Skip to main content

Posts

Select your Language

व्यथांच्या कथा 4 — गर्दीत माणूस हरवतो तेव्हा.

  ब्लॉग नं. 2026/ 239.   दिनांक: 27 ऑगस्ट, 2026.   व्यथांच्या कथा  4 — गर्दीत माणूस हरवतो तेव्हा... मित्रांनो ,             नोकरीसाठी मी देखिल अपडाऊन केलं,पण आजकालची गर्दी बघितली की, अक्षरक्ष: अंगावर काटे येतात. आपल्या कारमधून जायचं म्हणजे एक वेगळचं सुख होतं,पण आज ते सुख राहिलेलं नाही.अशा वेळी शोर या मनोजकुमारच्या चित्रपटातील एक गाणं आठवंत. “ जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह-ओ-शाम, के रस्ता कट जाएगा मितरा, के बादल छट जाएगा मितरा,के दुःख से झुकना ना मितरा,के एक पल रुकना ना मितरा,जीवन चलने का नाम. . ”   खरं आहे, शहराच्या रस्त्यावर सकाळी बाहेर पडा. थोडीही उसंत मिळत नाही.   बसस्थानकांवर गर्दी , रेल्वे स्थानकांवर गर्दी , रस्त्यांवर वाहनांची गर्दी , मेट्रोमध्ये गर्दी , ऑफिसमध्ये गर्दी... माणूस माणसांच्या समुद्रात रोज प्रवास करतो. पण गंमत अशी की, या प्रचंड गर्दीतही तो अनेकदा एकटा असतो. सकाळी घरातून निघताना वेळेची घाई. रस्त्यावर वाहतूक कोंडी. बस उशिरा. रेल्वे उशिरा. ऑफिसला पो...

व्यथांच्या कथा 3— नोकरी आहे, पगार आहे; पण समाधान कुठे आहे?

  ब्लॉग नं. 2026/ 238.   दिनांक: 26 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा  3— नोकरी आहे , पगार आहे ; पण समाधान कुठे आहे ? मित्रांनो ,             नोकरी लागते,पगार चांगला असतो,पण समाधान नसतं.काहींचा बॉस समजून घेणारा नसतो.कुठे लायकी नसणारा,पण पुढे पुढे करणारा प्रमोशन घेऊन जातो.आज काल दुसरीकडे स्विच होण्याचा ऑप्शन असतो. पण ते लगेच काही,नाही ना जमतं.या परिस्थितीवर अमोल पालेकरांच्या “बातो बातोमे” मधील   किशोरकुमारचं गीत आठवंत. “कहाँ तक ये मन को,अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे” ची आठवण येते.पण त्यातील या ओळी ऐकून पुढे जायचं असतं. “कही सुख कही दुख, यही जिंदगी है,ये पतझड का मौसम घडी दो घडी है, नये फूल कल फिर डगरमे खिलेंगे.” असा आशावाद पुढे जगायची प्रेरणा देतो.                          नोकरी करणारा माणूस बाहेरून स्थिर: नोकरी करणारा माणूस आपल्याला बाहेरून पाहिला तर स्थिर दिसतो. महिन्याला...

व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं, पण प्रश्न संपले नाहीत!

  ब्लॉग नं. 2026/ 237.   दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात.                               शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात.    शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...

व्यथांच्या कथा भाग 1 शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार?

ब्लॉग नं. 2026/236.   दिनांक: 24 ऑगस्ट, 2026.     व्यथांच्या कथा भाग 1 — शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार?   मित्रांनो ,  तुम्हाला आठवतंय, मिली चित्रपटातील एक गीत,जे लता  मंगेशकर यांनी गाईले होते आणि जया भादुरी, हो तेव्हा त्या जया भादुरीच होत्या.त्यांच्यावर चित्रित झाले होते.त्याचे बोल होते, “ मैंने कहा फूलों से.. . मैंने कहा फूलों से , " हँसो " तो वो खिलखिला के हँस दिए,और ये कहा , " जीवन है भाई , मेरे भाई , हँसने के लिए, हँसने के लिए.” गीतकार योगेश यांचं हे गीत. लहानपण हे खरंच हसण्याचं असतं.पण मी आज काल मुलांच्या,विशेषतः माझ्या नातवंडांच्या पिढीकडे बघतो आणि काही गोष्टी मनांत ते येतात,त्या शब्दबद्ध केल्या आहेत.             लहानांना व्यथा असतात?  आपण मोठ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करतो ; पण घरात , शाळेत आणि समाजात वावरणाऱ्या लहान मुलांच्या मनातही अनेक व्यथा दडलेल्या असतात , याचा आपण अनेकदा विसर पडतो.शाळेत जाणाऱ्या मुलाचं आयुष्य वरवर पाहता किती सुंदर वाटतं! स...

डायबिटीज आणि फ्रोजन शोल्डर

  ब्लॉग नं. 2026/ 235.   दिनांक: 233  ऑगस्ट, 2026.   मित्रांनो ,  डायबिटीज आणि फ्रोजन शोल्डर: जर तुम्हाला मधुमेह असेल,आणि काही दिवसांपासून खांदा उचलताना त्रास किंवा तीव्र वेदना होत असतील , तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.हा केवळ एक सामान्य स्नायूंचा ताण नसून ' डायबिटीज शोल्डर ' म्हणजेच वैद्यकीय भाषेत ' फ्रोजन शोल्डर ' (Frozen Shoulder) असू शकतो. ' जर्नल ऑफ डायबेटिस इन्व्हेस्टिगेशन ' नुसार , सामान्य लोकांमध्ये खांद्याच्या समस्यांचे प्रमाण 5% असते , तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हेच प्रमाण 27.5% पर्यंत आढळते.या बद्दल आज सविस्तर जाणून घेऊ.   सविस्तर: ' डायबिटीज शोल्डर ' म्हणजे काय आणि ते का होते ? या स्थितीत खांद्याच्या सांध्याभोवतीचे ऊतक ( Connective Tissue) जाड आणि घट्ट होतात , ज्यामुळे हालचाल मंदावते आणि तीव्र वेदना होतात. रक्तातील साखरेचे उच्च प्रमाण: रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजमुळे शरीरातील ' कोलेजेन ' ( एक महत्त्वाचे प्रथिन) ताठर बनते. कमी रक्तपुरवठा व सूज: दीर्घकालीन मधुमेह आणि सूज ( Inflammation) यामुळे सांध्यांना पुरेसा रक्तपु...

Fraud पासून वाचायचंय AI शिका

  ब्लॉग नं. 2026/ 234.   दिनांक: 22 ऑगस्ट, 2026. मित्रांनो ,  आजच्या ब्लॉगचा विषय आहे,   रोजच्या आयुष्यात AI चा वापर: सर्वसामान्यांचे काम आणि वेळ वाचवणारा डिजिटल साथीदार             अगदी परवाचीच गोष्ट आहे, मी बँकेच्या रिटायर्ड स्टाफच्या AGM साठी पुण्याला जात होतो.ऑटोरिक्शा मला सोयीची पडते, म्हणून ओला बूक केली. ऑटोचालक खूप बोलका होता. असं फारच कमी घडंत.बोलतांना आपल्या मुलाची गोष्ट सांगत होता. त्याच्या 4 थीत असलेल्या मुलाला शिक्षकांनी एक संस्कृत श्लोक शिकवला. मुलाने आईला सांगितला, आईला अर्थ सांगता आला नाही.त्याने बाबांना विचारला. ऑटोचालक म्हणाला, “तो श्लोक त्याला माहित होता,पण त्याने Google Gemini ला विचारलं आणि मुलाला अर्थ सांगितला.या ऑटोचालका विषयी एक ब्लॉग मी लिहिनच,पण सध्या एवढं उदाहरण यासाठी की, AI चा वापर आता अनिवार्य आहे.प्रत्येकाने हे शिकायचा प्रयत्न करायला हवा. ज्यांना आपल्या ऑफिसमध्ये करावा लागतो,ते करत आहेतच, पण सर्वसामान्यांनी AI शिकायला हवे.       AI कशासाठी श...