Blog No. 2023/18
Dated 21st, January 2024.
मित्रांनो,
माझे
ब्लॉग तुम्ही गेल्या 15-20 दिवसांपासून वाचत असाल,तर माझा समृद्धी महामार्गावरचा
फेरफटका हा ब्लॉग तुम्ही वाचला असाल,तर इतक्यात
मी समृद्धी महामार्गावर जाऊन आलो.महामार्गाविषयी ज्या बातम्या पसरविण्यात
आल्या,त्या बद्दल देखिल मी त्यांत लिहिले होते. मागील दोन दिवसांत केंद्र
सरकारच्या सडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 17 डिसेंबर 2022 ला वर्ष 2021
करिता प्रसिद्ध केलेला भारतातील 2021 वर्षात झालेल्या रोड अॅक्सिडेंट बाबतचा एक
अहवाल वाचनात आला.त्यामुळे हा ब्लॉग लिहायला घेतला.
हा अहवाल
अतिशय विस्तृत असा असून,ह्यात कुठल्या प्रकारच्या मार्गावर किती अपघात होतात,
त्यांत मृत्युमुखी किती पडतात,अपघात होण्याची कारणे,रोडची अवस्था.मोठ्या महानगरात
होणाऱ्या अपघातांची संख्या, अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या
इत्यादि ह्याची सविस्तर मीमांसा केली आहे.गेल्या दोन दशकांत,म्हणजे 2000 सालानंतर कार
आणि मोटरसायकलची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
तेवढी व्यवस्थित नसल्याने,बऱ्याचशा शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुद्धा आपले वाहन
वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. डेली अपडाऊन साठी दुचाकी खूप मोठ्या प्रमाणात
उपयोगात आणली जाते.लोकांचे साइट सीइंग साठी किंवा देवालयांना भेटी देण्यासाठीचे
पर्यटन आणि तेही स्वतःच्या कारने वाढल्याने महामार्गावर आणि इतर मार्गावर गर्दी
वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण
2021
च्या ह्या अहवालानुसार 2021 ह्या वर्षी एकूण 412,432 अपघात झाले,जे नोंदविले गेले आहेत.
त्यात 153,972 मृत्युमुखी पडले आणि 384,448 जखमी झाले.सर्वात जास्त अपघात हे
तामीळनाडू मधे नोंदविले गेले.10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील
अपघातांचे प्रमाण हे 16.3% इतके होते.सर्वात जास्त अपघात हे वाहनाला पाठीमागून ठोस
मारल्याने झालेत.या अपघातांचे प्रमाण हे एकूण अपघातांच्या 21.2% एवढे होते तर यात
मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण एकूण मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येच्या 18.6%
इतके आहे.त्या नंतर हेड ऑन collision म्हणजे
वाहनाला समोरासमोर टक्कर झालेल्या अपघातांचे आहे. एकूण अपघातांच्या 18.5% एवढे
अपघात ह्या प्रकारांत मोडतात. ज्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांच्या संखेच्या 17.7%
इतके लोक मृत्युमुखी पडले. हिट अँड रन म्हटल्यावर सलमानखानची आठवण येते. तशा
प्रकारात एकूण अपघातांच्या 16.8% इतके अपघात झाले.
अपघातांची कारणे
अपघातांच्या
कारणांमध्ये ‘अतिवेगात’ वाहन चालविल्यामुळे,सर्वात अधिक म्हणजे 95,785 अपघात झाले
आणि त्यात 40,450 जण मृत्युमुखी पडलेत. ‘दारु पिऊन’ वाहन चालविल्यामुळे 2,949
अपघात झाले,ज्यात 1,352 जण मृत्युमुखी पडले. विरुद्ध ‘दिशेने वाहन चालविल्यामुळे’
एकूण 5,568 अपघात झाले ज्यात एकूण 2,823 जण मृत्युमुखी पडले. ‘लाल सिग्नल
तोडल्यामुळे एकूण 555 अपघात झालेत आणि त्यात 222 लोक मृत्युमुखी पडलेत. ‘मोबाईल
पहात' वाहन चालविल्यामुळे’ झालेले अपघात कमी नाहीत. अशा प्रकारांत 1,997 अपघात
झालेत ज्यात 1,040 जण मृत्युमुखी पडलेत. इतर प्रकार जसे रस्ते खराब असणे,
हवामानातील बदल जसे पाऊस, धुके, वादळ इत्यादि,वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन
चालविणे,वाहनांची अयोग्य अवस्था अर्थात चालविण्यासाठी पूर्ण सक्षम नसलेले वाहन
चालविणे इत्यादिमुळे झालेले अपघात 21,971 इतके आहे ज्यात 10,120 जण मृत्युमुखी
पडलेत.
एकंदरीत
बघितले तर अपघातामधे मोठे प्रमाण हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मानवी चुका
ह्यामुळे झाल्याचे दिसून येते. ज्यात कमाल मर्यादेच्या पेक्षा अधिक वेगाने वाहन
चालविणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडल्यामुळे, मोबाईल पहात वाहन चालविणे,
हेल्मेट न घालता वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात येते. नुकताच झालेला “ऋषभ
पंतचा अपघात” ह्यामुळे आता सुरक्षा उपायांवर जनजागृती होणे महत्वाचे आहे.कारण जगात
सर्वात जास्त अपघात अमेरिकेत होतात. अमेरिकेत 19,27,654 अपघात झालेत जे प्रमाण जगांत
सर्वाधिक आहे पण मृत्युमुखी 36,560 जणच पडले.अपघातांमधे
मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण भारतात सर्वात अधिक आहे,भारताचा पहिला क्रमांक
लागतो.ज्याचे महत्वाचे कारण भारतीयांचा बेशिस्त स्वभाव.
सुरक्षितता उपाय
भारतात कसं आहे की अपघात झाला की
सरकार जबाबदार.रस्त्यामुळे अपघात होतात,खडयामुळे अपघात होतात हे देखिल खरे आहे.पण
सर्वात जास्त अपघात हे मानवी चुका आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होतात हे
देखिल तितकेच खरे आहे. सुरक्षा उपाय जसे सीट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे,वाहतूक
नियमांचे पालन करणे (वेगमर्यादेचे पालन, सिग्नल पाळणे, उलट्या दिशेने वाहन न
चालविणे,आपल्या वाहनांचा नीट रखरखाव (maintenance)
ठेवणे इत्यादि तर आपल्याच हातात आहे. मा. नितीनजी गडकरी सरांनी ह्या संबंधात
जनजागृतीचे काम सुरु केले आहे,पण ते खूप मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे.
सर्वात
महत्वाचे म्हणजे वाहन चालवितांना “आपला जीव ही आपलीच
जबाबदारी आहे सरकारची नाही” हे लक्षात ठेवणे अधिक महत्वाचे आहे.नुकसान आपले
आणि आप्तगण ह्यांचे होणार सरकारचे नाही.
प्रसाद नातु,पुणे


True, there is a need for increasing public awareness and stricter traffic norms
ReplyDeleteआपला जीव ही आपलीच जबाबदारी आहे सरकारची नाही”
ReplyDelete100% correct.
दुर्घटना से देरी भली
नजर हटी दुर्घटना घटी