Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

 Blog No.2023/275           

Date:- 31th,October 2023.

 


मित्रांनो,

            काल परवा मी कराडला गेलो होतो. परवा मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या तर्फे कराड येथील  यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत माझ्या “चित्र आणि चेहरा” या कथा संग्रहासाठी माझा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.29 तारखेला सकाळी 10 चा कार्यक्रम होता.मला पुण्याहून 10 पर्यन्त कराडला पोहोचता येणार नाही,म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही कराडला   गेलो.शनिवारी नृसिंहवाडी आणि खिद्रापुरला जाऊन दर्शन घ्यायचे ठरविले. त्याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आम्ही संध्याकाळी 5 च्या सुमारास खिद्रापुरकडे निघालो.कोजागिरी पौर्णिमेचा दिवस त्यामुळे सूर्य मावळल्यानंतर ही चंद्राच्या प्रकाशाची सोबत होती. त्यामुळे खिद्रापूरचे सौन्दर्य आधी सूर्य प्रकाशात न्याहाळले होते आता चंद्रप्रकाशात ही बघण्याचा आनंद घेऊ ही कल्पना.    

 खिद्रापूर एक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ        

            खिद्रापुरचे धार्मिक महत्व तर आहेच कारण,येथे कोपेश्वर म्हणजे शंकराची पिंड तर आहेच पण विष्णुची शाळुंखा देखिल आहे.त्या सोबत मंदिरातील अप्रतिम शिल्प सौन्दर्य हा तर पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे.खिद्रापूर मुंबई पासून 415 किमी,पुण्यापासून 271 किमी, कोल्हापूरहून 60 किमी तर सांगलीहून अवघ्या 40 किमीवर आहे. सांगली हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने जोडलेले शहर. त्यामुळे तुम्ही ट्रेन किंवा बसने सांगली येथे जाऊन तिथून बसने खिद्रापूरला पोहोचू शकता. स्वतःच्या कारने निघालात तर पेठनाका येथून जाता येईल किंवा कोल्हापूरहून देखिल जाता येते. कोल्हापूर तर विमान सेवेने देखिल जोडलेले आहे.

खिद्रापुरची धार्मिक आख्यायिका   

            पुराणात असं सांगितलं आहे की दक्षाच्या 16 कन्या होत्या. त्यापैकी सर्वात लहान सती हिने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भगवान शंकराला वरले होते.त्यामुळे दक्ष शंकरावर नाराज होते.दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात शंकर आणि सती दोघांना बोलावले नव्हते. शंकर स्वाभिमानी असल्याने गेले नाहीत.पण सती माहेरला गेली आणि तिचा तिथे अपमान केला गेला.भगवान शंकर यांची देखिल शाब्दिक अवहेलना केली गेली. या अपमानामुळे धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन सतीने प्राणत्याग केला.झाल्या प्रकरणे शंकर क्रोधित झाले,त्यांनी आपल्या जटा आपटून आपला क्रोध व्यक्त केला. या जागीच भगवान शंकर कोपित झाले असल्याने येथील मंदिरास कोपेश्वर मंदिर म्हणतात.भगवान शंकरांनी आपला दूत वीरभद्र पाठवून तेथील सर्व लोकांचा विनाश केला.   भगवान शंकरांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु येथे पोहोचले,म्हणून येथे विष्णु यांची शाळुंखा आहे. तिला धोपेश्वर म्हटले जाते. शंकरांनी सती सोबत नंदीला पाठविले होते,त्यामुळे येथे नंदी नाही.हे अशा प्रकारचे एकुलते एक मंदिर आहे असे येथे सांगितले गेले.भगवान विष्णु आणि भगवान शंकर हे देखिल एकत्र अभावाने पहावयास मिळतात.दक्षाने केलेल्या यज्ञाची घडना कृष्णा नदी दक्षिणेकडे ओलांडून गेले असता,यडूर गांव लागते. या गांवी घडल्याचे बोलले जाते.येथे मंदिरासमोर 500 फुटांवर कृष्णा नदीचे पात्र आहे.येथे गावाला वळसा घालून कृष्णा माय पश्चिम वाहिनी होते,अशा रीतीने या गावाच्या तिन्ही बाजूना नदीने वेढले आहे. गूगल मॅपमध्ये बघितलं तर हे सहज कळून येईल.खिद्रापूरनंतर कृष्णा नदी ओलांडली की कर्नाटक राज्य आहे. यडूर हे गांव कर्नाटकांत आहे.

 

मंदिराची रचना

            साधारणतः आपण मंदिरांची रचना पहातो. त्यात सुरुवातीस सभामंडप असतो आणि मग आंत गाभारा असतो. ज्यात प्रत्यक्ष देवाची मूर्ती म्हणा पिंड असते. येथे ही रचना थोडी वेगळी असल्याचे अनुभवास येते.मंदिर परिसराच्या प्रवेश द्वारातून आंत गेलो. समोर मंदिर दिसतं. मंदिराच्या पायऱ्या चढून पूर्व दरवाज्यातून प्रवेश आपण मंदिरात प्रवेश करते झालो की सभामंडपाच्या आधी इथे एक मंडप लागतो,ज्याला स्वर्गमंडप म्हटले जाते. या सभामंडपाच्या वर आपण बघितले तर त्यातून आकाशाकडे सहज पहाता येते. हे एक 13 फुट व्यासाचे पोकळ वर्तुळ आहे.त्याच्या कडांवर काढलेले नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. हा स्वर्गमंडप 48 खांबांवर उभारलेला आहे. या खांबावरील नक्षीकाम विलोभनीय आहे. या वर्तुळाखाली जमिनीवर तेवढ्याच आकाराची साधारणतः 1 इंच उंचीची वर्तुळाकार शिळा कोरलेली आहे. 



मंदिराचा बाहेरील भाग 

            शंकराच्या मंदिरास आपण सर्वसाधारणपणे पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. पण येथे मंदिराच्या बाह्य भिंतीवर पुराणकालीन स्थापत्य कलेचा नजारा पहावयास मिळतो.मंदिराच्या बाहेरील भिंतीवर देवदेवतांच्या,स्त्री पुरुषांच्या अप्रतिम अशा शिल्पाकृती बघावयास मिळतात.मंदिराचे जे कठडे आहेत ते देखिल नक्षीदार कलाकृतींनी सजवलेले आहेत.

            स्वर्गमंडपातून सभामंडपात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. एक पूर्वेकडील म्हणजेच स्वर्गमंडपातून, एक उत्तरेकडून तर दुसरे दक्षिणेकडून.या दारांवर द्वारपालांच्या सुंदर अशा मूर्ती बघावयास मिळतात. येथे वेगवेगळी सुंदर अशी नारीशिल्पे पहावयास मिळतात, ज्यांनी परिधान केलेले वेगवेगळे अलंकार इतके सुंदर कोरले आहेत की आपण थक्क होऊन जातो.जवळपास कुठेच अश्या प्रकारचा काळा कातळ नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध नाही. मग त्या काळात हा काळा कातळ येथे आणून त्यावर इतके सुंदर कोरीवकाम करणाऱ्या त्या अज्ञात कारागिरांच्या प्रति आपण अजाणता नतमस्तक होतो.पण भारतातील अशा सुरेख मंदिरांवर भारतावर ज्या असंख्य चढाया आक्रमकांनी केल्या,त्यात मंदिराचे खरं तर मंदिरातील अशा सुरेख कलाकृतींचे जे नुकसान केले आहे ते निंदनीय आहे,घृणास्पद आहे.

   

     
    ज्या कलाकृतींचे वर्णन करावयास शब्द देखिल जिथे अपुरे पडतात,त्या कलाकृती नष्ट करण्याचे,भंग करण्याचे कार्य करणाऱ्याला मन, हृदय नव्हते कां? त्याला चांगल्या वाईटाची देखिल जाण नव्हती कां? त्याला यात काही सौन्दर्य न दिसण्याइतके त्याचे मन कठोर,निष्ठुर होते कां? अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं कां? की शैतान,हैवान. हा इतर अशा मंदिरात गेल्यावर पडणारा प्रश्न,या मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. असो.

 समारोप       

            येती पौर्णिमा म्हणजे कार्तिकी पौर्णिमेस येथे प्रकाश महोत्सव साजरा केला जातो. स्वर्गमंडपातील त्या पोकळ वर्तुळाच्या अगदी महोमध चंद्रबिंब अवतरते.हा क्षण अनुभवण्यासाठी दूरदूरचे भाविक आणि पर्यटक येथे येतात असे कळले.येत्या पौर्णिमेस या मंदिरास अवश्य भेट देऊन या अद्भुत क्षणाचा आनंद लुटण्यासाठी खिद्रापूरला भेट द्या.आणि आपले अनुभव मला नक्की शेअर करा. 

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.                   

Comments

  1. खूप छान माहिती

    ReplyDelete
  2. कोपेश्वर महादेव की जय🙏🌺🌺

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती. ह्या सुट्टीत कोल्हापूरला जायचा प्लॅन आहे .आता नक्कीच खिद्रापूरला भेट देणार .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...