ब्लॉग नं. 2026/085. दिनांकः 26 मार्च , 2026. मित्रांनो , आरोग्याची गुरुकिल्ली: तुमचे शरीर की तुमचे विचार ? आपण आजारी का पडतो ? याचं उत्तर शोधायला गेलो तर,आपण जंतू , हवामान किंवा खाण्यापिण्याकडे बोट दाखवतो. पण कधी विचार केलाय का की , या सगळ्याच्या मागे आपलं ' अज्ञ मन ' (Subconscious Mind) असू शकतं ? याबद्दल आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमधे. सविस्तरः आजच्या धावपळीच्या जगात,आपण शरीराच्या व्याधींवर हजारो रुपये खर्च करतो . पण मनाच्या व्याधींकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग , आज जाणून घेऊया शरीर आणि मन यांच्यातील हे अनोखे नाते. 1. नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवा: माणूस पाण्यात का बुडतो ? कारण त्याच्या मनाने घट्ट स्वीकारलेलं असतं की,मला पोहता येत नाही. याउलट , हत्ती किंवा सापाला कोणी पोहायला शिकवत नाही , तरीही ते उत्तम पोहतात.कारण त्यांना स्वतःच्या नैसर्गिक शक्तीवर शंका नसते.आपल्या शरीरातही ' रोगप्रतिकारशक्ती ' नावाचा एक नैसर्गिक डॉक्टर,चोवीस तास काम करत असतो.जेव्हा आपण छोट्या आजारांसाठी लगेच औषधांचा भडिमार करतो , तेव्हा आपण खरं तर आपल्या शरीरावर अत्याचार करत अ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .