Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

माझं बालपण भाग 3 रा


मित्रांनो 

चाळीसगाव जरी सुटलं तरी आठवणी सुटल्या नव्हत्या.आमच्या चाळीसगाव मुक्कामातच माझ्या मोठ्या बहिणीचे,सुनंदा ताईचे लग्न झाले.1965 साली तिचे लग्न झाले,ती लहान होती तेव्हा.मी तर अवघ्या 5 वर्षाचा होतो.माझा जन्म झाल्यापासूनचे ते पहिले लग्न.मला जेवढे आठवते त्या प्रमाणे तिचे लग्नही नगर पालिकेच्या शाळेत झाले होते.त्या नंतर 1967 साली नगर पालिकेच्या शाळेत एकदम दोन लग्ने अनुभवायला मिळाली.एक माझ्या मोठ्या मामाचे अनिल मामाचे आणि सुधा मावशीचे.ह्या खरं तर पूर्णतः कौटुंबिक घटना, पण सांगतोय यासाठी की,त्या वेळेसची लग्न ही खरोखर मंगल विवाह असायची, त्यांत पावित्र्य असायचं.जपलं जायचं.आज काल लग्न हा एक इवेंट असतो.             

              माझ्या मामा आणि मावशीच्या लग्नातलं आठवतंय.कुणाचे विशेष लक्ष मेनू काय वगैरे याकडे नव्हते.लग्न सकाळी लागलं.त्यानंतर विधी आणि मग पंगतीच जेवण.कुणाला काय आवडतं आहे,काय हवे आहे त्याची दखल घेतली जात होती.सर्व विधी होईपर्यंत वऱ्हाडी मंडळी नवरदेव नवरीच्या आसपासच होते.चला आलोच आहे चाळीसगावला,तर गांव पाहून घेऊ हा पर्यटनाचा निकष नसायचा.छान वाटायचं.आता लग्न म्हणजे इवेंट झालेत.काही ठिकाणी आधीच विधी आटपून,मग बोहल्यावर उभे राहून उभयतांना हार घालणे वगैरे सोपस्कार.आणि केव्हा एकदा नवरा नवरीला भेटतो किंवा तोंड दाखवितो आणि पळतो,ह्या कडे लक्ष.तिकडे धार्मिक विधी सुरू आणि इकडे आत्या, मावश्या, भाच्या यांचे फोटो session सुरू.मग मोबाईलवर ग्रुप मधे कुणी जास्त फोटो टाकले,यासाठी एखादी स्पर्धा असावी तसे फोटो पोस्ट होतात. मग काय काही दिवसांनी मेमरी फूल म्हणजे मग डिलीटच करावे लागणार ना.असो.

              ह्यातच त्या मिल कंपाऊंडमधे राव कुटुंबियांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित रहायचा योग आला.त्यांची दोन मुले आणि एक मुलगी होती. मुलांची नांवे कृष्णमूर्ती आणि वेणुगोपाल अशी होती आणि मुलीचे नांव राजमणी. राव साहेब खरं तर खूप tough वाटायचे,पण ते मुलीच्या लग्नामधे इतके धाय मोकलून रडले की मुलीच्या सासरी जाण्याचे दुख: काय असतं.हे माझ्या सारख्या लहान मुलाला देखील जाणवलं. आबासाहेबांनी त्या वेळेस त्यांना खूप आधार दिला होता.   

              आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ते हे की, माझा एक मित्र प्रशांत (नांव बदलले आहे) त्याचे वडील घराबाहेरच्या पारावर प्रशांतला गणित शिकवायला घेऊन बसतं. त्याला आलं तर बरं, नाही तर ते मुंबईचे होते,त्यामुळे शिंच्या, शिंदडीच्या असल्या काही शिव्या घालत.परिसरांत चांगले दोन चारशे फुटांवर ऐकू जात असे.प्रशांतला मग आमच्या सोबत खेळतांना खूप लाजिरवाणे होत असे.माझे वडील मला मात्र कधीच रागावले नाही.

              आबासाहेबांनी चाळीसगावची नोकरी सोडल्यावर आम्ही एका कुटुंबाच्या नावावर असलेल्या एका घरात काही दिवस राहिलो.कारण शैक्षणिक वर्ष संपायचे होते.त्या वेळेस बाजूला दत्ता कुलकर्णी रहात असतं.त्या वेळेस रेडियोवर दत्ता कुलकर्णी एक बातम्या देणारे निवेदक,ते आपल्या बोलण्यातील विशिष्ट लकबी साठी प्रसिद्ध होते.ह्या मिल मधील दत्ता कुलकर्णीना चार मुलींच होत्या.सुषमा,संध्या,भावना आणि कल्पना.त्यांचा काका विलासपूरला रहात असे.कुठे आहेत त्या नाही माहित आता.एकदा आमच्या घराजवळ सांप निघाला.गोंगाटामुळे तो एका बिळात लपू लागला. त्या विश्वास काकाने त्याची शेपटी ओढून बाहेर काढले आणि त्याचे तोंड जोरात फरशीवर आपटून त्याला मारून टाकले.विलासपूरकडे खूप निघतात मग आम्ही हेच करतो असे ते सांगत होते.

              तर चाळीसगांवच्या ह्या आणि अशा असंख्य आठवणी घेऊन चाळीसगांव सोडले ते आज आठवले.एक 5-6 वर्षापूर्वी,मी त्या जुन्या पैकी काही गोष्टी, काही जागा,काही जुन सापडत कां ह्याचा शोध घेतला.तो स्टँडकडे जाणारा लांबच लांब रस्ता,एसटी स्टँड जवळ लोटस टेम्पल सारखे दिसणारे मंदिर.जुनी झालेली माझी आवडती आ.बं.हायस्कूल,ती पूर्णपणे बदललेली सरस्वती प्राथमिक शाळा दिसली.आठवणी होत्या माझ्या हृदयात,पण जागेवर काहीच न दिसल्याने आलो नसतो तर बरं झालं असतं ह्या नैराश्यमय विचारानेच मी परत फिरलो.                                                                                             

                                                                                                                                        प्रसाद नातु 

                                                                                                                                        88888 18589 

Comments

  1. मध्यंतरी मी गुगलवर सर्च केले असता सॅटेलाईट व्हीव मध्ये ती मिलची चाळ जशी होती तशीच दिसून आली. छान आठवणी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...