Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

सकाळची सफर

  


आज बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलो होतो.15 दिवस झाले,पाऊस स्वतः उसंत घेत नव्हता आणि आपल्याला उसंत घेऊ देत नव्हता. घरात बसून बसून कंटाळलेले मन,म्हटलं बाहेर पडलो तर ताजेतवाने होईल,प्रसन्न वाटेल. आपलं कसं असतं, आपण पाऊस नाही आला तरी परेशान असतो आणि तो आला तरी.रस्त्याने चालू लागलो.बाजूच्या धरणीने हिरवा अंगरखा पांघरला होता.जणू पावसाच्या आगमनाने ती खुष होऊन तिने नवे वस्त्र परिधान केले होते. झाडे हिरव्या हिरव्या पानाने हिरवीकंच दिसत होती. निसर्गाकडे कुठला कुंचा आहे माहित नाही. प्रत्येक हिरवा रंग दुसऱ्या पेक्षा वेगळा भासतो.एकही झाड निशपर्ण नव्हते. किती छान वाटत होतं. मैदानात एका ठिकाणी पाणी साचल होतं,आपण डबक म्हणतो त्याला. पण त्याच पाण्यात चिमण्या,मैना, बुलबुल सारखे आणि इतर कधीही दृष्टीस न पडणारे छोटे छोटे पक्षी विहार करीत होते.अंगावर पाणी घेऊन ते पंखांनी झटकून आपले पंख वाळवत होते.कुतहुल म्हणून तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. ते इतक्या मिनिटांत आज इतके चालले तर एवढ्या calories कमी होतात,हे बाजूला ठेऊन.कारण इतर दिवशी ते सर्व पूर्ण करता येईल हो,पण हे सुख नेहमी मिळेल असं नाही.बऱ्याच वेळानी एक ट्रक तिथून गेला आणि त्याच्या आवाजाने ते सगळे पक्षी उडून गेले. कुठे तरी एखादं दुसरं फुलपाखरू दिसतं होतं.लहानपणची आठवण झाली. चाळीसगांवला टेक्सटाइल मिल कंपाऊंड मधे क्वार्टर मधे आम्ही रहात होतो.फुलपाखरांच्या मागे धावत असू. फिक्कट पिवळ्या रंगांची ती फुलपाखर जे फूल दिसेल त्या फुलावर बसत असतं.कधी कधी प्रत्येक झाडावर दिसे. कुठे गेली ती सगळी फुलपाखर.आता दुर्मिळ झालेल एखाद फुलपाखरू दिसलं की खूप बरं वाटतं. असं वाटून गेलं की निसर्ग म्हणजे ही झाडं, पानफुल, हे छोटे मोठे पक्षी हे पावसाळ्याचा किती आनंद घेतांना दिसतात.आपण मात्र काही ना काही कारण शोधत असतो तक्रार करण्याचे. पाऊस कमी आला तरी तक्रार आणि जास्त आला तरी. त्याच्या आशा कमी किंवा जास्त येण्याच्या कृत्याला आपण जबाबदार आहोत,हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो.आपण निसर्गाचा एक भाग आहोत, पण त्याला आपण जेवढे नुकसान पोहोचवित आहोत. त्याच्या कैक पटीने आपले नुकसान होतं आहे.मी जवळपास रोज मॉर्निंग वॉकला जातो.पण आजचा मॉर्निंग वॉक वेगळेच समाधान देऊन गेला      

 

                                                            प्रसाद नातु, पुणे. 

                                                            8888818589   

 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...