Skip to main content

कॅल्शियमसाठी दुधाशिवाय अन्य पर्याय

  ब्लॉग नं. 2026/129. दिनांक: 9 मे, 2026.   मित्रांनो, दुधाशिवाय कॅल्शियम ? हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षाही सरस आहेत हे पदार्थ आपण लहानांपासून ऐकत आलो आहोत की , हाडांच्या बळकटीसाठी ' दूध ' हाच सर्वोत्तम उपाय आहे. दुधाला कॅल्शियमचा खजिना मानले जाते , हे खरेच आहे.पण , जर मी तुम्हाला सांगितले की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असलेले,अनेक पदार्थ आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत , तर ? कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ही वस्तुस्थिती आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण अशाच काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया,जे तुमच्या दैनंदिन आहाराला अधिक पौष्टिक बनवू शकतात. सविस्तर: दुधाचे प्रमाण आणि आपली गरज सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घेऊ.एका कपात (245 मिली) सुमारे 305 मिग्रॅ कॅल्शियम असते. प्रौढांसाठी कॅल्शियमचे दररोजचे शिफारस केलेले प्रमाण ( RDA) 1 ,000 ते 1,200 मिग्रॅ इतके आहे. याचा अर्थ , केवळ एक ग्लास दुध, हे तुमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.तर मग , कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी इतर कोणते पर्याय आहेत ? पाहूया: 1 . चीज आणि दुग्धजन्य पदार्थ : ·...

तरुण वयात हृदयविकार, एक समस्या.

 Blog No.2023/272           

Date:- 26th,October 2023.  

मित्रांनो,

               आज एका महत्वाच्या विषयावर मी ब्लॉग लिहिणार आहे.एवढ्यातच नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला.यात गरबा किंवा दांडिया खेळण्याचा प्रघात आहे.गुजरात तर गरब्यासाठी फार पूर्वी पासून प्रसिद्ध आहे.हळूहळू हे लोण सर्व दूर पसरली ही गोष्ट वेगळी.पण याबद्दलच म्हणजेच गरबा खेळण्याबाबत एक अतिशय गंभीर अशी बातमी माझ्या वाचनात आली.ती म्हणजे गुजरातमध्ये नवरात्र उत्सवादरम्यान गरबा खेळतांना दहा जणांचा मृत्यू झाला.त्यापैकी बहुतेक हे किशोरवयीन असून 20 वर्षाच्या आतील होते.हृदयविकाराचा झटका आल्यामुळे यांचा मृत्यू झाल्याचे कळते.यासाठी  तज्ज्ञांनी काही उपाय सुचविले आहेत. ते आज आपण पहाणार आहोत.

प्रास्ताविक

तज्ज्ञांच्या मते याचे प्रमुख कारण आहार आणि जीवनशैली आहे.यावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की गेल्या दोन दशकात आपण लोक चुकीचे अन्न सेवन करत आहोत.आपण खूप फिट आहोत हे दाखविण्यासाठी आज काल लोक जिमला जातात आणि वेगवेगळ्या डान्स प्रकारामध्ये जातात. पण हे अतिशय चुकीचे आहे.मग यासाठी नेमके काय करावे.

आहार विषयक आणि पोषण विषयक तज्ञ फर्नांडो म्हणतात की तुमची जीवनशैली हा हृदयविकार आणि स्ट्रोक विरूद्ध तुमचा सर्वोत्तम बचाव आहे. काही सोपे उपाय आणि काही चाचण्या करून हृदयविकाराच्या  धोक्याचे निदान केले जाऊ शकते.    

कोलेस्टेरॉल चाचणी अर्थात लिपिड प्रोफाइल टेस्ट

लिपिड प्रोफाइल टेस्ट मध्ये रक्तातील चरबीचे मोजमाप केले जाते.एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल आणि एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल रक्तात किती आहे.हे या चाचणीत माहित होते.तसेच त्यांचे एकमेकांशी गुणोत्तरही दर्शविते.आदर्श कोलेस्टेरॉलची पातळी ही 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर किंवा 5.2 मिलीमोल्स प्रति लिटर (mmol/L) च्या खाली असावी.

लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा एलडीएल किंवा  खराब कोलेस्टेरॉल देखील म्हणतात,ज्यामुळे  रक्तवाहिन्यांमध्ये गांठ तयार होते.ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो.ही गांठ फुटते आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात.उच्च घनता लिपोप्रोटीन किंवा एचडीएल जे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते, एलडीएल कोलेस्टेरॉल या गाठी काढून टाकते, धमन्या खुल्या ठेवते ज्यामुळे रक्त अधिक मुक्तपणे वाहते.या चाचणीत HDL आणि LDL सोबतच रक्तात ट्रायग्लिसराइड्स किती आहे हे माहित होते.आपण जे खातो त्यातून जी ऊर्जा निर्माण होते त्यातून किती ऊर्जा जाळली जाते आणि ती अतिरिक्त ऊर्जा घातक असते. ट्रायग्लिसराइड्स सुद्धा जास्त असू नये. हृदयाच्या आरोग्यास ते हानिकारक आहे.

उच्च-संवेदनशीलता सी-प्रतिक्रियाशील प्रथिने (C-reactive protein)

सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन यकृतामध्ये तयार होते जे दुखापत किंवा संसर्गास त्वरित प्रतिसाद देते,ज्यामुळे जळजळ होते,जी एथेरोस्क्लेरोसिसच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावते. एथेरोस्क्लेरोसिस  म्हणजे रक्तवाहिन्या जाड होणे किंवा कडक होणे. हे धमनीच्या आतील अस्तरात गाठ तयार झाल्यामुळे होते.या गाठी फॅटी पदार्थ, कोलेस्टेरॉल, सेल्युलर कचरा उत्पादने, कॅल्शियम आणि फायब्रिनच्या ठेवींनी बनलेला असतो.यासाठी जी चाचणी केली जाते तिला HsCRP टेस्ट म्हणतात.एचएस-सीआरपी पातळी 2.0 मिलीग्राम प्रति लिटर (मिग्रॅ/एल) पेक्षा जास्त हृदयविकाराचा धोका दर्शवते. 

लिपोप्रोटीन:- लिपोप्रोटीन (a) हा LDL कोलेस्टेरॉलचा एक प्रकार आहे जो बहुतेक  वेळा अनुवांशिक असतो.उच्च पातळी हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याचे लक्षण आहे आणि ही चाचणी डॉक्टरांना हे निर्धारित करण्यात मदत करू शकते की तुम्हाला आधीच एथेरोस्क्लेरोसिस किंवा हृदयविकार आहे कां? 

हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी काय करावे?

संतृप्त चरबी (Saturated Fats) आणि ट्रान्स फॅटचे (Trans Fats) प्रमाण जास्त असलेले प्रक्रिया केलेले आणि जंक फूड खाणे टाळले पाहिजे.या ऐवजी ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खाण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे तुमचे हृदय आरोग्य सुधारू शकते.

आठवड्यातून किमान 3-4 वेळा व्यायाम करा, असा व्यायाम जो सर्वोत्तम चरबी जाळणारा व्यायाम मानला जातो. यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम  आहे.चालण्याने वजन कमी होण्यास मदत होतेच,पण तुमचे हृदय जलद रक्त पंप करते.

धूम्रपान सोडा, कारण तंबाखूतील रसायने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात. सिगारेटचा धूर रक्तातील ऑक्सिजन कमी करतो, रक्तदाब आणि हृदय गती वाढवतो.

दर्जेदार झोप घ्या.कारण ज्यांना निद्रानाश आहे,त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि नैराश्याचा धोका जास्त असतो.बहुतेक प्रौढांना दररोज रात्री किमान सात तासांची झोप लागते आणि त्यामुळे तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळते याची खात्री करा. झोपेचे वेळापत्रक सेट करा आणि त्यास चिकटून रहा. 

सारांश:-

            वर सुचविलेले उपाय अंमलात आणावयाचे असतील,तर तरुणांनी सर्वात प्रथम कार्य जिवन संतुलन (Work Life Balance) सांभाळणे महत्वाचे आहे.रात्री-अपरात्रीचे जागरण होणार नाही,याची दक्षता घ्यायला हवी. तरुणांना आजकाल पुरेशी विश्रांती आणि झोप मिळत नाही.त्याकडे लक्ष द्यायला हवे.या दृष्टीने पाहायला गेले तर तरूणांपेक्षा त्यांच्या एम्प्लॉयरचे, त्यांच्या एच आर मॅनेजर्सचे समुपदेशन गरजेचे आहे,असे मला वाटते. एच आर मध्ये कार्य जिवन संतुलन (Work Life Balance) याकडे लक्ष देणे हे सरकारने देखिल सक्तीचे करावे आणि ऑडिटमध्ये कार्य जिवन संतुलन (Work Life Balance) हा एक मुद्दा असावा. ज्यात कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात याव्या.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.                                                                                                                         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...