Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

पाकिस्तान वि अफगाणिस्तान Pakistan vs Afghanistan

 Blog No.2023/271           

Date: - 24th, October 2023.

मित्रांनो,

            क्रिकेट विश्वचषक 2023 आता रंगतदार स्थितिकडे वाटचाल करत आहे.काल पाकिस्तान वि अफगाणिस्तान हा सामना खूप चांगला झाला.विश्वचषकातील हा 22 वा सामना.एकूण 45 सामने होणार आहेत.म्हणजे आपण मध्यावर येऊन पोहोचलो आहे.10 टीमस् पैकी 4 संघांचे प्रत्येकी 5 आणि 6 संघांचे प्रत्येकी पाच सामने अजून व्हायचे आहेत. पाकिस्तान वि अफगाणिस्तान सामना कसा खेळला बघू या. 

पाकिस्तान वि अफगाणिस्तान

            अफगाणिस्तान हा संघ केव्हाही पॉईंट्स टेबल मध्ये उलथापालथ घडवून टाकू शकतो हे निश्चित. आणि आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.या सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानने 8 विकेटने पराभव करुन या विश्वचषकातील हा तिसरा अपसेट घडवून आणला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पाकिस्तानने 282 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने दोन गडी गमावून 286 धावा केल्या आणि सामना जिंकला.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून २८२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने सर्वाधिक 74 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली.39 व्या ओवरला पाकिस्तानची धावसंख्या फक्त 215 होती. पण अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 282 धावांपर्यंत नेले.मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. गुरबाज आणि इब्राहिम यांनी पॉवरप्लेमध्येच 60 धावा जोडल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. गुरबाज ६५ धावा करून बाद झाला. यानंतर इब्राहिमने रहमत शाहच्या साथीने ६० धावांची भर घातली. इब्राहिम ८७ धावांवर बाद झाला, पण यानंतर अफगाणिस्तानने एकही विकेट गमावली नाही. शाहिदी आणि रहमत शाह यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.विश्वचषकात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने दोन सामने जिंकले आहेत.त्याचवेळी,एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पाकिस्तानचा संघ सलग तीन सामने हरला आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 गुण सारणी – पाकिस्तान vs अफगाणिस्तान सामन्यानंतर 

क्रमांक

देश

खेळलेले सामने

जिंकलेले सामने

हारलेले सामने

गुण

points

नेट रन रेट

1

भारत

5

5

0

10

1.35

2

न्यूझीलंड

5

4

1

08

1.48

3

दक्षिण आफ्रिका

4

3

1

06

2.12

4

ऑस्ट्रेलिया

4

2

2

04

-0.193

5

पाकिस्तान

5

2

3

04

-0.400

6

अफगाणिस्तान

5

2

3

04

-0.969

7

बांगलादेश

4

1

3

02

-0.784

8

नेदरलँड

4

1

3

02

-0.790

9

श्रीलंका

4

1

3

02

-1.048

10

इंग्लंड

4

1

3

02

-1.248

             वरील गुणतालिकेवर नजर टाकली तर हे लक्षात येईल की, गतविजेता इंग्लंड 1 विजय आणि 3 पराजय यासह शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.तर मागच्या वेळेस अंतिम फेरी गाठू न शकलेला भारत 5 सामन्यात 5 सामने आणि 10 गुण जिंकून पाहिल्या स्थानावर आहे. भारताचे अजून चार सामने बाकी आहेत. आजच्या घडीला सेमीफायनलचा विचार केला तर मला गुणतालिकेतील पहिले चार संघ अर्थात भारत,न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार टीम जातील असे वाटतंय.भारताला 4 पैकी 2 किंवा काही विपरीत घडले तर एक सामना जिंकला तरी सेमीफायनलमध्ये आरामात प्रवेश मिळेल असं वाटतंय. कारण भारताचे आताच 10 गुण आहेत.सेमीफायनलसाठी 12 किंवा 14 गुण महत्वाचे ठरतील.असं गुण     

सारांश

         क्रिकेट वर्ल्डकप 2023 आता रोमहर्षक स्थितीत पोहोचला आहे. मला वाटतं पुढील 5 ते 7 सामन्यानंतर चित्र पूर्णपणे उघड होईल. तोपर्यन्त पहात राहू या वर्ल्ड कप 2023.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 प्रसाद नातु, पुणे.   

image@ICC world cup                                                                                                                       

Comments

  1. Although it's a matter of ifs and buts, I still reckon Afghanistan as a team for 4th spot alongwith Australia, if aided by some more upsets from Netherlands

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...