Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

रंजीश ही सही

 Blog No. 2023/13

Dated 17th, January 2023 



नमस्कार मित्रांनो

    कधी कधी आपल्याला एखादे गाणं म्हणागझल म्हणा खूप आवडतं असतं. आपल्याला गाण्याचे थोडे जरी अंग असेल, तर आपण ते गाणं म्हणून पहातो किंवा नेहमी म्हणत असतो.हिन्दी किंवा मराठी गाणी तशी समजायला सोपी असतात.एखादेच काव्य  दुर्बोध असेल तर ते थोडेसे समजायला कठीण असतं. पण असं फार कमी वेळा होतं.पण हिन्दी गझल मधे कधी कधी उर्दू शब्द असतात आणि ते आपण समजून न घेता,गायकाचा आवाज,चाल,ताल,लय ऐकून त्या गझल मधील त्या शब्दांचा अर्थ समजावून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पण दाद मात्र देत असतो.

    आज आपण एका अशाच गझलचा अर्थ समजावून घेणार आहोत.ती गझल आहे. "रंजीश ही सही दिलही दुखाने के लिए आ" ह्या गझलचा अर्थ समजावून घेऊ या. 

मी गझलच्या दोन ओळी आणि त्या नंतर त्याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.माणसाला जन्माला आल्यावर,जवळपास सगळ्याच गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करावीच लागते.नंतर ती अंगवळणी पडत असते. तर पाहू या. 

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ 

आपल्यात कटूता असो तरी माझ्या हृदयाला दुख द्यावे या साठी ये 

तू जरी मला सोडून  जाणार असशील तरी त्यासाठी तरी पुन्हा ये.

 पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो 

रस्म-ओ-रह-ए-दुनिया को बताने के लिए आ 

आपण पूर्वी एकत्र होतो म्हणून नाही तर

जगाचे जे रिती रिवाज आहेत त्यांचे पालन करण्यासाठी ये.  

 किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम

तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

आपण एकमेकांपासून  विभक्त का झालो ह्याची कारणं मी कुणा कुणाला  सांगू 

तू माझ्यावर नाराज आहेस पण  या समाजासाठी तरी येऊन जा  

अब तक दिल-ए-ख़ुशफ़हम को तुझ से हैं उम्मीदें

ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ ।

माझ्या आशावादी हृदयांस तुझ्या कडून काही अपेक्षा आहेत. 

हे आशा रूपी दिवे विझविण्यासाठी तरी येऊन जा 

 इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम

ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ

खूप कालावधी पासून मी हक्काच्या लोकांना मुकलो.  

हे माझ्या प्रेमा.कमीतकमी मला रडविण्यासाठी तरी ये.

 कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहब्बत का भरम रख

तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ

काही तरी तर माझ्या तुझ्या वरील प्रेमाचा आदर ठेव  

कधी तरी तू माझी समजूत काढायला ये ना 

 एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम

ऐ राहत-ए-जाँ मुझ को तू रुलाने के लिए आ

दु:ख करण्याचे सौभाग्य देखील गेल्या काही काळांत माझ्या नाशिबात नाही 

हे  माझी मनशांति, तू कमीतकमी मला रडविण्यासाठी तरी येऊन जा. 

आता ऐकु या हे गाणे. 



 

           तुम्हाला हे आवडले का , हे कमेन्ट बॉक्स मधे जरूर लिहा,   


प्रसाद नातु .पुणे  

Comments

  1. नातूजी बहुत बढ़िया
    गज़ल के उर्दू या फारसी शब्दों के अर्थ पता चलने पर ग़ज़ल का पूरा आनंद उठा सकते हैं
    धन्यवाद
    रा रा जोशी वर्धा

    ReplyDelete
  2. गझल चा अर्थ सोप्या शब्दात छान सांगितला आहे. अनिल जोगळेकर

    ReplyDelete

Post a Comment