Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

घर विकत घेताना घ्यायची काळजी

 ब्लॉग नं  2025/102.

दिनांक: 13 एप्रिल, 2025. 

मित्रांनो,

            परवाच मी माझ्या या वर्षीच्या 100 व्या ब्लॉगमध्ये आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँक यांनी त्यांच्या कर्ज दरांमध्ये 35 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे असे लिहिले होते. इंडियन बँकेचा नवीन दर 8.70%, पीएनबीचा 8.85 %, बँक ऑफ इंडियाचा 8.85 % आणि युको बँकेचा दर 8.80% आहे हे देखिल लिहिले होते.आता गृह कर्जाचा EMI कमी होणार म्हटल्यावर बरेच जण गृह कर्ज घेण्याचा विचार करत असतील,तर त्यासाठीच घर विकत घेण्यासाठी काय काळजी घ्यावी,यावर आजचा ब्लॉग लिहीत आहे.             

सविस्तर:

            आज काल स्वतःचे घर हे सेवानिवृत्तीच्या आधी किंवा सर्व जबाबदाऱ्यातून सुटका झाल्यावर विकत घ्यायचं वगैरे गोष्टी जशा इतिहासजमा झाल्या.तसचं स्वतःच घर एकदाच होतं,वगैरे ही कन्सेप्ट सुद्धा जुनी झाली.एकाच आयुष्यात दोन तीन घरे विकत घेणारे मी बघितलेत आणि तुम्ही बघत असाल.पण म्हणून घर घेणे ही सोपी गोष्ट नाही,कारण त्यात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतलेला असतो.त्यामुळे सावधानी ही आज देखिल घ्यावी लागतेच.तर यातील महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे.  

1.   30 वर्षाचा सर्च रिपोर्ट:- तुम्ही होम लोन घेऊन घर घेत असाल तर तुमची बँक तुम्हाला सर्च रिपोर्ट वकिलाकडून काढून घ्यायला सांगेलच.पण एखादी बँक सांगत नसेल किंवा तुम्ही स्वतःच्या पैशाने घर घेत असाल,तरी सर्च रिपोर्ट एखाद्या ओळखीच्या वकिलांकडून काढून घ्या. सर्च रिपोर्ट मध्ये गेल्या तीस वर्षात त्या घराचे title म्हणजे मालकी कितीदा आणि कुणाकडून कुणाकडे ट्रान्सफर झाली हे दिलेले असते. त्या सोबतच त्या मालमत्तेवर कुठल्या बँकेचा/वित्तीय संस्थेचा बोजा आहे कां? हे लिहिलेले असते.वर्तमान मालकाचा मालकी हक्क वैध आहे कां? हे लिहिलेले असते.ती मालमत्ता कुठल्याही वादात गुंतलेली नाही,हे जाणून घेता येते.वकील त्या मालमत्तेचा नकाशा सोबत जोडत असतो.त्यात मालमत्तेकडे जाण्यास वैध रास्ता (valid approach road)आहे कां हे बघून घ्यावे.तेव्हा सर्च रिपोर्ट हे अतिशय महत्वाचे दस्तावेज आहे,हे लक्षात ठेवावे.

2.   जुना फ्लॅट घेत असल्यास 1.जर फ्लॅट नोंदणीकृत सोसायटीमध्ये असेल तर,सोसायटी ड्यूज् up-to-date भरलेले आहे ना हे तपासून घ्यावे.  2. एमएसईबी चे बिल भरलेले आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे. 3. प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे.4. प्रॉपर्टी कार्डवर किंवा इंडेक्स II वर कुठलाही बोजा नाही हे तपासून घ्यावे. 5. सोसायटीचे भागधारक प्रमाणपत्र पाहून घ्यावे.की त्यावर वर्तमान घर मालकाचे नावं आहे किंवा नाही.

3.   नवीन फ्लॅट घेतेवेळी या सोबत बँक करुन घेत असेल तर ठीक आहे. अन्यथा वॅल्यूएशन रिपोर्ट एखाद्या रजिस्टर्ड आर्किटेक्ट कडून घ्यावा.त्यावरुन घराचे government वॅल्यूएशन, मार्केट वॅल्यू इत्यादि गोष्टी कळतात.आपल्याकडून घराचा/फ्लॅटचा योग्य भाव आकाराला जात आहे की नाही हे तपासून पाहता येते.

4.   कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या: घर घेत असतांना तुमचे पॅन कार्ड,आधार कार्ड हे लागतेच.या गोष्टी रजिस्ट्रार ऑफिसमधे लागतात.स्टॅम्प ड्यूटी,रजिस्ट्रेशन फी ही योग्य आकारली जाते आहे ना, हे तपासून घ्या. खरेदी खत पूर्ण वाचून घ्या. सर्च रिपोर्ट,घराची जुनी registry आणि खरेदी खतात मालमत्तेचा योग्य उल्लेख आहे ना हे बघून घ्या.तुमचे नांव,वय,पॅन नंबर,कर्ज घेतले असल्यास बँकेचे नांव,कर्जाची रक्कम,खरेदी खताची रक्कम हे सारे बरोबर आहे ना,हे तपासून घ्या.कारण एखादी चूक महागात पडू शकते.कारण ती सुधरविण्यासाठी करेक्शन डीड करावे लागेल आणि त्यात वेळ आणि पैसा व्यर्थ वाया जाईल.

5.   CIBIL रिपोर्ट पाहून घ्या: होम लोन घेत असाल तर तुमचा CIBIL रिपोर्ट बँक काढून घेईल. CIBIL स्कोर प्रमाणे व्याजाचा दर निश्चित करण्यात येतो.म्हणून CIBIL कार्ड चांगले ठेवा.बँक लोन साठी सॅलरी स्लिप,फोरम 16, इन्कमटॅक्स रिटर्नची गरज पडते.बँकेचे स्वीकृती प्रमाणपत्र नीट वाचा.काही hidden टर्म्स नाहीत ना, म्हणजे होम लोनची माहिती देतांना न सांगितलेल्या टर्म्स नाहीत ना,हे नीट वाचून पहा.

सारांश

            बँक लोन घेत असतांना देखिल सर्व दस्तावेज तपासून घ्याच,कारण लोन बँक देत असली तरी घर आपलं आहे.त्यामुळे सर्व काही तपासून घ्या.घर घेत असतांना तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा शंका असल्यास तुम्ही माझ्या मेल आयडीवर संपर्क करू शकता.हा सल्ला मोफत असेल (मोल आकारणार नाही),पण म्हणून मोलाचा नसेल असे नाही.माझा मेल आयडी pknatoo25360@gmail.com आहे.   

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.                                       

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...