Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

ओ.पी.नय्यर

 Blog No. 2023/12

Dated 16th, January 2023

मित्रांनो.

            आज अशा एका ग्रेट व्यक्तीवर मी हा ब्लॉग लिहीत आहे, ज्या व्यक्तीने आपल्या कर्णमधुर संगीताने 30-40 वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. 1950 ते 1970 ही 20 वर्षे त्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ (चांगल्या अर्थाने) घातला. मित्रांनो, त्या व्यक्तीचे नांव ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओ.पी. नय्यर आहे. 16 जानेवरी, 1926 ला आताच्या पाकिस्तानमधे लाहोर येथे त्यांचा जन्म झाला. म्हणजे अजून तीन वर्षांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे. आज त्यांची जयंती.

ओ.पी. नय्यर ह्यांच्याविषयी बरेच काही

            मी जरी सेवानिवृत्ती नंतर लेखन सुरु केले,तरी माझे पहिले प्रेम “संगीत” आहे.ओ.पी. नय्यर ह्यांच्याविषयी मला थोडी जास्त आपुलकी वाटण्याचे कारण ते एक संगीतकार आहेत,एवढेच नसून माझे दैवत स्व. किशोरकुमारला पहिल्यांदा गायक म्हणून 1955 मधे “बाप रे बाप” चित्रपटासाठी ओ.पी. नय्यर ह्यांनी संधी दिली. त्या नंतर या दोघांचा 1958 ला “रागिणी” हा चित्रपट आला  होता. पण त्या नंतर ह्या दोघांच्या मधे तेवढे नाते राहिले नाही.

            ओ.पी. नय्यर ह्यांनी मुख्यत्वे मोहम्मद रफी, आशा भोसले आणि गीता दत्त ह्यांच्या सोबत अधिक गाणी केली. आश्चर्य म्हणजे त्यांनी लता मंगेशकर ह्यांच्या सोबत गाणी केली नाहीत. एक तालबद्ध् संगीत हे त्यांचे वैशिष्ठ. 1958 मधे त्यांना “नया दौर” ह्या चित्रपटातील गाण्यांसाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. 1949 ला ‘कनीज’ ह्या चित्रपटास त्यांचे पार्श्वसंगीत होते. 1952 ला ‘आसमान’ ह्या चित्रपटास प्रथम त्यांनी पूर्ण संगीतकार म्हणून संगीत दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 75 चित्रपटांना संगीत दिले.त्यांच्या निवडक चित्रपटांमधे “छम छम छम’, ‘बाज’, ‘आरपार’. मिस्टर अँड मिसेस 55’, ‘’भागम भाग’, ‘सी.आय.डी.’ ‘श्रीमती 420’, ‘उस्ताद’, ‘जॉनी वॉकर’, ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’, ‘हावरा ब्रिज’, ‘फागुन', ‘सोने की चुडीया’, ‘एक मुसाफिर एक हसीना’,’फिर वोही दिल लाया हूं’, ‘कश्मीर की कली’, ‘मेरे सनम’, ‘बहारे फिर भी आयेगी’, ‘हमसाया’, ‘एक बार मुसकुरा दो’ ह्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘ये देश है वीर जवानोका’ हे ‘नया दौर’ ह्या चित्रपटातील गीत एक देशभक्ती गीत म्हणून खूप प्रसिद्धीस पावले. ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’ ह्या गीताचा खरे तर ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ह्या चित्रपटात समावेश केला जाणार होता.पण चित्रपटाला अंतिम स्वरूप देतांना ते वगळले गेले.याच गाण्यासाठी आशा भोसले ह्यांना 1975 साली फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. ओ.पी. नय्यर ह्यांनी हिंदी चित्रपटांना संगीत दिलेच,तर त्या बरोबर ‘निरंजनम’ ह्या तेलगू चित्रपटाला संगीत दिले. ‘जिद’ हा ओ.पी. नय्यर यांचा संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. 28 जानेवरी,2007 ला त्यांचे मुंबईत निधन झाले.

ओ.पी. नय्यर ह्यांची निवडक लोकप्रिय गीते

1. आईये मेहेरबां बैठीये जानेजा  2. कभी आर कभी पार लागा तिरे  3.जाइये आप कहाँ जाएंगे ये नजर लौट के फिर आएगी 4. एक परदेसी मेरा दिल ले गया 5. लेके पहला पहला प्यार 6. हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार क्या 7. पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की 8. आप युही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा 9. तू है मेरा प्रेम देवता 10. मांग के साथ तुम्हारा मैंने 11. इशारों इशारों मैं दिल लेने वाले 12. बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी मेरी जिंदगीमे हुजूर आप आए 13. आँखों ही आँखों मे इशारा हो गया 14. तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्हें बनाया 15. जाने कहाँ मेरा जिगर गया जी अभी अभी इधर था किधर गया जी.

ही तर काही निवडक गाणी आहेत. पण अशा अनेक गीतांनी रसिकांना मंत्र मुग्ध करणाऱ्या,ओ.पी. नय्यर यांना  माझी त्यांच्या 97 व्या जयंती निमित्त आदरांजली.        

                                                                                                                       प्रसाद नातु, पुणे 

Comments

  1. नातूजी सुप्रभात.
    O P नय्यर जी से सम्बंधित जानकारी आपने ब्लॉग द्वारा बहुत अच्छी तरह प्रस्तुत की.
    यहाँ वर्धा में हर वर्ष नय्यर जी की याद में 'एक शाम ओ पी नय्यर के नाम' आयोजित किया जाता हैं जिसके आयोजन में हमारे साथी श्री प्रकाश राइटर एवं श्री नायडूजी का सहयोग होता हैं. आज शाम को इसी कड़ी में सार्वजनिक बजाज ग्रंथालय में उक्त कार्यक्रम का आयोजन किया गया हैं.
    आप संगीत के रसिया तो हो ही साथ ही अब ब्लॉग के द्वारा भी हम सभी ज्ञान वर्धन कर रहे हो जिसके लिए धन्यवाद बधाई.
    जय श्री राम 🙏

    ReplyDelete
  2. अनिल जोगळेकर।ओ. पी. नय्यर ह्यांना 97 व्या जयंती निमित्त आदरांजली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...