Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

आपला जीव आपली जबाबदारी

 

Blog No. 2023/18  

Dated 21st, January 2024.  


मित्रांनो,

            माझे ब्लॉग तुम्ही गेल्या 15-20 दिवसांपासून वाचत असाल,तर माझा समृद्धी महामार्गावरचा फेरफटका हा ब्लॉग तुम्ही वाचला असाल,तर इतक्यात मी समृद्धी महामार्गावर जाऊन आलो.महामार्गाविषयी ज्या बातम्या पसरविण्यात आल्या,त्या बद्दल देखिल मी त्यांत लिहिले होते. मागील दोन दिवसांत केंद्र सरकारच्या सडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 17 डिसेंबर 2022 ला वर्ष 2021 करिता प्रसिद्ध केलेला भारतातील 2021 वर्षात झालेल्या रोड अॅक्सिडेंट बाबतचा एक अहवाल वाचनात आला.त्यामुळे हा ब्लॉग लिहायला घेतला.  

            हा अहवाल अतिशय विस्तृत असा असून,ह्यात कुठल्या प्रकारच्या मार्गावर किती अपघात होतात, त्यांत मृत्युमुखी किती पडतात,अपघात होण्याची कारणे,रोडची अवस्था.मोठ्या महानगरात होणाऱ्या अपघातांची संख्या, अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या इत्यादि ह्याची सविस्तर मीमांसा केली आहे.गेल्या दोन दशकांत,म्हणजे 2000 सालानंतर कार आणि मोटरसायकलची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी व्यवस्थित नसल्याने,बऱ्याचशा शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुद्धा आपले वाहन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. डेली अपडाऊन साठी दुचाकी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते.लोकांचे साइट सीइंग साठी किंवा देवालयांना भेटी देण्यासाठीचे पर्यटन आणि तेही स्वतःच्या कारने वाढल्याने महामार्गावर आणि इतर मार्गावर गर्दी वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण

            2021 च्या ह्या अहवालानुसार 2021 ह्या वर्षी एकूण 412,432 अपघात झाले,जे नोंदविले गेले आहेत. त्यात 153,972 मृत्युमुखी पडले आणि 384,448 जखमी झाले.सर्वात जास्त अपघात हे तामीळनाडू मधे नोंदविले गेले.10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील अपघातांचे प्रमाण हे 16.3% इतके होते.सर्वात जास्त अपघात हे वाहनाला पाठीमागून ठोस मारल्याने झालेत.या अपघातांचे प्रमाण हे एकूण अपघातांच्या 21.2% एवढे होते तर यात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण एकूण मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येच्या 18.6% इतके आहे.त्या नंतर हेड ऑन collision म्हणजे वाहनाला समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातांचे आहे. एकूण अपघातांच्या 18.5% एवढे अपघात ह्या प्रकारांत मोडतात. ज्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांच्या संखेच्या 17.7% इतके लोक मृत्युमुखी पडले. हिट अँड रन म्हटल्यावर सलमानखानची आठवण येते. तशा प्रकारात एकूण अपघातांच्या 16.8% इतके अपघात झाले.

अपघातांची कारणे

            अपघातांच्या कारणांमध्ये ‘अतिवेगात’ वाहन चालविल्यामुळे,सर्वात अधिक म्हणजे 95,785 अपघात झाले आणि त्यात 40,450 जण मृत्युमुखी पडलेत. ‘दारु पिऊन’ वाहन चालविल्यामुळे 2,949 अपघात झाले,ज्यात 1,352 जण मृत्युमुखी पडले. विरुद्ध ‘दिशेने वाहन चालविल्यामुळे’ एकूण 5,568 अपघात झाले ज्यात एकूण 2,823 जण मृत्युमुखी पडले. ‘लाल सिग्नल तोडल्यामुळे एकूण 555 अपघात झालेत आणि त्यात 222 लोक मृत्युमुखी पडलेत. ‘मोबाईल पहात' वाहन चालविल्यामुळे’ झालेले अपघात कमी नाहीत. अशा प्रकारांत 1,997 अपघात झालेत ज्यात 1,040 जण मृत्युमुखी पडलेत. इतर प्रकार जसे रस्ते खराब असणे, हवामानातील बदल जसे पाऊस, धुके, वादळ इत्यादि,वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविणे,वाहनांची अयोग्य अवस्था अर्थात चालविण्यासाठी पूर्ण सक्षम नसलेले वाहन चालविणे इत्यादिमुळे झालेले अपघात 21,971 इतके आहे ज्यात 10,120 जण मृत्युमुखी पडलेत.                                                           

            एकंदरीत बघितले तर अपघातामधे मोठे प्रमाण हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मानवी चुका ह्यामुळे झाल्याचे दिसून येते. ज्यात कमाल मर्यादेच्या पेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडल्यामुळे, मोबाईल पहात वाहन चालविणे, हेल्मेट न घालता वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात येते. नुकताच झालेला “ऋषभ पंतचा अपघात” ह्यामुळे आता सुरक्षा उपायांवर जनजागृती होणे महत्वाचे आहे.कारण जगात सर्वात जास्त अपघात अमेरिकेत होतात. अमेरिकेत 19,27,654 अपघात झालेत जे प्रमाण जगांत सर्वाधिक आहे पण मृत्युमुखी  36,560 जणच पडले.अपघातांमधे मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण भारतात सर्वात अधिक आहे,भारताचा पहिला क्रमांक लागतो.ज्याचे महत्वाचे कारण भारतीयांचा बेशिस्त स्वभाव.        

सुरक्षितता उपाय

             भारतात कसं आहे की अपघात झाला की सरकार जबाबदार.रस्त्यामुळे अपघात होतात,खडयामुळे अपघात होतात हे देखिल खरे आहे.पण सर्वात जास्त अपघात हे मानवी चुका आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होतात हे देखिल तितकेच खरे आहे. सुरक्षा उपाय जसे सीट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे,वाहतूक नियमांचे पालन करणे (वेगमर्यादेचे पालन, सिग्नल पाळणे, उलट्या दिशेने वाहन न चालविणे,आपल्या वाहनांचा नीट रखरखाव (maintenance) ठेवणे इत्यादि तर आपल्याच हातात आहे. मा. नितीनजी गडकरी सरांनी ह्या संबंधात जनजागृतीचे काम सुरु केले आहे,पण ते खूप मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे.

            सर्वात महत्वाचे म्हणजे वाहन चालवितांना “आपला जीव ही आपलीच जबाबदारी आहे सरकारची नाही” हे लक्षात ठेवणे अधिक महत्वाचे आहे.नुकसान आपले आणि आप्तगण ह्यांचे होणार सरकारचे नाही.         

 

 

प्रसाद नातु,पुणे            

Comments

  1. True, there is a need for increasing public awareness and stricter traffic norms

    ReplyDelete
  2. आपला जीव ही आपलीच जबाबदारी आहे सरकारची नाही”
    100% correct.
    दुर्घटना से देरी भली
    नजर हटी दुर्घटना घटी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...