Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

भारतात हायड्रोजन ट्रेन धांवणार !

ब्लॉग नं: 2025/136

दिनांक: 17 मे, 2025.

मित्रांनो

        तुम्ही कधी हायड्रोजन ट्रेनबद्दल ऐकलंत का? नसेल ऐकलं तर आजच्या ब्लॉगमधे हायड्रोजन ट्रेनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.बऱ्याच काळापासून असे सांगितलं जातं आहे की,भारत देखिल जर्मनी किंवा चीनप्रमाणे हायड्रोजन ट्रेन बनवण्याचा प्रयत्न करत आहे.यासंबंधात एवढ्यात,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे आणि यासंबंधात एक अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, याच महिन्यात, पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. 

सविस्तरः

आपण अनुभवतं आहोत की,जगभर पर्यावरणाच्या प्रश्नाने भंडावून सोडले आहे,चिंतेत टाकले आहे.या दृष्टीने पाहिलं तर,ही हायड्रोजन ट्रेन आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरणार आहे,हे आपण जाणून घेणार आहोत.   हायड्रोजन इंधन किंवा हायड्रोजनशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टी,कार्बन उत्सर्जित करत नाहीत, हायड्रोजन इंधन बनवणे किंवा हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणे,हे थोडे थोडे कठीण असले तरी, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात काय उपलब्ध असेल,तर ते पाणी आहे आणि पाण्यात काय काय आहे,तर हायड्रोजन आणि ऑक्सीजन आहे.त्यातही पाण्याच्या एका अणूमध्ये दोन हायड्रोजन अणू असतात,त्यामुळे हायड्रोजन सर्वात सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे.या हायड्रोजनचाच वापर करुन ट्रेन चालवली जाणार आहे. 

 जगात कुठे कुठे हायड्रोजन ट्रेन धांवते?

            जागतिक स्तरावर पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे ही जर्मनीत धांवली तर हायड्रोजन ट्रेन चालवणारा दुसरा देश चीन आहे.आता त्यात जगात तिसरा,आता आपला नंबर असणार आहे.  

भारतात पहिली ट्रेन कुठे धावणार

भारतात हरियाणातील जिंद आणि सोनिपत दरम्यान, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. 1000 हॉर्स पॉवरवरचे इंजिन असणार आहे . जगात सध्या 600 ते 700 हॉर्स पॉवरवरची इंजिन प्रचलित आहेत. या ट्रेनमधे एका वेळी जास्तीतजास्त 2638 प्रवासी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतील. यात जर जास्त प्रवासी बसले तर, लिफ्ट जशी ओव्हरलोड झाली की जागीच थांबते,तशी ही ट्रेन जागीच थांबून राहील.

ट्रेनचे डिझाईनः

आता हिच्या डिझाइनबद्दल थोडे काही.या ट्रेनची रचना लखनौच्या रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने केली आहे,यात आठ प्रवासी कोच आहेत आणि त्यासोबत दोन हायड्रोजन इंधन कोच देखील बसवण्यात आले आहेत.आपण पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक गाड्या नेहमी सुरू ठेवू शकतो,पण यामध्ये एकदा इंधन भरले की,थोडी वाट पहावी लागते आणि त्यानंतर ही ट्रेन 1000 किमी पर्यन्त धावू शकते.हायड्रोजन ट्रेनचा वेग 140 प्रती तास असणार आहे.जर्मनीमधे सुरुवातीला दोन बोगी सह हायड्रोजन ट्रेन चालवण्यांत आली.आपण मात्र आठ कोचेसची हायड्रोजन ट्रेन सुरु करत आहोत.

समारोपः

या हायड्रोजन ट्रेनचे वैशिष्ट म्हणजे,ही ट्रेन CO2 किंवा कोणताही पर्यावरणीय प्रदूषक उत्सर्जित करणार नसून, फक्त पाणी आणि वाफ उत्सर्जित करणार आहे.याचा अर्थ ही ट्रेन पर्यावरणपूरक आहे. 

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 


प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...