Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

महिलांनी 45 व्या वर्षा नंतर करावयाच्या टेस्ट

ब्लॉग सं. 2025/142

दिनांकः 23 मे, 2025. 

 मित्रांनो

            महिला या एकंदरीतच जास्त काटक असतात,असं पूर्वीपासून मानलं जातं.पण हा समज असेल किंवा वास्तविकता,यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याबाबत उदासीन असतात आणि बऱ्याच गोष्टी अंगावर काढतात. त्यांना काही त्रास होत असेल तर कुणाला सांगत देखिल नाहीत. पण यामुळे काही वेळा एखाद्या लहान दुखण्याचे मोठ्या दुखण्यात होऊ शकते.आजचा ब्लॉग हा महिलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे.             

सविस्तर:

महिलांमध्ये वयाच्या 45 नंतर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.बदलती जीवनशैली, हार्मोन्समधील बदल आणि वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारासारख्या समस्या सामान्य होत आहेत.त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते, नियमित आरोग्य तपासणीमुळे हृदयविकार वेळेवर ओळखता येतो आणि गंभीर स्थिती टाळता येते. वयाच्या 45 नंतर महिलांनी कोणत्या महत्त्वाच्या चाचण्या करून घ्याव्यात याची माहिती खाली दिली आहे.

1. लिपिड प्रोफाइल चाचणी:

लिपिड प्रोफाइल चाचणीद्वारे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी तपासली जाते. शरीरातील 'वाईट कोलेस्टेरॉल' (LDL) वाढल्यास, तो धमनीत जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. वयाच्या 45 नंतर प्रत्येक महिलेने ही चाचणी वर्षातून एकदा करून घ्यावी. लिपिड प्रोफाइलमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो.

Total Cholesterol                                           < 200  

Triglycerides                                                  < 150

HDL Cholesterol                                            40-60 च्या मध्ये

LDL Cholesterol                                            < 100    

2. रक्तदाबाची तपासणी:

उच्च रक्तदाबाला 'मूक घातक' (Silent Killer) म्हणतात, कारण त्याची स्पष्ट लक्षणे नसतात. अनियंत्रित रक्तदाबामुळे हृदयावर जास्त ताण येतो,ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.45 वयापुढील महिलांनी नियमितपणे रक्तदाब मोजून कोणतीही असामान्यता आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.Blood Pressure हे 120/80 असले पाहिजे.रक्तदाबासोंबत तुमच्या हृदयाचे ठोके हे सामान्यतः 60 ते 100 यामध्ये असावेत असे म्हटले जाते.    

3. ईसीजी (ECG):

हृदयाचे ठोके आणि विद्युत प्रवाह तपासण्यासाठी ईसीजी चाचणी केली जाते. या चाचणीमुळे अनियमित हृदयाचे ठोके (Arrhythmia) आणि हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखता येतात. थकवा, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन ईसीजी चाचणी करून घ्यावी.

4. रक्तातील साखरेची चाचणी:

मधुमेह आणि हृदयविकार यांचा जवळचा संबंध आहे. रक्तातील साखर पातळी जास्त झाल्यास हृदयाच्या धमण्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे महिलांनी 45 वयानंतर नियमितपणे फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c चाचणी करून रक्तातील साखर पातळी तपासावी.जे मधुमेही नाहीत,त्यांचे HbA1c  5.7 < इतके असावे.  

समारोप:

मित्रांनो,मी ही इथे माहिती केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी दिली आहे. आरोग्यविषयक कोणतीही माहिती वाचल्यानंतर,ती अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.पण एक गोष्ट जरूर सांगेन जे पूर्वीपासून सांगितले गेलेले आहे.Precaution is better than Cure. मग त्यासाठी आपले थोडे पैसे खर्च झाले तर चालतील.पैसे महत्वाचे नाहीत तर जान बची लाखों पाये.        

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु, पुणे.

 


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...