Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

सलौना सा सजन है

Blog No.2023/226

Date:- 28th, August,2023. 

मित्रांनो

          मी आज एका गोड गझलचा परिचय आपणांस करुन देणार आहे. आशा भोसले यांनी ही गझल इतकी  सुरेख गायली आहे की एकदा ऐकून मन भरत नाही. काल मी अनेकदा ऐकली.ही गझल मिराज-ए-गझल या अल्बम मधील आहे. शबीह अब्बास-गुलामअली  या गझलचे गीतकार असून,या गझलला संगीत स्वतः गुलाम अली यांनी  दिले आहे. बघूया काय आहे ही गझल.

गझलचे बोल   

सलोना सा सजन है और मैं हूँ

जिया में इक अगन है और मैं हूँ.

तुम्हारे रूप की छाया में साजन

बड़ी ठण्डी जलन है और मैं हूँ.

चुराये चैन रातों को जगाये

पिया का ये चलन है और मैं हूँ.

 पिया के सामने घूँघट उठा दे

बड़ी चंचल पवन है और मैं हूँ.

 रचेगी जब मेरे हाथों में मेंहदी

उसी दिन की लगन है और मैं हूँ.



गझलचा अर्थ म्हणा स्वैरानुवाद

            गझल या अर्थ वगैरे स्वतः समजून घेऊन, तुम्हाला समजाविण्या इतका काही मी मोठा पंडित नाही. ही गझल माझ्या मनाला जशी भावली तसा स्वैरानुवाद मी आपल्या पुढे ठेवत आहे.    

अशी मी आहे जिचा एक सुंदरसा साजण आहे.त्याला बघितल्यावर जिच्या ह्रदयात आग लागली आहे.अशी मी आहे.त्याच्या देखण्या रुपात एक थंड अशी आग आहे आणि ती जिला जाणवते आहे आणि त्यात जी जळते आहे, होरपळते ती मी आहे.जिच्या रात्रीची झोप चोरुन तो जिला जागवतो आहे.आणि ही अशी त्याची तऱ्हा आहे.आणि तरी ती निमूटपणाने सहन करते आहे,ती मी आहे.प्रियकरासमोर हा चंचल असा वारा केव्हाही तिच्या चेहऱ्यासमोरील पदर बाजूला सारेल आणि तिचा चेहरा त्याच्या समोर असेल ती मी आहे.ज्या दिवशी हातावर मेंदी लावली जाईल, त्या दिवसाची जी मनापासून वाट पहाते आहे ती मी आहे.

एका सुंदर दिसणाऱ्या पुरुषाच्या सान्निध्यात आल्यावर त्याच्या विषयी तिच्या मनात ज्या भावना म्हणा संवेदना म्हणा उत्पन्न झाल्या. अशी ती स्त्री हे गाणं म्हणते आहे.हे या गझलमध्ये सांगायचा गझलकाराने प्रयत्न केला आहे.अतिशय नाजुक,मुलायम, तलम असे शब्द पेरत ही गझल लिहिली आहे. असं मला वाटतं. माझं काही चुकत असेल तर जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे.

गझलला दिलेली चाल, आशाताईंचा तो मनभावक असा स्वर यामुळे,मी गझल समजून घेण्यापूर्वी या गझलमधील नायिकेचे मनोगत माझ्या हृदयावर रेखाटले गेले तसे मी कागदावर उतरविले आहे.खरे शब्द तेच जे हृदयाला जाऊन भिडतात, तसचं खरा स्वर तोच जो शब्दांचा हृदयाला स्पर्श करवून जातो. म्हणून मी म्हटले आहे की नायिकेचे मनोगत माझ्या हृदयावर रेखाटले गेले. तुम्हाला काय वाटतं ते कमेन्ट बॉक्स मध्ये अवश्य लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. खुप छान लेख. साध्या, सोप्या भाषेत गझलचा मतितार्थ समजावून सांगितला आहे...👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...