Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

एक अनोखी सहल अंतिम भाग

कालेश्वरम् मंदिर


आलापल्ली वरून ठरल्याप्रमाणे आम्ही 6.30 ला निघालो. आलापल्ली ते अहेरी कालचाच रस्ता होता. अहेरी ते सिरोंचा वेगळा रोड होता. त्या रस्त्यावरून खरे तर आम्ही पहिल्यांदाच जात होतो. ह्या रोड बध्दल राजुरा येथे असतांना लोक सांगत असत कि अहेरीच्या पुढे एवढे घनदाट जंगल आहे की दिवसा देखिल सुर्याचा प्रकाश पुर्णपणे मिळत नाही. आम्ही अहेरीहून निघालो . खुप दाट जंगल होतं. म्हणजे जंगलात डोकावून पाहिल तर विशेष दूरच दिसत नव्हतं. वेगवेगळ्या फुलांचे सुवास येत होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने अशा कमानीतून आमची कार पुढे जात होती. कित्येक झाडांनी वेगवेगळे आकार धारण केलेले होते. हाॅरर फिल्म मध्ये अशाच झाडांचे शुटींग करित असावेत. हिरवा या एकाच रंगाच्या विविध छटा पहायला मिळाल्या. त्या वेळी मोबाईल इतका प्रगत नव्हता अन्यथा त्या सगळ्या छटा कॅमेर्यात कैद करता आल्या असत्या. तंत्रज्ञानाचा चांगला वापर ही खुप आहे. मध्येच एखादा  ओहोळ रस्त्याला ओलांडून जातांना मिळाला. जंगलातून आलेले स्वच्छ निर्मळ पाणी. खाली उतरून पाय बुडवायची ईच्छा व्हायची पण बाजूला घनदाट जंगल बघून मनांतच रहायची. आमची कार आणि पाठोपाठ डाॅक्टर साहेबांची कार एवढी दोनच वहाने रस्त्यावर दिसत होती. दूरदूर पर्यंत माणूस दिसत नव्हता. म्हणायला बल्लारपूर पेपर मील साठी बांबू नेणारे ट्रक लागले.सिंरोचा बरेच लांब होते. शेवटी दूर एक गांव दिसू लागलं. चौकातच बॅकेची ब्रॅच होती. आज सुट्टी असल्याने बंद होती. तिथून पुढे आत गेलो आणि मग थोडा उतार होता. कार उतारावरून खाली आली तर प्राणहिता नदीचे विस्तीर्ण पात्र नजरेस पडले. पलिकडला तीरही दिसत नव्हता एवढे विस्तीर्ण. कार मधून खाली उतरलो. पलीकडच्या तिरावर पुर्वीचा आंध्र आणि आताचा तेलंगणा . कालेश्वराचे सुप्रसिध्द मंदिर होते तिथे. हे मंदिर 12 व्या शतकातील आहे  येथे दोन लिंग आहेत. शिवलिंग व यमलिंग असे सांगण्यात आले होते. ईथे देवदर्शन करणार्यास मोक्ष मिळतो अशीही आख्यायिका आहे. तीर पार करण्यासाठी नावेतून जावे लागते. मोठी नांव होती.  या पुर्वी एवढे मोठे अंतर फक्त कन्याकुमारीला पार करून गेलेलो. पण ते मोटार लाॅच मधून आणि तिथून जे लक्ष्य म्हणजे   विवेकानंदाचा राॅक समोर दिसत होता . त्यामुळे तेवढे टेन्शन नव्हते. इथे नांवेतून पलिकडे जायचे टेन्शनच होते. लोकांचे नावेत बसणे थांबत नव्हते. जे येतील त्यांना नावाडी बसाच म्हणत होता. जे नेहमी जाण येण करणारे किंवा खुप वेळा जाऊन आलेले आरामात होते. मी माझ्या बाकीच्या सहकार्याकडे बघितलं. आम्ही सहा जण सगळ्यांत जास्त टेंशन मध्ये होतो. शेवटी नांव निघाली. पुढे दोन आणि मागे दोघे असे चार नाविक वल्हवत होते. मी थोड टेंशन कमी करण्यासाठी म्हटलं. एवढा तालमेल कुठल्याही संस्थेत असेल तर ग्रेट ना. तेवढ्यात अजय म्हणाला बॅकेत असेल तर म्हण ना घाबरतो कशाला. गुलाबरावांनी फक्त स्मित हास्य केले. बहुधा त्यांना सांगायचे असावे
की आमच्या  ब्रंचला असाच तालमेल आहे. आता थोड हायसं वाटत होतं. कारण मंदिर , काठावरची दुकान सार सार काही दिसत होत. शेवटी आम्ही उतरलो. मंदिर दूरून दिसत होते. त्याच्या पेक्षा बरेच विस्तीर्ण आणि भव्य होते. इथे नखशिखांत काळा पोशाख केलेले अनेक भाविक दिसले जे नेहमीच असा पोशाख परिधान करून असतात असे सांगण्यात आले. तिथल्या प्रथेप्रमाणे आधी गणपतीचे मग यमाचे आणि शेवटी शिवलिंगाचे असे दर्शन घेतले. मंदिर परिसरांत फिरलो. तिथे लक्ष बिल्व पत्र पूजा केली जाते. पण एक महिना आधी कळवावे लागते. पात्रातून येतांनाच दक्षिणेकडून आलेली गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम बघावयास मिळतो. प्राणहिता ही विदर्भातील वैनगंगा, वर्धा आणि पैनगंगा या तीन मोठ्या नद्यांचा संगम असलेली नदी. या क्षेत्राला लोक दक्षिण काशीही म्हणतात. या मंदिराचे नाव कालेश्वर मुक्तेश्वर मंदिर आहे. बरीच माहिती गोळा करीत असता डाॅक्टरांनी आवाज दिला. नांव  लागतेय आता निघायला हवे. कारण नागपूरला पोहोचायचं होतं आणि नांवेची फेरीही असायला हवी. सगळे किनार्यावर आलो. नावेत खुप लोक भरले होते. गुलाबरावांना खुप टेंशन आलेले ते नाविकाला सारखे विचारत होते. भैया और कितना बैठाओगे. नावाडी निर्विकारपणे पहात होता. मी गुलाबरावांचे टेन्शन हल्के करण्यासाठी म्हटले अहो रोज एवढे कस्टमर, तुमच्या समोर येऊन उभे असतात. काही माझ्या कडे येऊन म्हणतात देखिल कि तुम्हाला हेल्प द्या पण तुम्हाला येत कधी टेन्शन ? नाही ना. मग तो संभाळेल की. ते हसले.  पण नाव किनार्यापासून 50 फूट असतांना हेलकावे खाऊ लागली. काही तरी चुकलं होत ती किनार्याकडे जात नव्हती. मग त्यांच्याच पैकी एक खाली उतरला आणि किनार्यापर्यंत चालत गेला. साधारण गुडघ्याच्या वर एवढेच पाणी असावे. नाव आगे नही जाएगा यहाही उतर जावो असे फर्मान नाविकाने  सोडले. मग आम्हीही त्या तेवढ्या पाण्यातून एकमेकांचे हात धरत किनारा गाठला अन्  सुटकेचा श्वास सोडला. पाठीमागे विशाल पात्रावरून नजर फिरवल्यावर सुखरूप परत आल्याचा आनंद आणिक वाढला. एक सुंदर पण अनोखी सहल/सफर आता अंतिम टप्यावर पोहोचायला आली होती. परत जातांना दिवस भरच्या प्रवासाने आम्ही सारेच थकलो होतो. फक्त नावेतल्या प्रवासाचे,  जातानाचे आणि येतानाचे  प्रत्येकाच्या मनात आलेले   विचार आठवून आम्ही हसत होतो. कारण आता हसायला काहीच हरकत नव्हती. नावेतील प्रवास संपला होता. मघाचे गंभीर चेहरे आता थकल्यावर देखिल हसतमुख दिसत होते. रात्री अडीच तीनला नागपूरला पोहोचलो. यानंतर कालेश्वरला माझे कधीच जाणे जमले नाही. 
आम्ही तीनही फॅमिली नंतर इतक्या दूर कुठे गेलो नाही. अशीही अनोखी सफर संपली होती. सगळ्यांच आठवणी मागे ठेऊन. 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...