Blog No.2023/271
Date: - 24th, October 2023.
मित्रांनो,
क्रिकेट विश्वचषक 2023 आता रंगतदार स्थितिकडे वाटचाल करत आहे.काल पाकिस्तान वि अफगाणिस्तान हा सामना खूप चांगला झाला.विश्वचषकातील हा 22 वा सामना.एकूण 45 सामने होणार आहेत.म्हणजे आपण मध्यावर येऊन पोहोचलो आहे.10 टीमस् पैकी 4 संघांचे प्रत्येकी 5 आणि 6 संघांचे प्रत्येकी पाच सामने अजून व्हायचे आहेत. पाकिस्तान वि अफगाणिस्तान सामना कसा खेळला बघू या.
पाकिस्तान वि अफगाणिस्तान
अफगाणिस्तान हा संघ केव्हाही पॉईंट्स टेबल मध्ये उलथापालथ
घडवून टाकू शकतो हे निश्चित. आणि आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.या सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानने 8 विकेटने पराभव करुन या विश्वचषकातील हा तिसरा अपसेट घडवून आणला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी
करताना पाकिस्तानने 282 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने दोन गडी गमावून 286 धावा केल्या आणि सामना जिंकला.
या
सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून २८२ धावा केल्या
होत्या. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली.
बाबरने सर्वाधिक 74 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली.39 व्या ओवरला
पाकिस्तानची धावसंख्या फक्त 215 होती. पण अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि
इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 282 धावांपर्यंत नेले.मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता
आल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले.
मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. गुरबाज
आणि इब्राहिम यांनी पॉवरप्लेमध्येच 60 धावा जोडल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130
धावांची भागीदारी केली. गुरबाज
६५ धावा करून बाद झाला. यानंतर इब्राहिमने रहमत शाहच्या साथीने ६० धावांची भर
घातली. इब्राहिम ८७ धावांवर बाद झाला, पण यानंतर अफगाणिस्तानने एकही विकेट गमावली नाही. शाहिदी
आणि रहमत शाह यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून
दिला.विश्वचषकात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने दोन सामने जिंकले आहेत.त्याचवेळी,एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पहिल्यांदाच
अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पाकिस्तानचा संघ सलग तीन
सामने हरला आहे.
आयसीसी
क्रिकेट विश्वचषक 2023
गुण सारणी – पाकिस्तान vs अफगाणिस्तान सामन्यानंतर
क्रमांक |
देश |
खेळलेले सामने |
जिंकलेले सामने |
हारलेले सामने |
गुण points |
नेट रन रेट |
1 |
भारत |
5 |
5 |
0 |
10 |
1.35 |
2 |
न्यूझीलंड |
5 |
4 |
1 |
08 |
1.48 |
3 |
दक्षिण आफ्रिका |
4 |
3 |
1 |
06 |
2.12 |
4 |
ऑस्ट्रेलिया |
4 |
2 |
2 |
04 |
-0.193 |
5 |
पाकिस्तान |
5 |
2 |
3 |
04 |
-0.400 |
6 |
अफगाणिस्तान |
5 |
2 |
3 |
04 |
-0.969 |
7 |
बांगलादेश |
4 |
1 |
3 |
02 |
-0.784 |
8 |
नेदरलँड |
4 |
1 |
3 |
02 |
-0.790 |
9 |
श्रीलंका |
4 |
1 |
3 |
02 |
-1.048 |
10 |
इंग्लंड |
4 |
1 |
3 |
02 |
-1.248 |
वरील गुणतालिकेवर नजर टाकली तर हे लक्षात येईल की, गतविजेता इंग्लंड 1 विजय आणि 3 पराजय यासह शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.तर मागच्या वेळेस अंतिम फेरी गाठू न शकलेला भारत 5 सामन्यात 5 सामने आणि 10 गुण जिंकून पाहिल्या स्थानावर आहे. भारताचे अजून चार सामने बाकी आहेत. आजच्या घडीला सेमीफायनलचा विचार केला तर मला गुणतालिकेतील पहिले चार संघ अर्थात भारत,न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार टीम जातील असे वाटतंय.भारताला 4 पैकी 2 किंवा काही विपरीत घडले तर एक सामना जिंकला तरी सेमीफायनलमध्ये आरामात प्रवेश मिळेल असं वाटतंय. कारण भारताचे आताच 10 गुण आहेत.सेमीफायनलसाठी 12 किंवा 14 गुण महत्वाचे ठरतील.असं गुण
सारांश
क्रिकेट वर्ल्डकप
2023 आता रोमहर्षक स्थितीत पोहोचला आहे. मला वाटतं पुढील 5 ते 7 सामन्यानंतर चित्र
पूर्णपणे उघड होईल. तोपर्यन्त पहात राहू या वर्ल्ड कप 2023.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
image@ICC world cup
Although it's a matter of ifs and buts, I still reckon Afghanistan as a team for 4th spot alongwith Australia, if aided by some more upsets from Netherlands
ReplyDelete