Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

बेल एक उपयोगी फळ

ब्लाॅग सं.2025/139
दिनांकः- 20 मे, 2025.

मित्रांनो,

बेल ही भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीला धार्मिक, अध्यात्मिक आणि औषधी उपयोगांमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलाच्या पानांचा, फळांचा, सालीचा आणि मुळांचा वापर विविध विकारांवर केला जातो. चला, आजच्या ब्लॉगमध्ये,बेल वनस्पतीचे आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया.

सविस्तरः

बेल पानाचा आरोग्यदृष्ट्या खूप फायदा आणि उपयोग होतो.हे तुम्हाला खालील विवेचनावरुण लक्षात येईल.मग मधुमेह असो, किडनीचे विकार असोत, डोळ्याचे किंवा कानाचे विकार असो, हृदय असो किंवा हृदयाशी संबंधित कोलेस्ट्रॉल,इतकेच काय तर पचनसंस्थेवर देखील बेल फळ किंवा बेल पानाचा रस फायदेकारक आहे.          

1. मधुमेह नियंत्रण:

रोज सकाळी उपाशीपोटी 30 मि.ली. बेल पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

2. डोळ्यांचे विकार:

बेल पानांचा दोन दोन थेंब रस, डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांच्या विकारांपासून मुक्ती मिळते.

3. मानसिक स्थैर्य:

मानसिक अस्थिरता असलेल्या लोकांनी रोज सकाळी,उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खाल्ल्यास मनःशांती मिळते.

4. कानाचे विकार:

10-15 बेल पाने ठेचून तिळाच्या तेलात गरम करावीत,आणि हे तेल कानात टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

5. किडनी आणि यकृतासाठी:

बेल पानांचा रस प्यायल्याने किडनी आणि यकृताच्या समस्यांवर गुणकारी परिणाम होतो.

6. पचनसंस्थेसाठी:

कच्च्या बेल फळाचा रस प्यायल्याने,पोटदुखी, मुरडा, आतड्यांना सूज आणि अल्सरेटिव्ह कोलाइटिस, यांसारख्या विकारांवर गुणकारी परिणाम होतो.

7. हृदयासाठी फायदेशीर:

रोज सकाळी उपाशीपोटी 30-40 मि.ली. बेल पानांचा रस, प्यायल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात आणि हृदयाचे कार्य सुधारते.

8. शरीरातील उष्णतेसाठी:

बेल फळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

9. रक्तवाढीसाठी:

बेल पानांचा रस नियमित प्यायल्याने,शरीरात रक्तवाढ होते आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.

10. कोलेस्ट्रॉल नियंत्रण:

सात-आठ बेल पानांचा काढा तयार करून,तो उपाशीपोटी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.

11. अपचन आणि गॅसेस:

सकाळी उपाशीपोटी 4-5 चमचे बेल पानांचा रस प्यायल्याने,अपचन, गॅसेस आणि मलावरोध त्वरित बरे होतात.

12. थायरॉईडसाठी:

आठ-दहा बेल पानांचा काढा,रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने थायरॉईडचे विकार दूर होतात.

 

13. ताप आणि खोकल्यासाठी:

वारंवार ताप येणे व खोकल्याच्या समस्यांवर,सकाळ-संध्याकाळ बेल पानांचा दोन चमचे रस पिणे लाभदायक ठरते.

समारोपः

बेल ही वनस्पती केवळ आरोग्यदृष्ट्या नव्हे,तर अध्यात्मिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे. आपल्या आजारांवर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी,बेल वनस्पतीचा योग्यप्रकारे उपयोग करावा. या वनस्पतीचे संवर्धन व संगोपन करून,आपण निसर्गाचे आणि आरोग्याचे रक्षण करू शकतो.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

  1. उपयोगी माहिती🙏RR

    ReplyDelete
  2. जुलाबांवर बेलफळाचा मुरंबा खूपच उपयुक्त आहे असा माझा अनुभव आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...