ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
कविता संग्रह आजकाल कुणी वाचत की नाही माहित नाही. पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते. या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे. "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे...