Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

बासरचे ज्ञान सरस्वती मंदिर

Blog No. 2023/14

Dated 18th, January 2023 



        मित्रांनो,

      मध्यंतरी मी एक ब्लॉग मध्यप्रदेशातील मुलताई संदर्भात पोस्ट केला होता. आपल्या आसपासच्या प्रदेशात काही वेगळ्या प्रथा आणि काही वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात.असाच एक वेगळा अनुभव मी 2002 ला राजुरा येथे असतांना घेतला होता. बँकेच्या एका तेलगू ग्राहकाने विचारले की सर तुम्ही आंध्र प्रदेशातील ‘बासर’ बघितले आहे कां? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या नावाचे कुठे गांव आहे, हे मला माहित नव्हते.मी म्हटलं नाही,नाही बघितले.तेव्हा तो म्हणाला एकदा जाऊन या सर.

        बासरसाठी प्रस्थान    

राजुरा हे आंध्र प्रदेशाला लागून असल्याने तेलगू लोकही बरेच होते.त्यातूनच कळले कि इथून 250 कि मी वर गोदावरी नदीच्या काठी बासर नावाचे ठिकाण आहे.तिथे ज्ञान सरस्वतीचे मंदिर आहे.अशा प्रकारचे देशातील हे एकमेव देवस्थान.तिकडे एक प्रथा होती.लहान मुलांचा शिक्षणाचा श्री गणेशा बासरला येऊन करतात.तिथे येऊन श्री गणेशा केला कि मुलं अभ्यासात चांगली होतात,अशी त्यांची धारणा.माझ्या मुलांचा शिक्षणाचा श्री गणेशा आधीच झालेला होता.पण सरस्वतीचे मंदिर आहे.दर्शन घेता येईल.नवीन काही तरी अनुभवायला मिळेल,असा विचार करून,एका रविवारी आम्ही बासरला जायचं ठरविल.250 कि मी म्हणजे 5-5.30 तास लागणार आणि परतायचं त्याच दिवशी. म्हणून सकाळी 5.30 ला निघालो. मुलांना पर्यटनाची आवड अगदी माझ्या सारखीच किंवा माझ्या इतकीच आणि बसने जाण्यापेक्षा स्वतःच्या गाडीने जायचे हा माझा आग्रह आणि मुलेही तेच पसंत करतं. 

राजुरा ते आदिलाबादच्या हायवे पर्यंतचा रस्ता फारच खराब होता.त्यानंतर मात्र नॅशनल हायवे नं 7.तो रस्ता जरा बरा होता.आम्ही राजुऱ्याहून निघालो.एक तासातच महाराष्ट्र राज्य सीमा आली.तशी खडतर प्रवासाला सुरूवात झाली. कोरपना हे महाराष्ट्रातील शेवटचे गांव संपल्यावर जंगल सुरू  होत.तेव्हाची आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणाची सीमा लागल्यावर तेलगू भाषेतील पाट्या सुरू होतात.मग हायवे येईपर्यत कुठलं गाव आहे.हे कळायला थोड अवघडच असायचं. एकदा हायवे लागला की हायसं वाटायचं.आम्ही तेव्हा गमतीने म्हणत असू की रात्री जर प्रवास  केला त्या रोडने,तर केव्हा आंध्र लागला हे झोपेत सुध्दा कळेल.आम्ही  हायवेला लागलो.राष्ट्रीय महामार्ग नं.7 म्हणजे जम्मू ते कन्याकुमारी असा हायवे असल्याने ट्रॅफिक खुप होता.आधी आदिलाबाल लागलं.आदिलाबाद जिनिंग मिल्स साठी प्रसिध्द.महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना कार्यरत असतांना तिथे नेहमीच कापसाला अधिक भाव मिळायचा म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी गुपचुप जाऊन कापूस विकायचे.गुपचुप यासाठी म्हटलं की राज्याबाहेर कापूस विकायला सक्त मनाई होती.आम्ही आदिलाबाद क्रॉस करून बाहेर पडलो.

आदिलाबाद ते निर्मल प्रवास 

            यापुढचं मोठ गांव म्हणजे निर्मल.निर्मल च्या आधी एक घाट लागायचा.डिसेंबर असल्याने सर्व दूर निसर्ग जणू हिरवी शाल ओढून होता.मी ड्राईव करित असल्याने इतरांपेक्षा निसर्गाचे रूप खुप आरामात पहाता येत नसले, तरी मारूती ओमनी मध्ये इतर कारपेक्षा अधिक निसर्ग अनुभवता येतो.थोड्यात वेळांत घाट आला.याला मेहबूब घाटीम्हणत.मेहबूब म्हणजे प्रेमी. हा घाट अनुभवणे हे निसर्ग प्रेमीसाठी वरदानचं.घाटाचा आकार नेकलेस सारखा. पौर्णिमेच्या रात्रीला पहाण्यासारखे असते दृष्य असे लोक सांगत.वळणे अशी की अंगाचा थरकाप उडेल.पूर्ण घाटात सागवानाची झाडं होती.रान फुलं खुप छान दिसत होती.सतत वरवर चढत जाऊन मग एकदम उतरण होती. उतरणीवर उजव्या हाताला हिरवीगार दरी आणि त्यात निळेक्षार नदीचे पाणी होते.हे ईतके सुंदर दिसत होते की,असं वाटून गेले की एखादा छानसा कॅमेरा असता,तर त्या द्दृष्याचेच विविध फोटो काढले असते.उतरण संपल्यावर नदीवरचा पूल लागला.थोड्याच वेळांत निर्मल नावाचं गांव लागलं.गांव बऱ्यापैकी मोठं होत.एक चांगलस हॉटेल पाहून नाश्ता केला.आता हायवे वरील भैसा गांवातून डाव्या हाताला वळायचं होत,बासरसाठी.अजून जवळपास एक तासाचं अंतर कापायचं होत.

 बासरविषयी थोडे काही  

अखेर 11.30 च्या सुमारास आम्ही बासरला पोहोचलो.मंदिर खुप प्रशस्त आहे.साधारणतः दक्षिणेतील मंदिरासारखा कळस. बरीच गर्दी होती.सरस्वतीच्या शेजारीच लक्ष्मीची मुर्ती आहे.इथल्या मंदिरास ज्ञान सरस्वती मंदिर म्हटले जाते.इथे खुप भाविक गण,त्यांच्या मुलांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्याचे आधी,त्यांचा "अक्षर अ

भ्यासम" हा सोहळा साजरा करण्यासाठी येतात.इथे ते आधी पुरोहितांच्या मंत्रोचारात अक्षर गिरवायला शिकतात. त्यानंतर नोट बुक,पुस्तक आणि पेन सरस्वती देवीच्या चरणी अर्पण करतात.सरस्वतीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आतल्या मंडपात आलो.तिथे अविरत मंत्रोचारण चालू होतं.खुप लहान मुलं त्यांच्या पालका सोबत अक्षर गिरवित बसले असल्याचे दिसले.आम्ही थोड्या वेळ थांबून ते सर्व बघत होतो.खरं तर या पूर्वी कधी असं कुठे पाहिलं नव्हतं.छान वाटलं.श्रध्दा बलवान असते.एक आगळे वेगळे काही अनुभवायला मिळाले.मंदिराच्या दक्षिणेकडे आलो.तर गोदावरीचे  पात्र आणि त्यावरील लांबलचक पूलावरून पात्राच्या विस्तिर्णतेची कल्पना येत होती.नदी किनाऱ्यावर विविध सामानाची दुकाने होती.वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या गाड्याही होत्या.तिथे बरेच फोटो काढलेत.मंदिराच्या बाहेर खुप छान बाग आणि जेवणासाठी विशेष जागा होती.तिथे जेवण करून बाहेरुनच सरस्वतीचे दर्शन घेऊन परत यायला निघालो.यावेळेस गाठीशी एक आगळा वेगळा अनुभव घेऊन.राजुरा सुटलं अन नंतर कधी बासरला जाणे झाले नाही.प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हेच खरं.   

                                                                                                                                                                                                                        प्रसाद नातु,पुणे.           


Comments

  1. बासर च्या आठवणी ताज्या झाल्या.

    ReplyDelete
    Replies
    1. Akshar Abhyasam sohala majya mate pratek Jan lakshat thesis. Suruvat ashi sundar jali tar pudhe chanach hoyil

      Delete
    2. खूप मस्त सर! त्या भागात कधी जण झालं तर जायला हवे एकदा

      Delete
  2. छान माहिती 🙏

    ReplyDelete
  3. It is a very lively place...could you see the monkeys?

    ReplyDelete

Post a Comment