Skip to main content

मेटाबॉलिझम अर्थात चयापचय कसं वाढवायचं

  ब्लॉग नं. 2026/045 . दिनांक: 14  फेब्रुवारी , 2026 .   मित्रांनो , “ सर , मेटाबॉलिझम वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं ?” हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक जण विचारतो.कोणी पावडर शोधतो , कोणी डिटॉक्स ड्रिंक , तर कोणी फॅट बर्नर . पण सत्य थोडं वेगळं आहे. मेटाबॉलिझम वेगळं ‘बूस्ट’ करायचं नसतं. ते ठीक केलं , की ते आपोआप सुधरतं. आणि ते ठीक करण्याची सुरुवात होते लिव्हरपासून.कारण मेटाबॉलिझम आणि लिव्हर यांचा खोल संबंध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये हेच जाणून घेऊ. सविस्तर:   आपल्या शरीरात फॅट बर्निंग, शुगर कंट्रोल, कोलेस्टेरॉलचं नियमन हे सगळं लिव्हरमध्येच होतं असतं . म्हणूनच , जर लिव्हर थकलेले असेल , फॅटी किंवा ओव्हरलोड असेल तर तर मेटाबॉलिझम “स्लो” होतं. मेटाबॉलिझम सुधारायचं असेल , तर ‘ लिव्हर रिसेट’ करण्यापासून सुरुवात करावी लागते. मेटाबॉलिझम कसं सुधारतं ?             विज्ञानावर आधारित 10 उपाय खाली देत आहे. 1️ ⃣ साखर आणि फ्रुक्टोज आधी कमी करा: फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतरित होते.कोल्ड ड्रिंक्स, ...

मेटाबॉलिझम अर्थात चयापचय कसं वाढवायचं

 ब्लॉग नं. 2026/045.

दिनांक: 14 फेब्रुवारी, 2026. 

मित्रांनो,

सर, मेटाबॉलिझम वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं?” हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक जण विचारतो.कोणी पावडर शोधतो, कोणी डिटॉक्स ड्रिंक, तर कोणी फॅट बर्नर.पण सत्य थोडं वेगळं आहे. मेटाबॉलिझम वेगळं ‘बूस्ट’ करायचं नसतं. ते ठीक केलं,की ते आपोआप सुधरतं. आणि ते ठीक करण्याची सुरुवात होते लिव्हरपासून.कारण मेटाबॉलिझम आणि लिव्हर यांचा खोल संबंध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये हेच जाणून घेऊ.

सविस्तर:  

आपल्या शरीरात फॅट बर्निंग, शुगर कंट्रोल, कोलेस्टेरॉलचं नियमन हे सगळं लिव्हरमध्येच होतं असतं.

म्हणूनच,जर लिव्हर थकलेले असेल, फॅटी किंवा ओव्हरलोड असेल तर तर मेटाबॉलिझम “स्लो” होतं. मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, तर लिव्हर रिसेट’ करण्यापासून सुरुवात करावी लागते.

मेटाबॉलिझम कसं सुधारतं?

            विज्ञानावर आधारित 10 उपाय खाली देत आहे.

1️ साखर आणि फ्रुक्टोज आधी कमी करा:

फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतरित होते.कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, गोड स्नॅक्स हे सगळं लिव्हरसाठी पहिलं ओझं आहे. इथूनच सुरुवात करा.

2️ उशिरा जेवण थांबवा:

रात्री लिव्हर डिटॉक्स करत असतं. पेशींची दुरुस्ती करतो. त्यामुळे उशिरा जेवण करू नये. कारण त्यामुळे फॅट बर्निंग बंद होते. म्हणून लवकर आणि हलकं जेवण घ्यावं. त्यामुळे, लिव्हरला मोठा आराम मिळेल.

3️ प्रथिनांचे प्रमाण (Protein) व्यवस्थित ठेवा:

लिव्हरची दुरुस्ती ही प्रथिनांशिवाय होत नाही.म्हणून प्रत्येक जेवणात, डाळ, कडधान्य,दही / पनीर, अंडी / मासे (जे चालत असेल) यांचे सेवन करावं. आहारात नेहमी,थोडं का होईना, पण प्रथिन असायलाच हवं.

4️ Refined Carbs कमी करा:

            आहारातील Refined Carbs जसे की, मैदा, बेकरी पदार्थ, बिस्किटं आणि पॅकेज्ड स्नॅक्स हे सगळं

लिव्हरमध्ये फॅट साठवतं. म्हणून ते शक्यतो बंद करा. साधं घरचं अन्न हेच लिव्हरसाठी सर्वात सुरक्षित असतं.

5️ Alcohol = Reset चे Pause Button:

थोडंसुद्धा अल्कोहोल, लिव्हरची “रिसेट प्रोसेस” थांबवतं.जर खरंच मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, तर थोडा ब्रेक घ्यावा लागेल.

6️ जेवणानंतर 10–15 मिनिटं चालणं:

Post-meal walking मुळे लिव्हर फॅट कमी होतं आणि इन्सुलिन रेसिस्टन्स सुधारतो. उपाय,मोफत

सुरक्षित आहे आणि अतिशय प्रभावी आहे.

7️ झोप – लिव्हरचा मुख्य healer:

दररोज 7–8 तासांची झोप आवश्यक आहे. कारण मेटाबॉलिझम सुधरविण्यासाठी यापेक्षा प्रभावी  कोणतेही सप्लिमेंट नाही. झोप कमी घेतली तर त्याचा लिव्हरवर जास्त ताण येतो आणि मेटाबॉलिझम मंदावतो.  

8️ Stress कमी नसेल तर लिव्हर heal होत नाही:

दीर्घकालीन ताण राह्यल्यामुळे Cortisol वाढतो आणि लिव्हर फॅट वाढतं.त्यासाठी शांत श्वास,
थोडी विश्रांती, मनाला मोकळीक हे ही उपचारच आहेत.

9️ Detox pills नकोत, routine बदला:

लिव्हर स्वतःच डिटॉक्स करतो. आपण फक्त चुकीचं खाणं, चुकीचं वेळापत्रक आणि चुकीची झोप हे यातील अडथळे दूर करायचे आहेत.

🔟 Consistency > Intensity:

हे सारे उपचार फक्त एक आठवडा परफेक्ट नको.तर हे तीन महिने सातत्याने केले पाह्यजे आणि ते  
थोडं-थोडं सुधारायला हवं. हेच खरं ‘लिव्हर रिसेट’ आहे.  

समारोप:

थोडक्यात मेटाबॉलिझम कोणत्याही पावडरने, किंवा शॉर्टकटने रीसेट होत नाही. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय तो तेव्हा सुधारतं, जेव्हा लिव्हर ठीक असतं. आणि लिव्हर ठीक असणं, हे योग्य आणि योग्य वेळी  खाणं, योग्य वेळी आणि आवश्यक तेवढी झोप आणि  कमीतकमी ताण.तेव्हा या 10 उपायांवर काम करणं सुरू करा.   

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. अतिशय उपयुक्त माहिती
    लिव्हर हा आपल्या शरीरातील खूप महत्वाचा अवयव आहे, त्याची योग्य काळजी घेतली तर metabolism ची काळजी करायची गरजच नाही
    पण या ब्लॉग मधील ऊपाय प्रामाणिकपणे केले पाहिजेत
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...