मित्रांनो, नोटांवरील चित्र आणि बरेच काही :- आज काल देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी सुचवायचे आणि मग त्याला इतरांनी विरोध करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या नोटांवरचे महात्मा गांधी यांचे चित्र बघून देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .