ब्लॉग नं. 2026/238.
दिनांक: 26 ऑगस्ट, 2026.
व्यथांच्या
कथा 3— नोकरी आहे, पगार आहे; पण
समाधान कुठे आहे?
मित्रांनो,
नोकरी लागते,पगार चांगला असतो,पण समाधान नसतं.काहींचा बॉस समजून घेणारा नसतो.कुठे लायकी नसणारा,पण पुढे पुढे करणारा प्रमोशन घेऊन जातो.आज काल दुसरीकडे स्विच होण्याचा ऑप्शन असतो. पण ते लगेच काही,नाही ना जमतं.या परिस्थितीवर अमोल पालेकरांच्या “बातो बातोमे” मधील किशोरकुमारचं गीत आठवंत. “कहाँ तक ये मन को,अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे” ची आठवण येते.पण त्यातील या ओळी ऐकून पुढे जायचं असतं. “कही सुख कही दुख, यही जिंदगी है,ये पतझड का मौसम घडी दो घडी है, नये फूल कल फिर डगरमे खिलेंगे.” असा आशावाद पुढे जगायची प्रेरणा देतो.
नोकरी करणारा माणूस बाहेरून
स्थिर:
नोकरी करणारा माणूस आपल्याला
बाहेरून पाहिला तर स्थिर दिसतो.
महिन्याला पगार येतो, घर चालतं,
मुलांचं शिक्षण होतं, EMI भरली जाते.
मग त्याला कसली व्यथा असणार?
पण प्रत्येक महिन्याला पगार
मिळतो,
म्हणून मनाला समाधान मिळतंच असं
नाही.
ऑफिसमध्ये कामाचा ताण,वरिष्ठांची वाढलेल्या अपेक्षा,
सहकाऱ्यांमधील स्पर्धा, टार्गेट्स, बैठका,
ई-मेल्स, फोन आणि सतत बदलणारं कामाचं
वातावरण...
काम संपतं; पण काम डोक्यातून संपत नाही.
घरी आल्यानंतरही ऑफिसचा विचार
सुरूच असतो.
“उद्या
प्रेझेंटेशन आहे.”
“टार्गेट पूर्ण
झालं नाही.”
“बॉस काय म्हणतील?”
“माझ्यापेक्षा
कमी काम करणाऱ्या व्यक्तीला प्रमोशन कसं मिळालं?”
या विचारांमध्ये माणूस
स्वतःसाठी जगायलाच विसरतो.
नोकरीतील आणखी एक मोठी व्यथा
म्हणजे वेळेची कमतरता.
पैसा कमावण्यासाठी वेळ द्यावा
लागतो;
पण पैसा कमावताना ज्यांच्यासाठी
पैसा कमावतो,
त्यांच्यासाठीच वेळ उरत नाही.
मुलं मोठी होत असतात आणि
पालकांच्या लक्षात येतं—
“आपण त्यांचं
बालपण पाहिलंच नाही.”
आई-वडील वृद्ध होत असतात आणि
जाणवतं—
“त्यांच्यासोबत
बसायला वेळच मिळाला नाही.”
शरीर सांगत असतं, “थोडं थांब.”
मन सांगत असतं, “मला थोडा वेळ हवा.”
पण नोकरी सांगत असते—
“अजून काम बाकी
आहे!”
म्हणून नोकरी महत्त्वाची आहेच;
पण नोकरी म्हणजे जीवन नव्हे.
जीवनात काम असावं; पण कामातच संपूर्ण जीवन हरवू नये.
कारण पगार वाढवता येतो, पद वाढवता येतं,
घर मोठं करता येतं;
पण गेलेला वेळ परत विकत घेता
येत नाही.
हा काळ सुद्धा पुनः एकदा परीक्षेचा असतो. काल पर्यन्त आई
वडिलांच्या छत्राखाली असणारी पिढी,आता पालक झालेली असते.आपल्या मुलांचीच नाही तर
आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची. इथे खरंच तारेवरची कसरत असते.ऑफिसमध्ये काम पाठीमागे
लागतात. जो करतो त्यालाच आम्ही सांगणार ना ! हा age old formula
आजही वापरला जातो. अशा वेळी gracefully नाही म्हणायला शिका.
हे खूप गरजेचं आहे. कार्य जीवन असंतुलन ही या phase मधील
पिढीची खरी समस्या आहे.अशा वेळेस संयम, समजूतदारपणा गरजेचा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
होलीस्टीक
हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला
घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.



🙏RR
ReplyDelete