Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह बरा होऊ शकतो का?

ब्लॉग नं. 2025/031 

दिनांक: 31 जानेवारी, 2026.  


मित्रांनो,    

शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह बरा होऊ शकतो का?

आजवर मधुमेह (Diabetes) म्हणजे आयुष्यभर साथ देणारा आजार, अशीच आपली ठाम समजूत होती.गोळ्या, इन्सुलिन, आहार नियंत्रण, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल याच गोष्टींवर मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा भर दिला जात होता. “मधुमेह बरा होत नाही, फक्त नियंत्रणात ठेवता येतो” हे वाक्य आपण अनेकदा ऐकले आहे.

मात्र अलीकडेच AIIMS (दिल्ली) येथील शस्त्रक्रिया विभागातील डॉ. मंजुनाथ यांनी केलेल्या एका विधानामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि रुग्णांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. आपण आजच्या ब्लॉगमध्ये या विषयी विस्ताराने जाणून घेऊ. 

सविस्तर:

डॉ. मंजुनाथ मते, “मेटाबॉलिक सर्जरी (Metabolic Surgery)” या विशेष शस्त्रक्रियेमुळे अनेक टाइप-2 मधुमेह रुग्णांचे रक्तातील साखर प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रणात येते आणि काही रुग्णांना तर औषधांची गरज जवळजवळ संपते. पण प्रश्न असा उभा राहतो की,ही शस्त्रक्रिया प्रत्येक मधुमेही रुग्णासाठी आहे का? ती सुरक्षित आहे का? आणि मधुमेह खरोखरच ‘बरा’ होतो का? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर समजून घेऊया.

मेटाबॉलिक सर्जरी म्हणजे नेमके काय?

मेटाबॉलिक सर्जरी ही बॅरिएट्रिक सर्जरीसारखीच एक शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत पोट आणि आतड्यांची रचना बदलली जाते, ज्यामुळे शरीरातील पचनप्रक्रिया आणि हार्मोन्सचे कार्य बदलते.या शस्त्रक्रियेमुळेइन्सुलिनची कार्यक्षमता (Insulin Sensitivity) वाढते. रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या कमी होते

वजन घटते, आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी होण्यास मदत होते.  महत्त्वाचे म्हणजे, ही शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपिक पद्धतीने (छोट्या चिरांमधून) केली जाते, त्यामुळे वेदना कमी आणि रिकव्हरी जलद होते.

ही शस्त्रक्रिया कोणासाठी योग्य आहे?

डॉ.मंजुनाथ यांच्या मते, मेटाबॉलिक सर्जरी सर्व मधुमेही रुग्णांसाठी नाही. ती खालील रुग्णांसाठीच उपयुक्त ठरू शकते,

1.टाइप-२ मधुमेह असलेले रुग्ण

2.ज्यांची साखर औषधे व इन्सुलिन घेऊनही नियंत्रणात येत नाही

3.ज्यांना दीर्घकाळापासून मधुमेह आहे

4.अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणा (High BMI) असलेले रुग्ण

5. औषधांचा अपेक्षित परिणाम न होणारे रुग्ण

टाइप-1 मधुमेह असलेल्या रुग्णांना ही शस्त्रक्रिया उपयोगी ठरत नाही, कारण त्यांच्या पॅन्क्रियामधून इन्सुलिन तयारच होत नाही. त्यामुळे आजाराचे मूळ कारण वेगळे असते.

शस्त्रक्रियेपूर्वी कोणती तपासणी केली जाते?

ही शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टर रुग्णाची सखोल तपासणी करतात. 

1. वय

2. हृदयाची क्षमता

3. मूत्रपिंड (Kidney) कार्य आणि इतर आजार. 

4. मधुमेहाचा कालावधी,

5. सध्याची औषधे. 

या सगळ्या घटकांचा विचार करूनच शस्त्रक्रिया सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल का याचा निर्णय घेतला जातो.

मेटाबॉलिक सर्जरी कशी कार्य करते?

या शस्त्रक्रियेत, पोटाचा आकार कमी केला जातो आणि आतड्यांचा काही भाग बायपास केला जातो. यामुळे, अन्न वेगळ्या पद्धतीने पचते, इन्सुलिनशी संबंधित हार्मोन्स अधिक प्रभावी होतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात येते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कठोर आहारनियम, व्यायाम आणि जीवनशैली बदल पाळावे लागतात. शस्त्रक्रिया म्हणजे जादू नाही; ती एक संधी असते — योग्य बदल केल्यासच दीर्घकालीन फायदा होतो.

शस्त्रक्रियेसाठी तुमची साखर किती असायला हवी? (ADA मार्गदर्शक तत्त्वे):

HbA1c

सामान्य: 5.7% पर्यंत,

प्री-डायबेटीस: 5.7% – 6.4%,

मधुमेह: 6.5% किंवा अधिक,

उपाशी रक्तातील साखर (Fasting),

सामान्य: 100 mg/dL पेक्षा कमी

प्रि-डायबेटीस: 100 – 125 mg/dL,

मधुमेह: 126 mg/dL किंवा अधिक

जेवणानंतरची साखर (Post-meal):

सामान्य: 140 mg/dL पेक्षा कमी,

प्रीडायबेटीस: 140 – 199 mg/dL,

मधुमेह: 200 mg/dL किंवा अधिक. 

समारोप: 

मेटाबॉलिक सर्जरी ही टाइप-2 मधुमेहासाठी एक आशेचा किरण नक्कीच आहे, पण ती सर्वांसाठी नाही तसेच ती हमखास ‘क्युअर’ नाही. डॉक्टरांच्या सखोल तपासणीनंतरच करावी लागते. तसेच मधुमेहावर अंतिम उपाय म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि गरज असल्यास, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असू शकतो — पण तोही योग्य रुग्णांसाठीच. आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेताना नेहमी भावनेपेक्षा वैज्ञानिक सल्ल्यावर विश्वास ठेवा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  



Comments

  1. प्रसाद सर, आजचा ब्लॉग अतिशय उपयुक्त आहे
    माझ्या बाबतीत शस्त्रक्रिया करायची गरज नसावी असे वाटते
    मी थोडा ओव्हरवेट आहे, पण ओबेस नाही, औषधाने माझी शुगर नियंत्रित आहे. फक्त माझ्या जीवनशैलीत मला अजूनही प्रगतीला वाव आहे
    पण शस्त्रक्रियेची गरज नाही
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...