ब्लॉग नं. 2026/239.
दिनांक: 27 ऑगस्ट, 2026.
व्यथांच्या कथा 4 — गर्दीत माणूस हरवतो तेव्हा...
मित्रांनो,
नोकरीसाठी मी देखिल अपडाऊन केलं,पण आजकालची गर्दी बघितली
की, अक्षरक्ष: अंगावर काटे येतात. आपल्या कारमधून जायचं म्हणजे एक वेगळचं सुख
होतं,पण आज ते सुख राहिलेलं नाही.अशा वेळी शोर या मनोजकुमारच्या चित्रपटातील एक
गाणं आठवंत. “जीवन चलने का नाम, चलते रहो
सुबह-ओ-शाम, के रस्ता कट जाएगा मितरा, के बादल छट जाएगा मितरा,के दुःख से झुकना ना
मितरा,के एक पल रुकना ना मितरा,जीवन चलने का नाम..”
खरं आहे, शहराच्या रस्त्यावर
सकाळी बाहेर पडा.
थोडीही उसंत मिळत नाही.
बसस्थानकांवर गर्दी, रेल्वे स्थानकांवर गर्दी,
रस्त्यांवर वाहनांची गर्दी, मेट्रोमध्ये गर्दी, ऑफिसमध्ये गर्दी...
माणूस माणसांच्या समुद्रात रोज
प्रवास करतो.
पण गंमत अशी की,
या प्रचंड गर्दीतही तो अनेकदा एकटा
असतो.
सकाळी घरातून निघताना वेळेची
घाई.
रस्त्यावर वाहतूक कोंडी.
बस उशिरा.
रेल्वे उशिरा.
ऑफिसला पोहोचण्याची चिंता.
संध्याकाळी पुन्हा तोच प्रवास.
घरी पोहोचेपर्यंत शरीर थकलेलं
असतं आणि मनही.
दररोज दोन-तीन तास प्रवास
करणाऱ्या व्यक्तीचा
किती वेळ या प्रवासात जातो,
याचा आपण विचारच करत नाही.
हा केवळ वेळेचा प्रश्न नाही.
हा मानसिक थकव्याचाही प्रश्न
आहे.
वाहतूक कोंडी,हॉर्नचा आवाज, प्रदूषण,
गर्दी, धावपळ आणि सततची घाई यामुळे
माणसाला शांत बसण्याची संधीच
मिळत नाही.
आणखी गंमत म्हणजे हातात मोबाईल
असूनही,
संवाद कमी झाला आहे.
शेजारी बसलेल्या व्यक्तीशी
बोलण्याऐवजी आपण स्क्रीनकडे पाहतो.
घरात पोहोचल्यानंतरही मोबाईल.
ऑफिसमध्येही मोबाईल.
रस्त्यावरही मोबाईल.
माणूस जोडला गेला आहे, पण मनं दूर गेली आहेत.
या धावपळीमध्ये स्वतःला एक
प्रश्न विचारायला हवा—
“मी कुठे चाललो
आहे?”
केवळ ऑफिसकडे जाणारा प्रवास
नव्हे;
तर आयुष्याचा प्रवास.
कारण वेगाने धावणं म्हणजे पुढे
जाणं असतंच असं नाही.
कधी कधी थांबणंही गरजेचं असतं.
स्वतःशी बोलण्यासाठी.
आपल्या माणसांशी बोलण्यासाठी.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—
स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी.
समारोप:
आपल्याला वाटतं की, या अपडाऊनमध्ये फक्त शारीरिक थकवा येतो,
पण असं नाही, त्यापेक्षा अधिक मानसिक थकवा येतो.जो जास्त गंभीर आहे. शारीरिक
थकव्याला, एखादं सरबत, एखादं एनर्जि ड्रिंक घेऊन दूर करता येतं. मानसिक थकवा
त्याच्यासाठी काय उपाय आहेत ते बघू या.
1.घरी येताच 10 मिनिटे
‘Transition Time’ घ्या – लगेच
कामे किंवा मोबाईलमध्ये न गुंतता शांत बसा.
2.कपडे बदलून
चेहरा धुवा किंवा आंघोळ करा – शरीराला आणि मेंदूला ‘काम संपले’ असा
संकेत मिळतो.
3.5–10 मिनिटे
शांत श्वसन करा – डोळे बंद करून हळूहळू खोल श्वास घ्या
आणि सोडा.
4.हलके संगीत किंवा थोडे चालणे – मनातील
ताण कमी करून मूड सुधारण्यास मदत होते.
5.कुटुंबासोबत
आनंदी संवाद करा
– कामाच्या समस्या बाजूला ठेवून 15–20 मिनिटे
मनमोकळ्या गप्पा मारा.
या गोष्टी तुमचा मानसिक थकवा
घालविण्यास मदत करतील.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
होलीस्टीक
हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला
घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

🙏RR
ReplyDeleteThanks
DeleteThanks
Deleteछान ब्लॉग
ReplyDelete