Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

माझं बालपण भाग 2 रा

मित्रांनो,

            चाळीसगावला पहिली ते पाचवी,अशी पाच वर्षे शिकलो.ह्याच काळांत बऱ्याच घटना घडल्या.त्यातील एक म्हणजे,माझा धाकटा बंधु श्रीनिवासचा जन्म झाला.त्या वेळी सुतिका गृह वगैरेच्या सोयी लहान गावात नसायच्या.घरीच सुईणीला बोलावून घेत असतं.दुसरी महत्वाची घटना म्हणजे, कोयना नगरचा भूकंप.आधी दारांना कड्या असायच्या,त्या कड्या कोंडयात अडकवून त्याला कुलूप लावले जाई.11 डिसेंबर 1967 च्या पहाटे अचानक दाराच्या कड्या अचानक वाजू लागल्या.माझे वडील आबासाहेब,सर्वात आधी उठले आणि दरवाज्याकडे धावले.चोर असेल का? अशी शंका त्यांच्या मनाला शिवली देखील नव्हती.तर त्यांच्या डिपार्टमेंटला काही प्रॉब्लेम झाला तर नसेल ना,म्हणून कुणी बोलवायला आले असेल.बराच वेळ कड्या वाजलेल्या मी ऐकल्या आणि पाहिल्या.स्वयंपाकघरांत कपाटांत लावून ठेवलेले डब्बे,भांडी सारेच खाली पडले होते.आता सारखी त्या वेळेस प्रसार माध्यमे नव्हती. प्रसार माध्यम एकच तो म्हणजे रेडियो.आबासाहेबांनी मला ऑर्डर केली.“राजा, पटकन रेडियो लाव. रेडियोवर न्यूज सुरू होत्या.

            कोयना धरण प्रकल्पाजवळ भूकंप झाला होता.पावणे दोनशेच्या वर लोक मृत्युमुखी पडले होते आणि दोन हजाराच्यावर जखमी झाले होते. जवळपास 450 ते 475 किमी वर असणाऱ्या चाळीसगांवला,आम्हाला एवढा धक्का जाणवला होता.तर तिथे कोयनानगरच्या लोकांचे काय हाल झाले असतील. ह्या विचाराने आई त्रस्त झाली होती.माझे बालमन रिष्टर स्केल वगैरे समजण्याच्या पलीकडे होते.दुसऱ्या दिवशी लोकसत्तात पहिल्याच पानावर मोठी बातमी आणि नुकसानीचे फोटो आले होते.ते पाहून माझे बालमन देखील हेलावले होते.

            भोंगे हा एक टिपिकल प्रकार होता.1964 ला पंडित नेहरू गेले.  तेव्हा भोंगा 10 मिनिटे चालू होता.1965 ला भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी सगळी कडे ब्लॅक आउट होण्याच्या आधी,भोंगा 10 मिनिटे चालू होता.ह्या युद्धात आपल्याला विजय मिळाला होता आणि त्यात 1966 साली आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांचे आकस्मिक निधन झाले होते. शास्त्रीजी “जय जवान जय किसान” मुळे बऱ्या पैकी ओळखीचे झाले होते.भोंगा जास्त वेळ वाजणे म्हणजेच काही तरी विपरीत घडले आहे. हे थोडे थोडे समजायला लागले होते.

            अखेर 1969 साल उजाडलं होतं.मी पाचव्या वर्गात होतो.आता बऱ्या पैकी समजायला लागलं होतं.मी सरस्वती बाल मंदिर ज्यात फक्त प्राथमिक शिक्षण दिले जायचे,ती शाळा सोडून,चाळीसगांवांतील प्रतिष्ठित ए. बी. हायस्कूल अर्थात आनदीबाई बंकट हायस्कूलला प्रवेश घेतला. 1969 हे वर्ष मोहनदास करमचंद  गांधी अर्थात महात्मा गांधी ह्यांचे जन्म शताब्दी वर्ष. गांधी जयंतीला पूर्ण गावातून आमची प्रभात फेरी निघाली होती.वर्ष भरच त्याची रंगीत तालिम सुरू होती.माझा आवाज चांगला वाटल्याने येवले सरांनी, “उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया” हे गाणं म्हणावयांस लावले. मी आधी म्हणायचो, बाकी सारे माझ्या मागे म्हणतं असतं.मी गायलेले हे पहिले गाणे.

            1969 ची आणखी एक घटना,माझ्या चांगली स्मरणात आहे.ती म्हणजे तित्तुर आणि डोंगरीचा पूर.चाळीसगांव हे तित्तुर आणि डोंगरीच्या संगमावर वसलेले गांव आहे.जुने आणि नवे चाळीसगाव शहर यातून तित्तुर नदी वाहते.तित्तुर डोंगरीला मिळते आणि मग ही नदी पुढे गिरणेला आणि गिरणा तापीला. 1969 ला खूप पाऊस झाला.आमचे घर मिल कंपाऊंड मधे होते.जे गावापासून दूर असल्याने काहीच खबर बात मिळत नसे.मी शाळेत गेलो.सगळीकडे पाऊस खूप झालेला होता. शाळेच्या मोठ्या पटांगणात देखील भरपूर पाणी साचलेले दिसले. शाळेचे सगळे दरवाजे बंद होते.बाहेर एक बेल वाजविणारा चपराशी उभा होता.मी त्याला विचारले की, “आज शाळा बंद का आहे?” तर त्याने मलाच उलटे विचारले, “कुठून आलास रे तू? “ मी म्हटलं, “टेक्सटाइल मिल मधून.” तो म्हणाला म्हणूनच असे विचारतोस.तो पुर्णपात्रे  डॉक्टरचा दवाखाना दिसतो ना, तिथे जाऊन बघ.मी जसजसा त्या दिशेने जाऊ लागलो. तसे लक्षांत आले की, तित्तुर अगदी दुथडी भरून वहात होती.जुने आणि नवे शहर जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता. तिथे अचानक येवले सर भेटले.ते म्हणाले की, “मुख्याध्यापक जुन्या शहरांत रहातात आणि शाळेच्या किल्ल्या त्यांच्या कडे आहेत.त्यामुळे शाळेला आज सुट्टी.” त्या पुरात एकाने आपला घोडा टाकल्याचे अजूनही आठवतंय.”

            मी पाचवी झालो आणि आमचे चाळीसगाव सुटले.आजच्या सारखे तेंव्हा मोबाईल व्हॉटस अप, फेसबूक नव्हतं. नाही तर आज माझ्या फ्रेंड लिस्ट मधे शंभरेकची भर पडली असती.2011 ला पश्चिम महाराष्ट्रात आल्यावर तर राहून राहून वाटत की त्यातील कुणी माझ्या समोर सहकारी, बॉस किंवा अगदी बँकेचा ग्राहक बनून भेटूनही गेला असेल,अन मी त्याला आणि तो मला भेटून देखील गेला असेल पण एक अनोळखी बनून.         


                                                                                                                                   प्रसाद नातु      

Comments

  1. Nicely written. I hope the extension of this blog will culminate into a new book.

    ReplyDelete
  2. I have recalled now that the buzzer played for 10 minutes and the atmosphere was very sad for 2-3days on Shastrijis demise

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...