Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

HDFC BANK चा क्रेडिट डिपॉजिट रेशो

Blog No. 2024/ 166.  

Date: 28th ,July 2024



मित्रांनो,

            कुठल्याही बँकेचा व्यवसाय हा प्रामुख्याने डिपॉजिट म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणे. ठेवीवर व्याज देणे आणि कर्जदारांकडून कर्ज उपलब्ध दिल्याबद्दल व्याज आकारणे आणि यामाध्यमातून नफा कमविणे अर्थात आस्थापनेचा आणि इतर खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम होय.या व्यवहारात क्रेडिट डिपॉजिट रेशो म्हणजे दिलेले कर्ज आणि एकूण ठेवी यांचे गुणोत्तर सांभाळले जाते.उच्च गुणोत्तर हे सूचित करू शकते की बँकेकडे अनपेक्षित निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरलता नसेल.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 75% चे प्रमाण आरामदायक मानते.म्हणजेच ठेवी रु.100/- च्या असतील आणि कर्ज रु. 75/-चे असेल तर हा रेशो 75% असतो.हे रु.25/- चे अंतर यासाठी ठेवण्यात येते,कारण कर्जाची परतफेड झाली नाही तरी डिपॉजिट ठेवीदाराने जेव्हा परत मागितले तेव्हा ते परत द्यावे लागते. HDHC बँकेचा क्रेडिट डिपॉजिट रेशो हा 104% झाला आहे. हा क्रेडिट डिपॉजिट रेशो चालतो कां? नाही.आज या विषयावर आहे माझा ब्लॉग.

सविस्तर:

जुलै २०२३ रोजी एचडीएफसी बँकेत एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण झाल्यानंतरएचडीएफसी बँकेला काही आव्हानांचा सामना करावा लागला आहे,विशेषत: क्रेडिट-ठेवी (सीडी) गुणोत्तराबाबत. विलीनीकरणामुळे बँकेच्या सीडी रेशोवर लक्षणीय परिणाम झाला आहेजो त्याच्या पोर्टफोलिओमध्ये गृहकर्जांच्या मोठ्या प्रमाणात जोडल्यामुळे वाढला आहे. विलीनीकरणापूर्वीएचडीएफसी बँकेचे सीडी प्रमाण सुमारे 86% होतेपरंतु विलीनीकरणानंतरते 104% झाले आहे.

हे असे कां झाले तर एचडीएफसी लिमिटेड हे फक्त गृह कर्ज देत होते,त्यांच्याकडे ठेवीचा पोर्टफोलिओ त्या प्रमाणात नव्हता. त्यांची सगळी कर्ज एचडीएफसीने बँक स्वतःकडे घेतलीत.त्यामुळे आधीच 86% असलेला हा रेशो आता 100% झाला.भारतात राष्ट्रीयकृत बँकेचे असे झाले असते तर केवढी मोठी बातमी झाली असती. पण ती एचडीएफसी आहे,त्यामुळे अजूनही काही हो हल्ला झाला नाही. असे सांगितले जाते की याच्यातून मार्ग काढण्यासाठी एचडीएफसी धोरणे आहेत.बँकेने आपला ठेव बेस वाढविण्यावर आणि गुणोत्तर योग्य प्रमाणावर आणण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.यासाठी अधिक रिटेल आणि कॉर्पोरेट ठेवी आकर्षित करण्यासाठी बँक तिच्या विस्तृत शाखा नेटवर्क आणि डिजिटल चॅनेलचा लाभ घेत आहे. ग्राहकांची संलग्नता वाढवणे आणि आकर्षक ठेव योजना ऑफर करणे हा या धोरणाचा एक भाग आहे. एचडीएफसी बँक विलीनीकरणानंतर आलेल्या उच्च किमतीच्या कर्जाशी संबंधित खर्चाचे व्यवस्थापन करत आहे. जेथे शक्य असेल तेथे कमी दराने पुनर्वित्त प्राप्त करून आणि एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करून हे खर्च कमी करण्याचे मार्ग ते शोधत आहेत.

असे जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करणे सोपे काम नाही. एचडीएफसी बँकेच्या एकूण ठेवी 18 लाख कोटी आहे. अगदी 90% पर्यन्त क्रेडिट डिपॉजिट रेशो आणायचा तरी रु.180,000 कोटी एवढे डिपॉजिट जमा करावे लागेल.हे सोपे काम नाही.104% क्रेडिट डिपॉजिट रेशो असतांना येणारे संभावित अडथळे.

1.        कर्जात एनपीएचे प्रमाण वाढू देऊन चालणार नाही.

2.       कर्ज देखिल मोठ्या प्रमाणात देता येणार नाही.

3.       जी गृह कर्ज एचडीएफसी लिमिटेड कडून घेतलेली आहेत. ती गृह कर्ज असल्याने जास्त व्याज म्हणजे जास्त उत्पन्न मिळवून देणारी कर्ज नाहीत.याचा कुठे तरी परिणाम नफ्यावर झाल्याशिवाय रहाणार नाही.कारण याचा समतोल घडवून आणण्यासाठी जास्त व्याजाची कर्जे मोठ्या प्रमाणावर द्यावी लागतील ते शक्य नाही.   

4.       एचडीएफसीच्या ठेवीदारांनी जर बँकेकडे मोठ्या प्रमाणावर धांव घेतली तर मुश्किल होऊ शकते.

पण असे होणार नाही.कारण एचडीएफसी एक व्यापारी बँक आहे,पण मी संभावना वर्तविल्या.

समारोप:

एचडीएफसीने आपला कॅपिटलचा बेस आढविण्याचे ठरविले आहे. तसेच एनपीए अॅसेटची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याचे ठरविले आहे. बघूया काय होतं. कारण शेअर बाजार एचडीएफसी बँकेबाबत आशावादी दिसतोय.  

        तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.     

 

 प्रसाद नातुपुणे



Comments

  1. छान माहिती दिली.

    ReplyDelete
  2. अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment