Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

Chat GPT

Blog No. 2023/32    

Date: 8th, February 2023.  



 मित्रांनो ,

            मध्यंतरी मी कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयावर एक ब्लॉग लिहिला होता. आज अचानक गूगल वर मला एक बातमी दिसली की अमेरिकेतील शाळकरी मुले ही Chat GPT चा उपयोग करुन दिलेले होम वर्क पूर्ण करतात आणि वर्गात देखिल वापर करतात. त्यामुळे शाळांनी Chat GPT वर बंदी टाकली आहे. ही बातमी वाचून माझी उत्सुकता चाळवली. म्हटलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्ताने चॅटबॉटचा परिचय झाला. अर्थात चॅटबॉट काही नवीन नव्हतं. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टी साठी गूगल वर सर्च केल्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूला एक चॅट बॉक्स उघडतो. तो may i help you सारखा असतो. आपल्या त्या सर्च केलेल्या गोष्टी बद्दल अजून काही जाणून घ्यायचे असल्यास त्यात टाइप करायचे. तो उत्तर देऊन तुमचे समाधान करायचा प्रयत्न करतो. ती उत्तरे कुणी व्यक्ती नाही. तर तो जो चॅटबॉट आहे तोच देत असतो.त्याला चॅटबॉट म्हणतात हे जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल ब्लॉग लिहिला तेव्हा माहित झाले. अन आज  हे Chat GPT. हे नेमके काय आहे? ह्याच्यात अन चॅटबॉट मधे फरक काय? Google सर्च पेक्षा हे वेगळे आहे काय? ह्या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या ब्लॉग मधे. 

 Chat GPT नेमके काय    

                Chat GPT हे एक चॅट जनरेटीव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॅारमर आहे. हे एक जटिल मशीन लर्निंग मॉडेल आहे नैसर्गिक भाषा निर्मितीचे कार्य उच्च पातळीच्या अचूकतेसह पार पाडण्यास सक्षम आहे. तुम्ही चॅटबॉट बघितले असेल त्यासारखाच हा एक प्लॅटफॉर्म आहे. तो विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. हे  मॉडेल इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या ओपेनएआय संशोधन संस्थेने विकसित केले आहे 

 Chat GPT आणि चॅटबॉट मधील फरक 

                 Chat GPT आणि चॅटबॉट मधील महत्वाचा फरक म्हणजे चॅटबॉट त्यात फीड करून ठेवलेल्या माहिती नुसार प्रश्नांची उत्तरे देतो पण  Chat GPT तुम्ही विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम आहे. 

Chat GPT आणि Google सर्च मधील फरक 

 Google सर्च ही सर्च इंजिन आहे. तर चॅट GPT हा एक प्लॅटफॉर्म आहे. मला ब्लॉग लिहायचा आहे. ट्रेडिंग विषय हवेत हे मी Google सर्चला विचारले तर त्याचे उत्तर 

     1 Movie Review 

     2 Music Review  

     3 T.V show Guides

     4 Celebrity Interview

     5 Arts and culture

हाच प्रश्न मी चॅट GPT ला विचारला त्याचे उत्तर 

     1 Sustainable Travel and Eco-friendly tourism

     2 Remote work and digital normal life style

     3 Plant based and vegetable diets while travelling

     4 Adventure sports and outdoor activitie

     5  Cultural Experience and immersions in local communities

     6 The future of Air travel and space tourism 

Chat GPT ने to the point उत्तर दिले आहे.

Chat GPT च्या उत्कृष्ट कार्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

             1.       प्रश्नांची उत्तरे देणे.

2.       दिलेला मजकूर किंवा वाक्यांश पूर्ण करणे.

3.  प्रॉम्प्ट्सवरून काल्पनिक आणि गैर-काल्पनिक सामग्री लिहिणे.

4.       मानवासारखे चॅटबॉट प्रतिसाद तयार करणे.

5.       संगणक कोड तयार करत आहे.

6.       मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करणे.

7.       गणना करत आहे.

8.       दिलेल्या मजकुराचा सारांश.

9.       मजकूराचे विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण करणे.

10.  मजकूर भावना विश्लेषण.

11. सारण्या आणि स्प्रेडशीटमध्ये डेटाचा सारांश देणारा मजकूर व्युत्पन्न करणे.

12.  वापरकर्त्याच्या इनपुटला संभाषणात्मक पद्धतीने प्रतिसाद देणे.

           चॅट GPT जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्यात Login In करून बघितले. खरोखर हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. तुम्ही ही प्रयत्न करून बघा.

 

 

प्रसाद नातु,पुणे.      

 

Comments

  1. Khup chan mahiti poorna lekh. Tyach pramane google Ata agami kahi athavdyat Bard hey ChatGPT la pratispardhi manun market madhe launch karnar ahe. Users chi Maja ahe. Pahuya ghadamodi kasha develop hotat

    ReplyDelete
  2. Mind boggling...you are really taking interest in your blogs, Prasad!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...