Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

Mind–Body Connection

 ब्लॉग नं. 2026/046.

दिनांक: 15 फेब्रुवारी, 2026. 

मित्रांनो,

मेंदूतला एक ‘स्विच’ आणि बदललेलं आयुष्य

सर,आता वय झालंय…माझ्याकडून नाही होणार.”ही वाक्यं आपण किती वेळा बोलतोआणि त्याहून महत्त्वाचं,किती वेळा मनापासून मानतो? पण एक गोष्ट सांगतो की,कधी कधी शरीराचं वय बदलायला औषध, शस्त्रक्रिया किंवा सप्लिमेंट लागत नाहीत. फक्त मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ करावा लागतो.म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ या,आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

1979 सालचा एक अविश्वसनीय प्रयोग

1979 मध्ये, हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. एलेन लॅंगर यांनी एक धाडसी प्रयोग केला.त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचं होतं (म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळांत जाणे),पण कोणत्याही मशीनशिवाय.त्यांनी जवळजवळ 80 वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले.कुणी काठीशिवाय चालू शकत नव्हतं,कुणाच हात थरथरत होता, कोणाला मोतीबिंदू झालेला तर कोणाला स्वतःचं नावही नीट आठवत नव्हतं.

त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं, वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत.” पण खरं तर, त्यांना पाठवलं जात होतं…1959 सालात, हो 1959 या वर्षात.    

            हे सारं घडतं होतं 1979 साली, डॉ. लॅंगर यांनी बोस्टनमधील एका जुन्या मठाला पूर्णपणे 1959 च्या काळात रूपांतरित केलं. काळा-पांढरा टीव्ही, Ed Sullivan Show, त्या काळातील बातम्या, रेडिओवर जुनी गाणी, मासिकं, वर्तमानपत्रं—सगळं वीस वर्षं जुनं. तिथे 1979 चा कसलाही मागमूस नव्हता. तो परिसरच सांगत होता की तुम्ही अजूनही तरुण आहात.”

पहिला मानसिक धक्का:

आठ वृद्ध पुरुष आले.त्यांना वाटलं, कोणी तरी येऊन सामान उचलून खोलीत नेईल.पण डॉ. लॅंगर ठामपणे म्हणाल्या, इथे कोणीही मदत करणार नाही. तुम्हालाच बॅगा उचलाव्या लागतील.”  ते चिडले. कुरकुरले.
पण पर्याय नव्हता.जड सूटकेसेस घेऊन जिना चढले. आणि तिथेच त्यांच्या मेंदूला पहिला संदेश गेला,मी असहाय नाही. मी हे करू शकतो.” एकच अट: तुम्ही 1959 मध्ये आहात या आठवडाभरासाठी.  त्यांना असं वागायचं होतं की सध्या साल 1959 आहे.भूतकाळाबद्दल नाही, फक्त वर्तमानकाळात बोलायचं. आत्ता राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवर काय करत आहेत?” फिडेल कास्त्रो हवाना मध्ये काय करत असतील?”त्या काळातील राजकारण, खेळ, चित्रपट, या सगळ्यांवर चर्चा. जेंव्हा ते होते, 55-60 वर्षांचे आणि जगायचे होते,त्याच ऊर्जेने.  

तिसऱ्या दिवसापासून सुरू झाली जादू:

पहिले दोन दिवस अवघड गेले. पण तिसऱ्या दिवसापासून काहीतरी बदलू लागलं. संधिवातामुळे वाकून बसणारा माणूस आता जेवताना ताठ बसून वाद घालत होता, ज्याला नीट ऐकू येत नव्हतं,तो रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकत होता. ते सगळं वातावरणच सांगत होतं, तुम्ही म्हातारे नाही. तुम्ही अजूनही सक्षम आहात.”

आठवड्याच्या शेवटी अविश्वसनीय दृश्य:

आश्रमासमोरील मैदानात, डॉ. लॅंगर उभ्या राहिल्या…आणि त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.आठवडाभरापूर्वी बसमधून उतरताना मदत घेणारे हे वृद्ध पुरुष… आता मैदानात टच फुटबॉल खेळत होते! हो. फुटबॉल. धावत होते. हसत होते. जणू त्यांचं वय खरंच 20 वर्षांनी कमी झालं होतं.

वैद्यकीय तपासणीनेही धक्का दिला:

प्रयोगानंतर तपासणी झाली. डॉक्टर थक्क झाले. कारण  पकड शक्ती (grip strength) वाढली होती,  सांध्यांची लवचिकता सुधारली होती, दृष्टी आणि श्रवणशक्ती सुधारली होती, चष्म्याशिवाय लहान अक्षरे वाचता येत होती आणि  IQ स्कोअर वाढला होता. आणखी एक आश्चर्य प्रयोगापूर्वी आणि नंतरचे फोटो, अपरिचित लोकांना दाखवले असता ते म्हणाले, नंतरच्या फोटोमध्ये हे लोक खूप तरुण दिसतात!”  फक्त चेहऱ्यावरील भावना नाही,तर चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी झाल्या होत्या.

या प्रयोगाचा खरा संदेश:

डॉ. एलेन लॅंगर यांनी सिद्ध केलं होतं, जेव्हा आपण स्वतःला सांगतो की,मी म्हातारा झालोय… माझ्याकडून होत नाही…” तेव्हा शरीर ते मान्य करतं आणि हळूहळू बंद पडू लागतं. आपला समाज आपल्याला शिकवतो, म्हातारपण म्हणजे आजारपण.  आणि आपण तिच स्क्रिप्ट फॉलो करतो. पण जेव्हा वातावरण बदललं,
आणि त्या वृद्ध लोकांना आपण अजूनही तरुण आहोत” असं वाटायला लागलं…त्यांच्या शरीरानेही
तसाच प्रतिसाद दिला.

समारोप:

            शेवटचा प्रश्न—तुम्हा सर्वांसाठी. कधी तुम्ही म्हणता, मूड नाहीये.” थकवा आलाय.” माझ्याकडून नाही होणार.” पण जरा विचार करा. 80  वर्षांचे लोक फक्त विचार बदलून काठ्या फेकतात आणि फुटबॉल खेळतात…तर तुम्ही का नाही करू शकणार? मर्यादा या तुमच्या शरीरात नाहीत. त्या मनात आहेत. आजच एक छोटा प्रयोग करा. फोन बाजूला ठेवा. आरशात बघा.आणि स्वतःला म्हणा  मी बॉस आहे माझ्या शरीराचा.
माझ्या ऊर्जेला मर्यादा नाहीत.” 
माझ्यावर विश्वास ठेवा, ते तुमचं शरीर आहे ते ऐकायलाच लागेल. आणि सुरुवात करा.तुम्ही स्वतःला बदलवू शकाल. यालाच म्हणतात, Mind–Body Connection: अंतिम प्लेसिबो.    

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. आजचा ब्लॉग आगळावेगळा आणि मस्त

    ReplyDelete
  2. आजचा ब्लॉग व त्यातील निष्कर्ष अविश्वसनीय आहेत
    खरच अस होऊ शकतं का❓
    मन व शरीर यांचा एवढा गहरा संबंध आहे ?
    मला स्वतःला हा ब्लॉग वाचायच्या आधी हा अनुभव आला आहे
    काही काळापासून मी स्वतःला सांगत असतो की मी खूप नशिबवान आहे, मला आयुष्यात जे जे हवे असते ते सर्व मिळाले आहे
    मी ईश्वराचे आभार मानतो कि त्याने मला ईतके छान आयुष्य दिले
    तुम्हाला खरच सांगतो मी स्वतः ला सगळ्या जगात नशिबवान व्यक्ती समजायला लागलो आहे
    ह्या ब्लॉगने माझ्या वागण्याची व अनुभवाची पुष्टी केली आहे
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment