Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

प्रदूषणमुक्त फटाके- एक वास्तव?

 Blog No.2023/288

Date: -16th, November 2023.

 

मित्रांनो,

            मी माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये शिवकाशीतील फटाका उद्योगाचा ओझरता उल्लेख केला होता. शिवकाशीतील फटाका उद्योगाला देशातील वाढत्या प्रदूषणाचा फटका बसला आहे. फटाक्यात वापरले जाणारे बेरियम हे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याने,सूप्रीम कोर्टाने बेरियमयुक्त फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी घातल्याने हा उद्योग संकटात आला आहे. आज आपण बघूया की या उद्योगाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली. 

प्रास्ताविक

            शिवकाशीतील फटाका उद्योग कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.साधारणतः एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या दशकातील गोष्ट आहे.तेव्हाच्या मद्रास राज्यातील दोन तरुण चुलत भाऊ शनमुगा आणि अय्या नाडर यांनी सुरुवातीला काड्याची पेटी म्हणजे माचिसच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.त्या नोकरीतून त्यांना जे काही शिकायला मिळाले,त्यातून त्यांच्या लक्षात आले की आपण जे काही शिकलो आहे, त्या शिक्षणाचा उपयोग आपण एखादा कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी केला तर गावातच आपल्याला स्वतःचा रोजगार मिळेल आणि इतरांना देखिल रोजगार पुरविता येईल.त्यांचा माचिस बनविण्याचा उद्योग आणि फटाक्याचा उद्योग यांचा जवळचा संबंध असल्याने त्यांनी फटका उद्योग सुरू केला.अशा रितीने शिवकाशीतील फटाक्याच्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. 

आजचे या उद्योगाचे स्वरूप

            आज शिवकाशी हे गांव फटाका उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले असून, भारतातील फटाक्यांच्या एकूण उत्पादनाच्या 90% उत्पादन हे भारतातील या गावात होते. साडे सात ते आठ लाख लोकांचे हे रोजगाराचे साधन झाले असून, या उद्योगाची किंमत ही 6000 कोटी रुपे इतकी आहे असे समजते.पण सध्या या उद्योगावर संकट पसरले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे हवेचे प्रदूषण.खरं पाहिलं तर प्रदूषणाच्या कित्येक कारणांपैकी हे एक कारण आहे.पण काही विपरित झाले की त्याचा फटका सामान्य लोकांच्या उद्योगाला आधी बसतो, तसे काहीसे झाले आहे,असे मला वाटते.

            याची सुरुवात झाली 2018 मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने, ज्या फटाक्यामध्ये बेरियम सॉल्टचा वापर केला जातो की ज्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे,अशा फटक्याच्या निर्मितीवर बंदी घातली.बेरीयममुळे फटाके अधिक चमकतात आणि त्यामुळे ते ज्वलनशील देखिल बनतात.तसेच ते फटाके टिकाऊ देखिल होतात.पारंपरिक फटक्याच्या उत्पादनावर आलेल्या बंदीमुळे फटाका उत्पादक संभ्रमित झाले.मानकांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे उत्पादनाला फटका बसला. ते फक्त 60% उत्पादन करू शकले.जर कोणतेही निर्बंध नसते तर या व्यवसायाने यावर्षी 10,000 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असता.

पर्यावरणपूरक फटाके विकसित करण्याची जबाबदारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (CSIR) सोपवण्यात आली आहे. पर्यावरणपूरक फटाके हवेतील लहान सूक्ष्म कण आणि हानिकारक वायूंचे उत्सर्जन 40% पर्यंत कमी करू शकतात. त्यांच्या आवाजाची पातळीही कमी होऊ शकते.पण दुर्दैवाने, हे प्रयत्न संशोधनाच्या पुढे गेले नाहीत.या संशोधनातील माहिती फटाके उत्पादकांना देण्यात आली.परंतु त्यांना पूर्णपणे बेरीयमयुक्त फटाके निर्मितीतून प्रदूषणमुक्त फटाके निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले नाही.कारण या ट्रांजिशनसाठी त्यांना दुप्पट खर्च लागेल हे अपेक्षित होते. कमी प्रदूषक रसायन वापरले तर सामग्रीची किंमत दुप्पट होईल.तसेच हे केमिकल सुकायला जास्त वेळ लागत असल्याने,उत्पादनसाठी वेळही लागेल.कोविड 19 मुळे फटाका उद्योगाला फटका बसला होता.त्यामुळे फटाक्यांची विक्री देखिल कमी झाली. कोविड 19 पश्चात हरियाणा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी फटाक्यांवर निर्बंध घातला.दिल्लीत तर ग्रीन फटाक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. 

सारांश

शिवकाशीतील बहुतेक युनिट्स आता त्यांच्या क्षमतेच्या फक्त 60-70% क्षमतेने कार्य रत आहेत. धूळ प्रदूषण कमीत कमी 30% कमी करण्यासाठी ते फटाक्यांचे CSIR मान्यताप्राप्त ऍडिटीव्हचा वापर करुन उत्पादन करत आहेत.यामुळे उत्पादन देखील कमी होऊ शकते.पण शिवकाशीमधील उत्पादक आता निर्यातीकडे लक्ष पुरवून जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्याची इच्छा बाळगून आहेत.ही एक चांगली गोष्ट आहे. पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मिती सोबत जर निर्यात करुन परकीय चलन देशाला मिळाले,तर यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.                            

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...