Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

हिवाळ्यात ओठाजवळची त्वचा काळी कां पडते?

 ब्लॉग नं:2025/367.

दिनांक:31 डिसेंबर,2025.


मित्रांनो,

हिवाळा आला की,शरीरावर त्याचा काही ना काही परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम दिसून येतो.जसे की, हिवाळ्यात त्वचा ओठांजवळ काळवंडते, त्वचा ताणली जाते आणि झोंबते. त्वचा पांढरी पडते आणि त्वचेला खाज सुटणे वगैरे. यावर वेळीच उपाय करा, नाहीतर हा त्रास वाढू शकतो…ओठांवरील त्वचा काळी कां पडते, हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

सविस्तर:  

हिवाळा आला की अनेक जणांना एक समान त्रास जाणवतो.ओठांच्या बाजूची त्वचा कोरडी पडणे, तोंड उघडताना आग होणे, त्वचा ताणल्यानंतर ती झोंबणे, कधी भेगा पडणे आणि हळूहळू तो भाग काळपट होणे.
सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो, पण वेळेवर लक्ष दिले नाही तर तो दीर्घकाळ टिकणारा आणि चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवणारा ठरू शकतो.हा त्रास फक्त बाहेरील हवामानामुळे होतो असे नाही; अनेकदा त्यामागे शरीरातील अंतर्गत असंतुलनही कारणीभूत असते.

हा त्रास नेमका का होतो?

1) त्वचेतील ओलावा कमी होणे:

थंड व कोरडी हवा, वारंवार गरम पाण्याने चेहरा धुणे, जास्त फेसाळ किंवा कठोर साबणांचा वापर यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.ओठांच्या आजूबाजूची त्वचा आधीच नाजूक असल्याने ती लवकर कोरडी पडते आणि ताणली गेल्यासारखी वाटते.

2) पाणी कमी पिणे:

शरीराला आतून पुरेसे पाणी मिळाले नाही की,त्याचा परिणाम सर्वात आधी ओठांवर आणि तोंडाच्या कडांवर दिसतो.ओठ कोरडे पडतात, फुटतात आणि काळवंडू लागतात.

3) चुकीच्या सवयी:

जसे की,ओठ वारंवार चाटणे, कोरड्या ओठांवर दात लावणे, हाताने सतत त्या भागाला स्पर्श करणे या सवयींमुळे त्वचा अधिक संवेदनशील होते आणि भेगा वाढतात.

4) पोषणाची कमतरता:

काही वेळा हा त्रास व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स, लोह (आयर्न) किंवा झिंकच्या कमतरतेमुळे होतो.
त्यामुळे ओठांजवळ आग होणे, सूज येणे, त्वचा फुटणे आणि काळेपणा वाढणे अशी लक्षणे दिसतात.

5) आयुर्वेदिक दृष्टीने:

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात वात वाढतो, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो. त्यासोबत थोडे पित्त वाढले की जळजळ, आग आणि काळपटपणा अधिक जाणवतो.

तोंड उघडताना आग का होते?

ओठांच्या बाजूला पडलेल्या सूक्ष्म भेगा तोंड उघडताना ताणल्या जातात.त्यामुळे जळजळ होते. हा कोरडेपणा आणि जळजळ दीर्घकाळ राहिली तर त्या भागाची त्वचा जाड आणि काळी पडू लागते आणि नंतर तो काळेपणा सहज जात नाही.

वेळीच उपाय काय करावेत?

🌿 आतून शरीराला ओलावा द्या, ज्यासाठी दिवसातून पुरेसे पाणी प्या,  आहारात तूप, थोडे तेलकट पण पचायला हलके पदार्थ, दूध, ताक, सूप, भाजीपाला आणि फळे यांचा समावेश करा

🌶️ काय टाळावे?

फार कोरडे पदार्थ टाळावेत,तसेच खूप थंड, फार तिखट किंवा मसालेदार अन्न खाऊ नये आणि जास्त चहा-कॉफीचे सेवन करू नका.  

🧴 बाह्य काळजी:

चेहऱ्याला आणि ओठांजवळ नियमित मॉइश्चरायझर लावा, सौम्य, केमिकल-फ्री फेसवॉश वापरा आणि ओठांसाठी चांगला लिप बाम वापरा

⚠️ औषधोपचार:

जर, भेगा खोल असतील, सतत आग होत असेल आणि काळेपणा वाढत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.कारण हा काळेपणा काही वेळा कायमस्वरूपी होऊ शकतो आणि चेहरा काळवंडलेला दिसू लागतो.

समारोप:

हिवाळ्यात ओठांजवळ होणारा कोरडेपणा आणि काळेपणा हा फक्त सौंदर्याचा प्रश्न नाही, तर तो शरीरातील पाण्याची कमतरता, पोषणातील त्रुटी आणि त्वचेच्या आरोग्याचा इशारा असू शकतो. वेळीच योग्य काळजी घेतली, तर हा त्रास सहज टाळता येतो.लहान वाटणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्या मोठा त्रास बनू शकतात,हे लक्षात ठेवा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.   

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

 

 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...