ब्लॉग नं. 2026/ 240. दिनांक: 28 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 5 — जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला मध्यमवयीन माणूस मित्रांनो , “पिया का घर” या चित्रपटातलं,किशोरकुमारने गायलेलं गीत आठवतंय. “ये जीवन है, इस जीवन का,यही है, यही है रंग रूप, थोडे गम है,थोडी खुशियां, यही है छाव धूप.” आजकालच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवयीन माणसाच्या जीवनाचं हे गाणं म्हणजे पोर्ट्रेट म्हणता येईल.” माणसाच्या आयुष्यातला मध्यमवयीन काळ कदाचित सर्वांत गुंतागुंतीचा असतो. एका बाजूला मुलांच्या भविष्याची चिंता. दुसऱ्या बाजूला वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, पेक्षाही त्यांची वाढती आजारपणं, त्यात नोकरी , घराचा खर्च , कर्जाचे हप्ते , मुलांचं शिक्षण , मुलीचं लग्न , स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष... आणि या सगळ्यांच्या मध्ये स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवतं. मध्यमवयीन व्यक्ती अनेकदा घरातील “ सगळं सांभाळणारी व्यक्ती” बनते. सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवताना स्वतःची गरज विसरते. मुलांना चांगलं भविष्य द्यायचं म्हणून, पालक स्वतःच्या इच्छा पुढे ढकलतात, मुरड घालतात. आई...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .