Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

शाळा श्रद्धास्थान की फॅक्टरी

Blog No. 2023/17 

Dated 20th, January 2024.   



मित्रांनो,

            विविध मंदिरे जशी श्रद्धास्थान आहेत. तशी शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांची शाळा ही श्रद्धास्थान असायचे. माझ्या वेळेस तर हे मी अनुभवलं आणि माझ्या मुलांच्या वेळेस देखिल.मुलांचे पालक भेटले की नेहमी तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठल्या शाळेत आहे,इथून सुरुवात होऊन आमच्या मुलांची शाळा कशी चांगली आणि तुमच्या मुलांची कशी वाईट ह्याची चर्चा होतं असे.माझ्या मुलांच्या शाळेला कुणी नावं ठेवलेले त्यांना आवडतं नसे. त्यांची शाळा ही त्यांचे श्रद्धास्थान होते.माझी मुलं शाळेत होती,त्या गोष्टीला सुद्धा आता बरीच वर्षे झाली. शालेय शिक्षण ह्या विषयापासून मी बराच दूर होतो.पण सध्या मी माझ्या पावणे सहा वर्षाच्या नातवाबरोबर आहे.जो सिनीयर केजीला आहे.आजकाल तसेही लोकांचे एकमेकांकडे जाणे येणे कमी झाल्याने,शाळा हा विषय घरातल्या माणसांशिवाय चर्चेत येत नाही.मी सहज हे चेक करायसाठी की आजकालच्या मुलांना शाळेबद्दल तेच वाटते कां? जे कधी काळी मला आणि माझ्या मुलांना वाटायचे.म्हणून मी त् माझ्या नातवाला म्हटले,तुला पुढच्या वर्षी,फर्स्ट स्टँडर्डला मोठ्या,चांगल्या शाळेत जायचे आहे. तसा तो पटकन म्हणाला,आबा माझी ही शाळा पण खुप चांगली आहे.तुम्हाला सांगतो खूप बरं वाटले. त्याला शाळेबद्दल तेच फीलिंग आहे आणि ते पूर्वीपेक्षा आता असणे जास्त जरुरीचे आहे.असे वाटते कारण तो शाळेवर जास्त अवलंबून आहे.पूर्वी आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ होता.वडील नोकरीवर असायचे,पण त्यांची शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आई समर्थपणे घरी असायची. पण आता आई वडील दोघेही नोकरी करतात. त्यांच्याकडे वेळ नाही हे खरं असलं तरी वाढते रहाणीमान पहाता ती काळाची गरज आहे.

शाळांचा दर्जा घसरला आहे कां?

            त्यातच शाळांचा किंवा शिक्षणाचा दर्जा घसरल्याची ओरड ऐकायला मिळते.दहावी किंवा बारावीत 100% मार्क्स मिळविणाऱ्यांची संख्या कमी नाही.पण शिक्षणाचा दर्जा घसरला आहे असे म्हणतात. ह्यात कुठे तरी विरोधाभास वाटतो. माझ्या धाकट्या मुलाला इंजीनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला जेवढी फी होती तेवढी फी माझ्या नातवाला फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि मुख्य म्हणजे ती फी भरायला पालक तयार आहेत. मला कशाचा कुठेच ताळमेळ लागत नव्हता. सहज एक दिवस google वर असेच बघत बसलो होतो आणि एक अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (ASER) हा वाचायला मिळाला. तो याच विषयावरचा आहे.

अन्युअल स्टेटस ऑफ एड्युकेशन रीपोर्ट 2022 काय सांगतो

          अन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (ASER) हा एक असा रीपोर्ट आहे, जो राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या स्थितीचे सर्वेक्षण (survey) करून प्रकाशित केला जातो.2018 नंतर चार वर्षाने 2022 मधे हा रीपोर्ट प्रकाशित करण्यात आला. यात वाचनाच्या अडचणींपासून ते खाजगी शिकवण्यांवरील अवलंबित्व वाढण्यापर्यंतच्या गोष्टीचा समावेश आहे.भारतीय मुलं कोविड-19 साथीच्या आजारानंतर अभ्यासाचा सामना करताना कठीण काळातून जात आहेत,असा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. ASER 2022 च्या अहवालानुसार 2012 च्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत मोठी घसरण झाली आहे. यामध्ये इयत्ता III मधील सुमारे 55% मुले ज्यांना इंग्रजीतील शब्द वाचता आले..परंतु ज्याना वाचता येत नाही अशा मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. बहुतांश राज्यांमधील सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये ही घसरण दिसून येते. त्याचप्रमाणे, मूलभूत गणितीय कौशल्ये देखील 2018 नंतर बहुतेक इयत्तांमध्ये मुलांमध्ये घसरली आहेत,असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे. तथापि, मूलभूत वाचन कौशल्यांच्या तुलनेत ही घसरण कमी आहे,असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यात पुढे असे म्हटले आहे की ग्रामीण भागातही खाजगी शिकवण्यांवर अवलंबून असण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे प्रमाण सतत वाढत आहे ज्यांनी सशुल्क खाजगी शिकवणी वर्ग निवडले आहेत. राष्ट्रीय स्तरावर, ही संख्या 2018 मध्ये 26.4% वरून 2022 मध्ये 30.5% पर्यंत वाढली आहे, असे अहवालात नमूद केले आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.विशेष म्हणजे, शालेय शिक्षण व्यवस्थेवर महामारीचा फटका बसला असूनही, 2022 मध्ये एकूण नोंदणी प्रमाण 98% पर्यंत वाढले आहे, असे अहवालात दिसून आले आहे. 11 ते 14 वयोगटातील मुलींच्या नोंदणीची टक्केवारी देखील गेल्या दशकात अनेक पटींनी वाढली आहे.म्हणजे शिकणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढली आहे ही चांगली गोष्ट आहे पण ज्ञानसमृध्द विद्यार्थांच्या संख्येत वाढ झालेली नाही.ही निश्चितच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.मुलींची पटसंख्या वाढण्याबाबत बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ ही राज्ये मागे आहेत.या शिवाय ह्या रीपोर्ट मधे प्रत्येक राज्याचा वेगळा असा रीपोर्ट देखिल बघायला मिळतो.

ह्याचाच अर्थ हा आहे की वाढलेले मार्क्स हे दर्जा सुधारल्याचे लक्षण नाही. म्हणूनच काल ब्रेकिंग न्यूज होती.चंद्रपूरला पोलिस भरतीच्या 165 जागांसाठी बी.ई,एमबीए असे उच्च शिक्षित उमेदवार आले होते.ह्याचाच अर्थ हा की आजच्या शिक्षणाच्या आधारावर तुम्ही 100% मार्क्स मिळवू शकता, उच्च शिक्षण मिळवू शकता पण तुमच्या शिक्षणाला लायक अशी नोकरी नाही.कारण शाळा, कॉलेज ही फक्त डिग्री मिळवून देण्याचे कारखाने झालेत.तिथून खऱ्या अर्थाने तुम्ही शिकून बाहेर पडलात असा होत नाही.       


                    प्रसाद नातु, पुणे             

Comments

  1. बहुश्रुत आहात तुम्ही

    ReplyDelete
  2. खूप सयुक्तिक लिहिलंय सर

    ReplyDelete
  3. सुंदर विस्लेशन

    ReplyDelete
  4. छान माहिती🙏

    ReplyDelete
  5. Ha blog lihinya mage apan ghetleli mehnat prakarshane janavli. Aplya matanshi sahamat Jari aslo Tari shevati you have to go through the process unless you can dispense with. Ek premal suchana apan sadhyachya shikshan Ani Jeevan paddhatichi keli Asti tar aple vichar Valhalla just avadtil

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...