ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लॉग सं. 2025/142 दिनांकः 2 3 मे , 2025. मित्रांनो , महिला या एकंदरीतच जास्त काटक असतात,असं पूर्वीपासून मानलं जातं.पण हा समज असेल किंवा वास्तविकता,यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याबाबत उदासीन असतात आणि बऱ्याच गोष्टी अंगावर काढतात. त्यांना काही त्रास होत असेल तर कुणाला सांगत देखिल नाहीत. पण यामुळे काही वेळा एखाद्या लहान दुखण्याचे मोठ्या दुखण्यात होऊ शकते.आजचा ब्लॉग हा महिलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे. सविस्तर: महिलांमध्ये वयाच्या 45 नंतर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.बदलती जीवनशैली , हार्मोन्समधील बदल आणि वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाब , कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारासारख्या समस्या सामान्य होत आहेत.त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते , नियमित आरोग्य तपासणीमुळे हृदयविकार वेळेवर ओळखता येतो आणि गंभीर स्थिती टाळता येते. वयाच्या 45 नंतर महिलांनी कोणत्या महत्त्वाच्या चाचण्...