Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

कुणाप्रती श्रद्धा असणे गरजेचे आहे

 Blog No.2023/298

Date: -29th, November 2023.

 

मित्रांनो,

            मध्यंतरी तीन चार दिवस एका खासगी कार्यासाठी,अर्थात शुभ-विवाह मंगल कार्यासाठी शेगांवला गेलो होतो.त्यामुळे काल सकाळी ब्लॉग लिहू शकलो नव्हतो आणि आज सकाळी सुद्धा.आज घरी परतल्यावर ब्लॉग लिहायला घेतला गेला.शेगांवला गेलो होतो म्हटल्यावर आज शेगांवच्या श्री संत गजानन महाराज मंदिर आणि तेथील एकंदर व्यवस्थेवर लिहिणे आलेच.कारण तिथे जाऊन आल्यावर लिहावसं वाटतंच. आज एक अत्यंत छोटा ब्लॉग श्री संत गजानन महाराज मंदिर या विषयावर.

 प्रास्ताविक

            या वेळेस पहिल्यांदा “गजानन विसावा” या भक्त निवासात राहण्याचा योग आला.आनंद सागरच्या परिसरात खूप मोठे भक्त निवास उभारले आहे.चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी कार्तिकी पौर्णिमेला असणारी गुरु नानक जयंतीची सुट्टी.भक्तांची प्रचंड गर्दी यावेळेस अनुभवास मिळाली. सगळे भक्त निवास अक्षरशः तुडुंब भरले होते.विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट ही, की पार्किंगची सोय सगळ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेली आहे.एवढा मोठा परिसर पण अतिशय स्वच्छ,कुठेही केर कचरा नाही.सगळं कामं अतिशय पद्धतशीर सुरू होते.चहा आणि अल्पोपहाराची सेवा अगदी अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेली आहे.

            मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो.तर तिथे कार पार्क करण्यासाठी विशाल पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.ही सुविधा मी पहिल्यांदाच बघितली.जवळपास 200 ते 250 कार पार्क करण्यासाठीची व्यवस्था आहे.मंदिर परिसर अतिशय स्वच्छ.कुठेही गोंधळ आणि गर्दी नाही. सारे काही सुचारू पद्धतीने सुरू होते.मंदिरात दर्शनासाठी किती वेळ लागेल हे दर्शन रांगेत प्रवेश करतांनाच दर्शविलेले होते.बाहेर लिहिल्याप्रमाणे 30 मिनिटांत दर्शन झाले.

            माझी मावशी आणि बहीण दोघीही शेगांवचे सासर असल्याने,मी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या 55 वर्षापासून मंदिरात जातो आहे.एक आदर्श मंदिर व्यवस्थापन अशीच ओळख माझ्या मनात अगदी सुरुवातीपासून आहे. याला कारण हे असावे असे वाटते की प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांचे सान्निध्य पाटील परिवारास (मंदिराचे व्यवस्थापक) लाभले आहे.त्यांच्यावरील निस्सीम भक्तीपोटी आणि प्रेमापोटी हा परिवार हे सगळे करत असावा.इतर कित्येक ठिकाणी दर्शनाच्या वेळी,मंदिराचे सेवेकरी म्हणा किंवा तैनात सुरक्षा कर्मचारी म्हणा, दर्शनाच्या जागी ढकलाढकली करतात आणि दर्शनार्थीना व्यवस्थित दर्शन करू देत नाहीत. असे शेगांवला मी आजपर्यन्त कधीच पाहिले नाही. याला कारण जे सेवेकरी आहेत पेड कर्मचारी नाहीत.याचं एक उदाहरण सांगतो.भक्त निवासाच्या कार पार्किंग साठी एक सेवेकरी होता,तो सांगत होता की त्याच्या गांवातील पंचवीस जणांची चमू सेवा देण्यासाठी,या तीन दिवसांच्या सुट्टीनिमित्त आले आहेत.ते एकूण पांच दिवस सेवा देतील आणि मग जवळच्या दुसऱ्या गावातील 25 जणांची चमू येईल अन सेवा देऊन जाईल.हे सेवेकरी  महाराजांचे भक्त आहेत.ते केवळ सेवेसाठी येतात.त्यामुळे त्यांच्याकडून जसे वर्तन अपेक्षित आहेत,तसेच ते देत असतात.असे सेवेकरी इतर मंदिरात असतात की नाही मला माहित नाही,पण शेगांवच्या सेवेकऱ्यांमध्ये समर्पणाची भावना अधिक आहे असेच म्हणावे लागेल.                

 सारांश                                                   

        देवाचे ठिकाण हे स्वच्छ असले पाहिजे,तिथे गडबड गोंधळ नसावा, कारण या गोष्टी जिथे असतील तिथे आपल्यालाच रहावेसे वाटतं नाही,तिथे परमेश्वर वास करत असेल अशी आपण अपेक्षा कशी ठेवायची.लोकांचा धर्मावरचा विश्वास उडाला आहे,वगैरे आजकाल व्हॉटस अप ग्रुपमधून वाचायला मिळाले.त्यात तथ्य नाही.हे मंदिरात दर्शनासाठी जमणाऱ्या प्रचंड गर्दीवरून सिद्ध होते.आजकाल सर्वच मंदिरात गर्दी वाढली आहे. हे लक्षण काही लोकं,अपराध,पापं वाढलेत म्हणून किंवा काळजी,चिता वाढल्यात म्हणून लोक अधिक प्रमाणात दर्शनाला जाऊ लागले आहेत असे म्हणत असतील तर त्यातून देखिल देवाप्रती श्रद्धा वाढली आहे हाच अर्थ निघतो. हे सुलक्षण आहे कारण कुणाप्रती श्रद्धा असणे गरजेचे आहे.   

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...