Skip to main content

तुमचा सकाळचा चेहरा दर्शवितो तुमचे आरोग्य !

ब्लॉग नं. 2026/ 213.   दिनांक: 1 ऑगस्ट, 2026.   मित्रांनो , सकाळचा चेहरा आणि तुमचे आरोग्य: सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय करतो ? बहुतांश लोक आरशात स्वतःचा चेहरा पाहतात. पण हा सकाळचा चेहरा फक्त तुमचे सौंदर्यच दाखवत नाही , तर तुमच्या शरीराच्या अंतर्गत आरोग्याची स्थितीही मांडत असतो. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि पारंपारिक चिनी वैद्यकशास्त्र ( Traditional Chinese Medicine) या दोघांच्या मते , तुमच्या चेहऱ्यावरील छोटे-छोटे बदल तुमच्या आहारातील त्रुटी , तणाव , पाण्याचे प्रमाण आणि अवयवांचे आरोग्य दर्शवत असतात. या बाबत सविस्तर जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर:   1 . चेहऱ्यावरील सूज आणि त्याची आधुनिक कारणे : सकाळी उठल्यावर अनेकदा चेहरा किंवा डोळ्यांच्या पापण्या सुजलेल्या दिसतात. ही सूज सहसा तात्पुरती असते , जी काही तासांत ओसरते. याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत: खानपानाच्या सवयी : रात्री उशिरा खारट (मीठ जास्त असलेले) पदार्थ खाणे किंवा मद्यपान केल्याने शरीरात पाणी साचून राहते ( Water Retention). झोपण्याची पद्धत: अगदी पाठीवर सरळ झोपल्याने चेहऱ्याकडे द्रवाचा...

Select your Language

वाढत्या वयासोबत येणारा थकवा

 ब्लॉग नं. 2026/150.

दिनांक: 30 मे, 2026. 

मित्रांनो,

वाढत्या वयासोबत येणारा थकवा

तुम्हाला कधी असे वाटले आहे का की, पूर्वीसारखी ऊर्जा आता शरीरात राहिलेली नाही? दुपारनंतर येणारा अती थकवा, स्नायूंची कमजोरी किंवा कारणाशिवाय जाणवणारा मानसिक धुरकटपणा (Mental Fog) या सर्व गोष्टींना,आपण सहसा 'म्हातारपण' म्हणून स्वीकारतो. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो किंवा वयाचा तगादा म्हणून सोडून देतो. पण आधुनिक वैज्ञानिक संशोधन काही वेगळेच आणि अत्यंत महत्त्वाचे सांगते.काय ते आजच्या ब्लॉगमध्ये वाचा.

सविस्तर:   

आमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये,एक अत्यंत महत्त्वाचा रेणू (Molecule) असतो,जो आपली ऊर्जा, डीएनए दुरुस्ती (DNA Repair) आणि वृद्धत्वाची गती नियंत्रित करतो. या रेणूचे नाव आहे NAD+ (Nicotinamide Adenine Dinucleotide).

एका वैज्ञानिक अभ्यासानुसार,वयाच्या 40 ते 60 वर्षांच्या दरम्यान,शरीरातील NAD+ ची पातळी तब्बल 50% ने घटते.तर वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत पोहोचताना,ही पातळी 30% पर्यंत खाली येते. हा केवळ एक छोटासा बदल नसून,शरीरासाठी एक 'बायोलॉजिकल क्लिफ' (जैविच कडा) आहे, ज्यावरून आपले शरीर हळू हळू थकवा आणि वृद्धत्वाच्या दरीत कोसळत असते.

NAD+ चे शरीरातील महत्त्व काय?

NAD+ हे आपल्या शरीरातील वायरिंगमधून वाहणाऱ्या विजेसारखे काम करते. या विजेशिवाय शरीराचे कार्य चालणे अशक्य आहे. हे शरीरातील 400 हून अधिक एन्झाईम प्रक्रियांमध्ये सक्रिय भाग घेते.

·        ऊर्जा निर्मिती: पेशींचे ऊर्जाघर असलेल्या 'मायटोकॉन्ड्रिया'ला,(Mitochondria) NAD+ शिवाय ऊर्जा तयार करता येत नाही.जेव्हा हे प्रमाण कमी होते, तेव्हा शरीराला कायम थकवा जाणवतो.

·        दीर्घायुष्य आणि पेशींची दुरुस्ती: हे 'सर्टुइन्स' (Sirtuins) नावाच्या दीर्घायुष्य देणाऱ्या प्रथिनांना सक्रिय करते,जी पेशींची सूज (Inflammation) कमी करण्याचे आणि डीएनए दुरुस्तीचे मुख्य काम पाहतात.

·        मेंदूचे आरोग्य: आपल्या मेंदूच्या पेशींना,(Neurons) शरीरात सर्वात जास्त ऊर्जेची गरज असते. NAD+ कमी झाल्यास मेंदूची कार्यक्षमता मंदावते,आणि विसरभोळेपणा किंवा मानसिक धुरकेपणा वाढतो.

खात्रीशीर उपाय: निकोटिनामाइड रायबोसाईड (NR):

हार्वर्ड आणि वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधनात,असे दिसून आले आहे की, व्हिटॅमिन B3 चा एक विशिष्ट प्रकार, निकोटिनामाइड रायबोसाईड (NR), शरीरातील NAD+ ची पातळी पुन्हा नैसर्गिकरीत्या वाढवू शकतो. हा नेहमीच्या मल्टिव्हिटॅमिनमधील नायसिनपेक्षा (Niacin) पूर्णपणे वेगळा आहे.नायसिनमुळे अनेकदा त्वचेला खाज किंवा लालसरपणा (Flushing) येऊ शकतो,परंतु 'NR' मुळे असा कोणताही त्रास होत नाही आणि तो पेशींमध्ये अत्यंत जलद गतीने शोषला जातो.

मार्गारेट आणि हॅरोल्ड यांची यशोगाथा:

72 वर्षांच्या मार्गारेट यांनी तीव्र थकव्यामुळे,दुपारचे बाहेर जाणे आणि आपल्या बहिणीशी बोलणेही बंद केले होते. तर 69 वर्षांच्या हॅरोल्ड यांची हाताची पकडण्याची ताकद,(Grip strength) खूप कमी झाली होती. मात्र, 'NR' चे सेवन सुरू केल्यानंतर,मार्गारेट पुन्हा लायब्ररीमध्ये आनंदाने काम करू लागल्या,तर हॅरोल्ड यांच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये,लक्षणीय सुधारणा झाली.हा बदल एका रात्रीत झाला नाही,तर यासाठी 6 ते 12 आठवड्यांचा सातत्यपूर्ण काळ लागला.

सुरक्षिततेचा नियम आणि योग्य प्रोटोकॉल

जर तुम्हाला याचे सेवन सुरू करायचे असेल तर खालील वैज्ञानिक नियमांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे:

1.       योग्य डोस: रोज सकाळी न्याहारीसोबत 300 मिलीग्राम (mg) ने सुरुवात करा. हे रात्री घेण्याचे टाळा, कारण यामुळे ऊर्जेची पातळी वाढून झोपेत अडथळा येऊ शकतो.

2.       योग्य उत्पादन निवडा: खरेदी करताना बाटलीवर 'Nicotinamide Riboside Chloride' किंवा 'True Niagen' असे लिहिलेले असावे. तसेच ती  उत्पादने USP, NSF किंवा Informed Sport द्वारे प्रमाणित (Third-party tested) असावीत.

3.       डॉक्टरांचा सल्ला आवश्यक: जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे (Blood Thinners), केमोथेरपी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधे घेत असाल, किंवा तुम्हाला यकृत/किडनीचा कोणताही आजार असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे सुरू करू नका.

4.       जोडीला व्यायाम आणि प्रोटीन: या सप्लीमेंटसोबत हलका रेझिस्टन्स व्यायाम (उदा. रेझिस्टन्स बँड वापरणे किंवा घरगुती वजन उचलणे) करा आणि आपल्या वजनाच्या प्रति किलो 1.2 ग्रॅम प्रोटीन दररोज आहारात ठेवा.

समारोप:

वृद्धत्व ही एक नैसर्गिक आणि अटळ प्रक्रिया असली,तरी त्यासोबत येणारा थकवा,कमजोरी आणि हतबलता आपण गपचूप स्वीकारलीच पाहिजे असे नाही.योग्य वैज्ञानिक माहिती,योग्य सप्लीमेंट्स आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदलांच्या मदतीने,आपण वाढत्या वयातही आपल्या शरीराला पुन्हा पहिल्यासारखे, ऊर्जावान आणि उत्साही बनवू शकतो.

तुम्हालाही आजकाल असा थकवा,किंवा विसरभोळेपणा जाणवतो का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

होलीस्टीक हेल्थ कोच

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...