ब्लॉग नं. 2026/248.
दिनांक: 5 सप्टेंबर, 2026.
मित्रांनो,
गाढ आणि शांत झोप हवीय? रात्री फक्त २ मिनिटे करा 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing)
आजच्या धावपळीच्या युगात रात्री डोक्यात विचारांचं चक्र सुरू असणं आणि त्यामुळे शांत झोप न लागणं ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे.दिवसभर कामाचा ताण,उद्याच्या नियोजनाची चिंता यांमुळे रात्री अंथरुणावर पडलो की मन शांत होत नाही. अशा वेळी झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे केलेला एक साधा व्यायाम तुमचं आयुष्य बदलू शकतो. तो व्यायाम म्हणजे 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing).हा अत्यंत सोपा पण प्रभावी श्वासोच्छवासाचा प्रकार रात्रीच्या वेळी मन शांत करून गाढ झोप लागण्यास कसा मदत करतो, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत.
सविस्तर:
बॉक्स ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय?
मला मध्यंतरी रात्री लवकर झोप न लागण्याची,complain होती.मोबाईल,लॅपटॉप एक तास आधी बंद करणे, हे उपाय करून बघितले.विचार कसलेच त्रास देत नसतांना सौरभ बोथरा यांच्या Habuilt च्या अॅपवरुन मला झोपण्याआधी एक नोटिफिकेशन येऊ लागलं. मी एक दिवस म्हटलं हा उपाय करून पाहिला.बॉक्स ब्रीदिंग, ज्याला 'टॅक्पिकल ब्रीदिंग' (Tactical Breathing) किंवा 'फोर-स्क्वेअर ब्रीदिंग' (Four-Square Breathing) असेही म्हणतात, हे श्वासोच्छवासाचे एक शक्तिशाली तंत्र आहे, ते करून बघितलं आणि आता मला झोपेची समस्या राहिली नाही. या तंत्राला 'बॉक्स' का म्हणतात? कारण यात श्वास घेण्याच्या प्रक्रियेचे चार समान भाग असतात, जे एका चौकोनाच्या (Box) चार बाजूंसारखे काम करतात:
श्वास आत घेणे (Inhale)
श्वास रोखून धरणे (Hold)
श्वास सोडणे (Exhale)
श्वास बाहेरच रोखून धरणे (Hold Empty)
प्रत्येक कृती समान सेकंदांसाठी (उदा. 3 सेकंद) केली जाते. यूएस नेव्ही सील (US Navy SEALs) चे जवान तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
रात्री शांत झोपेसाठी हे का फायदेशीर आहे?
जेव्हा आपण तणावात किंवा विचारामध्ये असतो, तेव्हा आपली मज्जासंस्था (Nervous System) 'फाइट किंवा फ्लाईट' (Fight or Flight) मोडमध्ये जाते.यामुळे शरीरात कॉर्टिसोल आणि अड्रेनलिन सारखे ताणतणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात,ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात आणि झोप दूर राहते.बॉक्स ब्रीदिंग केल्यामुळे शरीरावर नेमका उलट आणि सकारात्मक परिणाम होतो:
पॅरासिम्पाथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते: हा श्वासोच्छवासाचा सराव शरीराच्या 'रेस्ट अँड डायजेस्ट' (Rest and Digest) प्रणालीला चालना देतो. यामुळे मेंदूला शांततेचे संकेत मिळतात.
हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित होतो: श्वास रोखून ठेवण्याच्या आणि हळूहळू सोडण्याच्या प्रक्रियेमुळे हृदयाची गती मंदावते, ज्यामुळे शरीर रिलॅक्स होते.
अतिरिक्त विचार थांबतात: जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष पूर्णपणे श्वास मोजण्यावर केंद्रित करता, तेव्हा डोक्यात सुरू असलेली विचारांची गर्दी आपोआप थांबते आणि मेंदूला विश्रांती मिळते.
हे कसे करावे? (स्टेप्स)
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी बेडवर आरामात मांडी घालून बसून हे करू शकता:
पायरी 1: आपले डोळे बंद करा.नाकाद्वारे हळूहळू आणि दीर्घ श्वास आत घ्या आणि मनसोक्त हवा पोटात किंवा छातीत भरून घ्या (3 सेकंद मोजा).
पायरी 2: आता तो श्वास आतच रोखून धरून ठेवा (3 सेकंद मोजा).
पायरी 3: तोंडाने किंवा नाकाने हळूहळू संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या (3 सेकंद मोजा).
पायरी 4: श्वास पूर्ण बाहेर सोडल्यानंतर फुफ्फुसे रिकामी असतानाच पुन्हा काही सेकंद थांबा (3 सेकंद मोजा).
ही प्रक्रिया सलग 2 ते 5 मिनिटे सतत करा.सुरुवातीला आम्ही 3 सेकंदांपासून सुरुवात करू शकता.
व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या
हे तंत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष करून पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा. यात स्टेप-बाय-स्टेप कृती दाखवली आहे:
समारोप:
आजच रात्री नक्की करून पहा !
रात्रीची शांत आणि गाढ झोप ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी महागड्या उपायांची गरज नाही, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे स्वतःसाठी काढण्याची गरज आहे. आजच रात्री अंथरुणात पडल्यावर हा बॉक्स ब्रीदिंगचा प्रयोग करून पहा आणि शांत झोपेचा अनुभव घ्या.तुमच्या झोप न लागण्याच्या समस्येवर हा एक साधा, नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी उपाय ठरेल !
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टीक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला
घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

🙏RR
ReplyDeleteVery nice Natu Sir
ReplyDelete