्या वेळेस तर हे मी अनुभवलं आणि माझ्या मुलांच्या वेळेस देखिल.मुलांचे पालक भेटले की नेहमी तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठल्या शाळेत आहे,इथून सुरुवात होऊन आमच्या मुलांची शाळा कशी चांगली आणि तुमच्या मुलांची कशी वाईट ह्याची चर्चा होतं असे.माझ्या मुलांच्या शाळेला कुणी नावं ठेवलेले त्यांना आवडतं नसे. त्यांची शाळा ही त्यांचे श्रद्धास्थान होते.माझी मुलं शाळेत होती,त्या गोष्टीला सुद्धा आता बरीच वर्षे झाली. शालेय शिक्षण ह्या विषयापासून मी बराच दूर होतो.पण सध्या मी माझ्या पावणे सहा वर्षाच्या नातवाबरोबर आहे.जो सिनीयर केजीला आहे.आजकाल तसेही लोकांचे एकमेकांकडे जाणे येणे कमी झाल्याने,शाळा हा विषय घरातल्या माणसांशिवाय चर्चेत येत नाही.मी सहज हे चेक करायसाठी की आजकालच्या मुलांना शाळेबद्दल तेच वाटते कां? जे कधी काळी मला आणि माझ्या मुलांना वाटायचे.म्हणून मी त् माझ...