Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

एअर कंडिशनर बाबत केंद्राचे नवे धोरण

ब्लॉग नं:2025/172.

दिनांक: 22 जून, 2025. 

मित्रांनो,

कधी तरी तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य किंवा जोडीदार,यांच्यात एसीच्या तापमानावरून वाद झाला असेल. टीम 18°C च्या सदस्यांना थंडगार वातावरण हवे असते, तर टीम 24°C ला सौम्य थंडावा हवा असतो. मात्र, लवकरच हे "शीतयुद्ध" संपुष्टात येऊ शकते.कारण केंद्र सरकार संपूर्ण भारतात,एसी तापमानाचे नियमन लागू करण्याची योजना आखत आहे.आजचा ब्लॉग या विषयावर आहे.

सविस्तर:

सरकारचा प्रस्ताव आणि त्यामागील कारणे:

नवीन प्रस्तावानुसार,एसीचे आता 20°C पेक्षा कमी किंवा 28 °C पेक्षा जास्त तापमान सेट करता येणार नाही.सरकारचा हेतू कोणाच्या झोपेची काळजी घेणे नसून वीज बचतीचा आहे.2010 पासून,भारतात एसी वापरणाऱ्या घरांची संख्या तिप्पट झाली आहे.परिणामी, विजेची मागणीही 20% ने वाढली आहे. भारतात सध्या थंड होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण एकूण विजेच्या 10% इतके आहे.

एसी तापमान आणि ऊर्जा बचत:

एसी तापमान 24-26°C दरम्यान ठेवले तर वीजेची बचत होऊ शकते.तापमान 20°C वरून 24°C पर्यंत वाढवल्यास वीज वापर 24% पर्यंत कमी होतो. यामुळे ग्राहकांचे विजेचे बिल कमी होऊन,देशाला लाखो कोटी रुपयांची बचत करता येईल.

इतर देशांत काय आहे:

इटली,स्पेन,जपानसारख्या देशांनीही,सार्वजनिक ठिकाणी एसी तापमान नियंत्रित करण्याचे नियम लागू केले आहेत. मात्र, भारतीय हवामानातील उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेता,आपल्याला वेगळ्या उपायांची गरज आहे.

रस्त्यांवरील उष्णतेचा परिणाम आणि उपाय:

भारतातील डांबरी रस्त्यांमुळे उष्णता शोषली जाते आणि आसपासच्या परिसराचे तापमान वाढते. यावर उपाय म्हणून थंड पृष्ठभागाचा वापर, पांढऱ्या रंगाचा कोटिंग, तसेच उष्णता-प्रतिबंधक रस्ते वापरण्याचे प्रयोग होऊ शकतात. ठाणे आणि लॉस एंजेलिसमधील उदाहरणे यशस्वी ठरली आहेत.

भारतीय वास्तुकला: उपायांचा वारसा

भारतीय पारंपरिक वास्तुकलेतून प्रेरणा घेऊन,उष्णतेचा परिणाम कमी करण्याचे उपाय करता येऊ शकतात.जाली,जाड भिंती,सावली देणारे डिझाइन अशा गोष्टी उष्णतेपासून संरक्षण करतात.नोएडातील मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसने जाली-आधारित डिझाइन वापरून LEED प्लॅटिनम रेटिंग मिळवले आहे.

कर धोरणांमध्ये सुधारणा:

सध्या एसीला 28% GST लागू आहे. यामुळे स्वस्त आणि कमी कार्यक्षम मॉडेलला प्राधान्य दिले जाते. परंतु,एसीच्या कार्यक्षमतेवर आधारित कर धोरण राबवले तर ग्राहक अधिक कार्यक्षम मॉडेल निवडतील, ज्यामुळे विजेची आणि खर्चाची बचत होईल.

संपूर्ण दृष्टीकोनाची गरज

सरकारने केवळ एसी तापमान नियंत्रित न करता,रस्ते,घरे,शहरे यांची रचना,तसेच कर धोरणांमध्ये सुधारणा केली, तर वीज बचतीसाठी व्यापक उपाययोजना करता येईल.शेवटी, ही योजना दीर्घकालीन लाभासाठी उष्णता नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

समारोप:

            एसीच्या तापमानाचे नियमन करून जर ग्राहकांचे पैसे वाचत असतील आणि त्यासोबत विजेची बचत होत असेल तर सोने पे सुहागा. इतर देशातील अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले गेले तर चांगलेच आहे.असं मला वाटतं.तसेही खूप कमी तापमान ठेवणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.त्यासोबत मला असं वाटतं की दर वर्षी एसीचा मेंटेनेंस केला तर देखील वीचेची आणि पर्यायाने पैश्याची बचत होऊ शकते.     

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

         

           


 



Comments

  1. सुंदर माहिती दिली आपण साहेब.

    ReplyDelete
  2. छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...