ब्लॉग नं. 2026/045.
दिनांक: 14 फेब्रुवारी, 2026.
मित्रांनो,
“सर, मेटाबॉलिझम वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं?” हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक जण विचारतो.कोणी पावडर शोधतो, कोणी डिटॉक्स ड्रिंक, तर कोणी फॅट बर्नर.पण सत्य थोडं वेगळं आहे. मेटाबॉलिझम वेगळं ‘बूस्ट’ करायचं नसतं. ते ठीक केलं,की ते आपोआप सुधरतं. आणि ते ठीक करण्याची सुरुवात होते लिव्हरपासून.कारण मेटाबॉलिझम आणि लिव्हर यांचा खोल संबंध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये हेच जाणून घेऊ.
सविस्तर:
आपल्या शरीरात फॅट बर्निंग, शुगर कंट्रोल, कोलेस्टेरॉलचं नियमन हे सगळं लिव्हरमध्येच होतं असतं.
म्हणूनच,जर लिव्हर थकलेले असेल, फॅटी किंवा ओव्हरलोड असेल तर तर मेटाबॉलिझम “स्लो” होतं. मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, तर ‘लिव्हर रिसेट’ करण्यापासून सुरुवात करावी लागते.
मेटाबॉलिझम कसं सुधारतं?
विज्ञानावर आधारित 10 उपाय खाली देत आहे.
1️⃣ साखर आणि फ्रुक्टोज आधी कमी करा:
फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतरित होते.कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, गोड स्नॅक्स हे सगळं लिव्हरसाठी पहिलं ओझं आहे. इथूनच सुरुवात करा.
2️⃣ उशिरा जेवण थांबवा:
रात्री लिव्हर डिटॉक्स करत असतं. पेशींची दुरुस्ती करतो. त्यामुळे उशिरा जेवण करू नये. कारण त्यामुळे फॅट बर्निंग बंद होते. म्हणून लवकर आणि हलकं जेवण घ्यावं. त्यामुळे, लिव्हरला मोठा आराम मिळेल.
3️⃣ प्रथिनांचे प्रमाण (Protein) व्यवस्थित ठेवा:
लिव्हरची दुरुस्ती ही प्रथिनांशिवाय होत नाही.म्हणून प्रत्येक जेवणात, डाळ, कडधान्य,दही / पनीर, अंडी / मासे (जे चालत असेल) यांचे सेवन करावं. आहारात नेहमी,थोडं का होईना, पण प्रथिन असायलाच हवं.
4️⃣ Refined Carbs कमी करा:
आहारातील Refined Carbs जसे की, मैदा, बेकरी पदार्थ, बिस्किटं आणि पॅकेज्ड स्नॅक्स हे सगळं
लिव्हरमध्ये फॅट साठवतं. म्हणून ते शक्यतो बंद करा. साधं घरचं अन्न हेच लिव्हरसाठी सर्वात सुरक्षित असतं.
5️⃣ Alcohol = Reset चे Pause Button:
थोडंसुद्धा अल्कोहोल, लिव्हरची “रिसेट प्रोसेस” थांबवतं.जर खरंच मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, तर थोडा ब्रेक घ्यावा लागेल.
6️⃣ जेवणानंतर 10–15 मिनिटं चालणं:
Post-meal walking मुळे लिव्हर फॅट कमी होतं आणि इन्सुलिन रेसिस्टन्स सुधारतो. उपाय,मोफत
सुरक्षित आहे आणि अतिशय प्रभावी आहे.
7️⃣ झोप – लिव्हरचा मुख्य healer:
दररोज 7–8 तासांची झोप आवश्यक आहे. कारण मेटाबॉलिझम सुधरविण्यासाठी यापेक्षा प्रभावी कोणतेही सप्लिमेंट नाही. झोप कमी घेतली तर त्याचा लिव्हरवर जास्त ताण येतो आणि मेटाबॉलिझम मंदावतो.
8️⃣ Stress कमी नसेल तर लिव्हर heal होत नाही:
दीर्घकालीन
ताण राह्यल्यामुळे Cortisol वाढतो
आणि लिव्हर फॅट वाढतं.त्यासाठी शांत श्वास,
थोडी विश्रांती, मनाला मोकळीक हे ही उपचारच
आहेत.
9️⃣ Detox pills नकोत, routine बदला:
लिव्हर स्वतःच डिटॉक्स करतो. आपण फक्त चुकीचं खाणं, चुकीचं वेळापत्रक आणि चुकीची झोप हे यातील अडथळे दूर करायचे आहेत.
🔟 Consistency > Intensity:
हे सारे
उपचार फक्त एक आठवडा परफेक्ट नको.तर हे तीन महिने सातत्याने केले पाह्यजे आणि ते
थोडं-थोडं सुधारायला हवं. हेच खरं ‘लिव्हर रिसेट’ आहे.
समारोप:
थोडक्यात मेटाबॉलिझम कोणत्याही पावडरने, किंवा शॉर्टकटने रीसेट होत नाही. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय तो तेव्हा सुधारतं, जेव्हा लिव्हर ठीक असतं. आणि लिव्हर ठीक असणं, हे योग्य आणि योग्य वेळी खाणं, योग्य वेळी आणि आवश्यक तेवढी झोप आणि कमीतकमी ताण.तेव्हा या 10 उपायांवर काम करणं सुरू करा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

अतिशय उपयुक्त माहिती
ReplyDeleteलिव्हर हा आपल्या शरीरातील खूप महत्वाचा अवयव आहे, त्याची योग्य काळजी घेतली तर metabolism ची काळजी करायची गरजच नाही
पण या ब्लॉग मधील ऊपाय प्रामाणिकपणे केले पाहिजेत
मिलिंद निमदेव