ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
इस्त्रीच्या कपड्यावरुन आठवले. आज बहुधा निवृत्तीनंतर पहिल्यांदाच ज्याला फॉर्मल म्हटले जाते ते म्हणजे शर्ट आणि टेरीकॉटची पॅन्ट घालून गेलो असेन. निमित्त होतं, दोन सत्कार सोहोळयांचे.माझा लेखक म्हणून सर्वात आधी सत्कार झाला तो 14 डिसेंबर 2021 ला बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, कोल्हापूरच्या हॉलमधे. झोनल मॅनेजर श्री. हेमंत खेर सर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आणि माझ्या "होस्ट इज घोस्ट" ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.त्याचा आनंद, मित्रांनो,काही वेगळाच होता.गेल्या 38 वर्षे एक कुटुंब समजून मी ज्या बँक ऑफ इंडियामधे होतो. त्या माझ्या लोकांनी , घरच्या लोकांनी केलेला सत्कार मला रोमांचित करून गेला.
बरोबर 10 महिन्यांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर,2022 ला वाकड,पुणे येथील शब्दा बुक्स आणि लायब्ररीने कस्पटे सभागृहात "साहित्यातील योगदाना" बद्दल माझा सत्कार केला. वाकड येथील वाचक प्रेमी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. शाल,श्रीफळ आणि मोमेन्टो देऊन माझा सत्कार करण्यात आला. आणि योगायोगा असा की भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम , भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती,ह्यांचा जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर,2022 ला माझा कॉसमॉस सहकारी बँक लिमिटेड आणि ग्रीन वर्ल्ड publication तर्फे "साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल" सन्मान करण्यात आला. हा थोडा कॉर्पोरेट कार्यक्रम होता. महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे, IAS, ह्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. ह्या दोन्ही कार्यक्रमाला फॉर्मल ड्रेस घालून जाणे आवश्यक होते.
यंदाच्या वर्षी पावसाची जरा जास्त थांबायची इच्छा दिसते आहे. त्यामुळे ऊन म्हणण्यापेक्षा उघाड असेल तर पॅन्ट,शर्ट आदि कपडे धुता येतात. अन्यथा कठीण काम. तर कपडे धुवून वाळल्यानंतर सौ म्हणाली जरा कपड्यांना इस्त्री करून आणा म्हणजे पुनः कुठे जायचे असल्यास कामांत येतील.मी हसलो.तुम्हाला वाटेल ह्यात हसण्यासारखे काय? तुमचेही बरोबर आहे म्हणा, सौ ने कुठलाच विनोद केला नव्हता. मला हसायला आलं ते कारण वेगळेच होते. मी बँकेच्या नोकरीत असतांना रोज अगदी इस्त्री केलेले कपडे वापरत नसे. ह्याला कारण तसेच होते. मी मांडगाव येथे असतांना Cashier होतो. मांडगावला आधी एक दीड वर्ष जाऊन राहिलो. पण नंतर अपडाउन केले. जवळपास 25 किमीचा कच्चा रस्ता, धुळीचा ,कपड्यांची एका दिवसांत वाट लागायची.मी 1983-84 साली प्रचलित असलेली स्टोनवॉशची पॅंट शर्ट वापरत असे.मळतं तेही असतं,पण जाणवतं नसे.एकदा माझा एक मांडगावातील शेतकरी मित्र मला म्हणाला, "तुम्ही हे ताडपत्रीच्या कापडाची पॅंट का वापरता?" तेथील स्थानिक शाळेतील शिक्षकाचे नांव घेऊन तो म्हणाला, "ते गुरुजी रोज इस्त्रीचे कपडे वापरतेत. मंग तुम्ही तर साहेब हाय." त्याचे म्हणते खरे होते. मी त्याला म्हटले, "मित्रा,इस्त्रीचे कपडे वापरले की आपोआप चेहरा सुद्धा इस्त्री केल्यासारखा घेऊन वावरतांना बघतोस ना लोकांना. मला ना ते नको आहे. माझा चेहरा बघ सदा कसा हसरा असतो. त्याला पटलं.तो म्हणाला,"बराबर हाय, कपडे कोन पहाते,थोबाड जर हसतमुख असलं तरं. आज खरं तर ते आठवले म्हणून मला हसायला आले.
माझा पेहराव जरी इस्त्री केलेला नसायचा तरी माझ्या पदाला शोभेल असा नेहमीच असायचा. पण सेवाक्षेत्रातील माझ्या मित्रांना मला हेच सांगायचे आहे की तुम्ही ईस्त्रीचे कपडे वापरा, जरुर वापरा. पण चेहरा मात्र केवळ हसतमुख नव्हे तर संवेदनशील ठेवा. कुणाचे नुकसान झाले, कुणाला त्रास झाला तर त्याचे ते दुख: त्या प्रतीची संवेदनशीलता आपल्या चेहऱ्यावर दिसायला हवी माझ्या मते यशाच्या काही घटकातील एक घटक संवेदनशील चेहरा हा देखिल असतो. हे सांगण्यासाठीच हा प्रपंच.
माझे विचार कसे वाटले हे माझा ईमेल आयडी pknatoo25360@gmail. com वर जरून कळवा.
प्रसाद नातु , पुणे
88888 18589

Beautiful post
ReplyDelete