Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

नोटांवरील चित्र आणि बरेच काही

 


मित्रांनो, 

नोटांवरील चित्र आणि बरेच काही  :-

            आज काल देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी सुचवायचे आणि मग  त्याला इतरांनी विरोध करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे  चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या नोटांवरचे महात्मा गांधी यांचे  चित्र बघून देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय बोलावे.        

            काही वर्षापूर्वी पोस्टाच्या तिकिटे महापुरुषांच्या नांवे छापण्यावर राजकारण करून झाले.पोस्टाच्या तिकिटावर कुणाचे का चित्र असेना.त्याने  सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही.पण तरी आपल्या पक्षाचे सरकार आले की,लगेच आपल्या नेत्याचे चित्र असलेले तिकीट छापायचे असे रूढ झाले होते.मग काही लोक असे म्हणत विरोध करु लागले की ते तिकीट त्याचे काम झाले की कचऱ्यात दिसते आणि त्या महापुरुषांचाचा/ नेत्यांचा अपमान होतो. म्हणून कुणाचा फोटो छापायला नको, हे सुद्धा झाले.काही वर्षांनी हे सर्व विस्मरणात गेले.

            आज खरे तर रुपयांचे अवमूल्यन होतं आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आहे.म्हणून एका बाजूला  ओरड चालू आहे.रुपयाचे अवमूल्यन रुपया मजबूत झाला की किंवा डॉलरची घसरण झाली तर थांबेल ही.पण  पैशाची क्रयशक्ती कमी होत चालली आहे.ती वाढणे केवळ अशक्य. आज रु.100/- ची नोट बाजारात घेऊन गेलो,  की एखाद्या छोट्याशा पिशवीत मावेल एवढे तरी सामान येते कां हो? त्या अर्थी जे पैश्याचे मूल्य कमी झाले आहे.आता त्या नोटेवर महापुरुषांचे चित्र छापून,त्या महापुरुषांचे अवमूल्यन करू नका. एवढीच विनंती करावीशी वाटते.कारण नोटांवर ह्या महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्या महापुरुषांचे विचार, आपल्या मनावर कोरले जावेत ह्यासाठी काही करायची आवश्यकता आहे. महापुरुषांचे नुसते गोडवे गाण्यापेक्षा,त्यांचे आचरण प्रत्यक्ष नेत्यांनी करून लोकांपुढे आदर्श निर्माण करायला हवा. देशात महापुरुषांचे इतके पुतळे उभारले आहेत, पण त्या पुतळ्याकडे बघून,कुणी बोध घेतल्याचे काही बघायला मिळत नाही.त्यामुळे नोटांवर महापुरुषांचे फोटो छापून काही साध्य होईल असे मला तरी वाटत नाही. आपल्या काय वाटते हे ह्या ब्लॉगवर कोमेंट्स बॉक्समधे लिहा आणि आपले विचार व्यक्त करा.

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे,   

Comments

  1. नोटांवर महापुरुषांचे फोटो छापण्यापेक्षा त्यांचे विचार मनावर कोरणे व त्याप्रमाणे आचरण करणे हा आपला विचार खरोखरच अनुकरणीय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...