Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

संबंध प्रस्थापित करण्याची घाई


                                                                                                                
नमस्कार,  

            आम्हा भारतीयांना संबंध प्रस्थापित करण्याची अतिशय घाई असते. आपल्या शहरांत एखादा जिल्हाधिकारी आपल्याच आडनावाचा आला की झाले,त्याचे आपले नाते किती जवळचे आहे हे सांगण्याची,आपल्याला खूप घाई झालेली असते.ही घाई तोपर्यन्त टिकते,जोपर्यंत आपल्याला एखादा अत्यंत जवळचा  मित्र येऊन, कलेक्टर ऑफिस मधले त्याचे काम,आपल्या ओळखीने, करून देण्याची गळ घालत नाही. असे कुणी काम सांगितलेच तर, पोस्ट मिळाली खूप गर्व होतो एकेकाला,असेच असते रे,आपल्या लोकांचेच काम करीत नाही.नंतर तो आपला so-called नातेवाईक जिल्हाधिकारी, कसा घाबरट आहे, नको उगीच आपल्या लोकांचे काम करून, कशाला वादात का पडायचे.किंवा, नाही तो करून देईल पण नियमाने होत असेल तर करेल, तो माझ्या मित्राचे आहे म्हणून तो कुठलेही नियमात न बसणारे काम,करून देईल असे नाही.नियमांच्या बाबतीत अतिशय कडक आहे तो ! असे वेगवेगळे दाखले देतील,कारणे शोधतील आणि सांगतील.

            असा तथाकथित ओळखीचा किंवा जवळच्या संबंधातील व्यक्ति दूर असेल,साता समुद्रापार असेल तर मग काही फिकीर नाही असेच काहीसे घडले आहे ते म्हणजे.भारतीय वंशाचे “ऋषि सुनक” ब्रिटनचे पंतप्रधान झाले. खरं म्हणजे ऋषिचे कुळ आणि नदीचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करू नये म्हणतात. पण ऋषिचे (सुनकांचा ऋषि) मुळ शोधून ते भारतीय वंशाचे कसे आहेत, ते शोधून काढले गेले. झालं त्यांचे दादा,परदादा कधी काळी भारतात होते.म्हणून त्यांचा खूप उदोउदो सुरु झाला. 

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या.तेव्हा भारतात अतिशय आनंदी वातावरण होतं. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या. थोडा अधिक विचार केला तर,ह्या दोघांच्या मुळ भारतीय वंशाचे असल्याचा,भारताला काही फायदा होईल.अजिबात नाही.कारण भारतीय रक्तातील तत्व जपण्याच्या (भ्रष्टाचार करतांना,जाती जाती पाळतांना, स्त्रियांवर अत्याचार करतांना सोडून, कारण तत्व जपण्याच्या जीन्स पेक्षा ह्याचे जीन्स अधिक स्ट्रॉंग आहेत.) वृत्तीने ते दोघेही, अमेरिकेत आणि ब्रिटनमधे आपल्यासाठी कसा आपली देशाशी निष्ठा प्रथम, अर्थात अमेरिका आणि ब्रिटनशी आणि भारत वगैरे नंतर असाच पवित्र घेतील ह्यांत वाद नाही. म्हणूनच 23 सप्टेंबर, 2021 ला आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी अमेरिकेत गेले,तेव्हाच नेमका भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ह्यांना भारतातील तथाकथित मानवाधिकाराचा मुद्दा आठवला आणि त्यांनी पंतप्रधानांना त्याबद्दल छेडले देखिल.त्या नंतर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस, ह्यातील हवाच निघून गेली.

            असे ऋषि सुनक ह्यांच्या बाबतीत न होवो अशी अपेक्षा आहे.पण माझं हेच म्हणणे आहे,की फार अपेक्षा न बाळगलेल्या बऱ्या. ऋषि सुनक भारतीय वंशाचे आहेत म्हणून,एवढीच अपेक्षा करूया की ब्रिटनमधे गेल्या चार वर्षात हे चौथे पंतप्रधान, किमान त्यांना तरी पूर्ण कारकीर्द पार पाडता यावी.                                                

                                                                                                                      प्रसाद नातु,पुणे.  

                                                                                                                        88888 18589

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...