Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

बीट रुट: एक आरोग्यदायी कंदमूळ

ब्लॉग नं:2025/176.

दिनांक: 26 जून, 2025. 

मित्रांनो,

बीट रुट हा एक पोषणाने समृद्ध असा कंदमुळाचा प्रकार आहे. त्याचा स्वाद गोडसर असून, रंग गडद लालसर असतो. बीट रुटमध्ये शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचा समावेश आहे, ज्यामुळे तो आहारात नियमित समाविष्ट केल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.आजचा ब्लॉग हा बीट रुटचे फायदे, मधुमेही याचं सेवन करू शकतात कां? आणि  बीट रुटचा आहारात कसा समावेश करावा,याविषयी आहे.   

सविस्तर:

         सर्वप्रथम आपण बीट रुट सेवनाचे फायदे काय आहेत? त्यानंतर त्यांत कोणती पोषणमूल्ये असतात आणि मधुमेही लोकांना त्याचे सेवन करता येतं कां? या विषयी माहिती घेऊ.     

बीट रुट सेवनाचे फायदे:

बीट रुट हे एक सुपरफूड म्हणून ओळखला जाते. त्याचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत:

1. रक्ताभिसरण सुधारते:

बीट रुटमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यास मदत करते. यामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

2. रक्तदाब नियंत्रित ठेवतो:

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी बीट रुटचा आहारात समावेश केल्यास,त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

3. ऊर्जा वाढते:

बीट रुटमुळे उर्जेचा स्तर वाढतो. व्यायाम किंवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी तो विशेषतः उपयुक्त आहे. ज्यामुळे माणूस ताजातवाना रहातो.   

4. जखमा लवकर भरतात:

बीट रुटमध्ये असलेले लोह आणि फोलेट नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात,त्यामुळे जखमा लवकर भरन येतात.

5. मधुमेह नियंत्रणात ठेवतो:

बीट रुटमध्ये गोडसर स्वाद असूनही त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे तो मधुमेहींसाठी सुरक्षित आहे.पण बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बीट खाऊ नये असा सल्ला देतात. म्हणून मेधूमेहींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.   

मधुमेहींनी बीट रुटचे सेवन कसे करावे?

मधुमेहींनी बीट रुटचे सेवन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

मर्यादित प्रमाणात सेवन करा:

दररोज 100-150 ग्रॅम बीट रुट खाल्ल्यास फायदा होतो. मात्र, अति सेवन टाळावे.

कच्च्या स्वरूपात खावे:

बीट रुटचा कच्च्या स्वरूपात वापर सलाडमध्ये केल्यास जास्त फायदेशीर ठरतो.

रस तयार करा:

बीट रुटचा रस काढून सकाळी उपाशी पोटी अर्धा कप सेवन करा.यात गाजर आणि लिंबाचा रस मिसळल्यास अधिक गुणकारी ठरेल.

बीट रुटचा आहारात उपयोग

इतरांनी बीट रुटचा आहारात कसा समावेश करावा,हे बघू या.  

1. सूप:

बीट रुटचे सूप स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये आले आणि मिरपूड घालून स्वाद वाढवता येतो.

2. सलाड:

कापलेला बीट रुट, टोमॅटो, काकडी, आणि लिंबू रसाबरोबर मिसळून स्वादिष्ट सलाड तयार करता येते.

3. भाजी:

बीट रुटची हलकी परतलेली भाजी पोळीसोबत खाण्यासाठी उपयुक्त असते.

4. स्मूदी:

बीट रुट, दही, आणि मध घालून स्मूदी तयार करता येते, जी पोषणमूल्यांनी समृद्ध असते.

5. चटणी:

उकडलेल्या बीट रुटपासून स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक चटणी तयार करता येते.

समारोप:

बीट रुट हा एक साधा पण अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. याचा नियमित आहारात समावेश केल्यास विविध आजारांपासून संरक्षण मिळते आणि एकंदर आरोग्य सुधारते. मधुमेहींनी मर्यादित प्रमाणात आणि योग्य प्रकारे बीट रुटचे सेवन केल्यास त्याचा उपयोग होतो. चला, आजपासूनच बीट रुट आपल्या आहारात समाविष्ट करूया. पण मी वर लिहिल्याप्रमाणे बरेच डॉक्टर मधुमेहींनी बीट रूट गोड असल्याने खाऊ नये,असे सुचवितात. बीट रूटचा ग्ल्याईसेमिक इंडेक्स हा 61 इतका आहे,आणि ग्ल्याईसेमिक लोड केवळ 5 एवढंच आहे. मधुमेहींनी आपल्या आहारात बीट रूटचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.    

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...