ब्लॉग नं. 2026/26 6 . दिनांक: 2 3 सप्टेंबर , 2026. मित्रांनो , प्रास्ताविक आरोग्याच्या बाबतीत नेहमीच हे म्हटलं जातं की,“योग्य प्रमाण हेच महत्त्वाचं,कमतरताही टाळा आणि अतिरेकही टाळा.आपल्याला आजकाल माध्यमातून हे सांगितलं जातं की, व्हिटॅमिन D ची कमतरता अतिशय घातक असू शकते.पण एक लक्षांत ठेवा,व्हिटॅमिन D घेत आहात ? जपून ! अति डोस किडनी आणि शरीरातील अवयवांसाठी धोकादायक ठरू शकतो.जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर व्हिटॅमिन D हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे.हाडांची मजबुती , कॅल्शियमचे संतुलन आणि शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते.त्यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास डॉक्टर अनेकदा सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात.मात्र , व्हिटॅमिन D म्हणजे जितके जास्त तितके चांगले असे नाही. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेतल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. व्हिटॅमिन D चा अतिरेक का धोकादायक ठरतो ? Economic Times मधील लेखानुसार , ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .