Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

डायबेटिक न्युरोपॅथी म्हणजे काय?

ब्लॉग नं: 2025/204.

दिनांक: 24 जुलै, 2025. 

मित्रांनो,

मधुमेह हा जरी हृदय रोगासारखा सारखा पटकन परिणाम होणारा  रोग नसला तरी तो घातक नाही असं नाही तर स्लो पोयझनिंग आहे. त्याचे परिणाम हळू हळू जाणवत राहतात. हाडे ठिसूळ होणे,किडनीचे आजार, हृदय रोगासारखा आजार या सोबतच डायबेटिक न्युरोपॅथी सारखा आजार सुद्धा मधुमेहामुळे होऊ शकतो. हा डायबेटिक न्युरोपॅथी म्हणजे नेमकं काय? हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये.  

सविस्तर:

डायबेटिक न्युरोपॅथी म्हणजे काय?

·        मधुमेहामुळे (Diabetes) शरीरातील स्नायू आणि नसांवर परिणाम होणे याला डायबेटिक न्युरोपॅथी म्हणतात.

·        दीर्घकाळ रक्तातील शुगरचा स्तर जास्त राहिल्याने शरीरातील लहान नसांवर दबाव येतो, त्या खराब होतात आणि नसा योग्य संदेश पोहचवू शकत नाहीत.

🩺 कारणे (Causes):

1️⃣ दीर्घकाळ उच्च रक्तशर्करा (High Blood Sugar)
2️⃣ रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला असणे
3️⃣ धूम्रपान व मद्यपान
4️⃣ Vitamin B12 ची कमतरता

5️⃣ अधूनमधून शुगर वाढत-घटत राहणे (Fluctuations)⚠️ लक्षणे (Symptoms):

पाय, बोटं, तळपाय, हातामध्ये:

·        झिणझिण्या / सुई टोचल्यासारखं जाणवणे, सुन्नपणा (Numbness), जळजळ किंवा करपल्यासारखं वाटणे, स्पर्शाची संवेदनशक्ती कमी होणे, रात्री लक्षणे वाढणे

काही वेळा:

·        स्नायू कमकुवत होणे, पाय व हातात जखमा होऊन त्या लवकर न भरल्या जाणे

🌿 उपाय आणि उपचार (Treatment & Remedies):

🏥 वैद्यकीय उपचार (Medical):

Blood Sugar नियंत्रणात ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे.
डॉक्टर काही Vitamin B-complex, Alpha Lipoic Acid, Methylcobalamin (Vitamin B12) सारखी औषधे देतात ज्याने नसांना पोषण मिळते.
वेदना कमी करण्यासाठी Painkillers किंवा Neuropathic medicines दिल्या जाऊ शकतात.

🌿 नैसर्गिक उपाय (Home Remedies):

1. पाय व हातांची मालिश
खोबरेल तेल, अलसीच्या तेलाने रोज मालिश करा.
2. मेथी दाणे
मेथी पावडर कोमट पाण्यात घेणे (रक्तातील साखर कमी ठेवण्यासाठी मदत).
3. हळद-दूध
हळद Natural anti-inflammatory आहे.
4. Vitamin B12 युक्त आहार
दूध, पनीर, अंडी, भाजीपाल्यांमधून मिळवा.

🧘‍♂️ व्यायाम (Exercise):

हलक्या चालणे (Walking) – रोज 30 मिनिटे
पाय व हातांना हलके स्ट्रेचिंग
योग: पवनमुक्तासन, भुजंगासन, त्रिकोणासन

 महत्वाचे टिप्स:

रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा (FBS 80-110 mg/dl, PPBS < 140 mg/dl).

दर 6 महिन्यांनी पायांची आणि डोळ्यांची तपासणी करा.

पायात दुखत असताना उष्णता किंवा बर्फ थेट लावू नका.

सिगारेट आणि दारू टाळा.

समारोप:

डायबेटिक न्युरोपॅथीमुळे,पाय सुन्न होणे (Numbness), झिणझिण्या किंवा सुई टोचल्यासारखं वाटणे,जळजळ, करपल्यासारखं किंवा उष्णता जाणवणेपाय बधीर होणे, स्पर्श कमी जाणवणे, चालताना पाय हलके दुखणे किंवा जडसर वाटणे पायात जखमा झाल्या तर त्या भरायला जास्त वेळ लागणे,हात सुन्न होणे, झिणझिण्या येणे,बारीक काम करताना बोटांना पकड न लागणे, जळजळ किंवा वीजेचा शॉक बसल्यासारखं जाणवणे,झोपेत पाय दुखणे किंवा जळजळणे,चक्कर येणे किंवा अस्थिरपणा वाटणे (नसा आणि रक्ताभिसरणामुळे) स्नायू कमकुवत होणे पाय/हात थंड होणे. असे त्रास जाणवू लागतात म्हणून वेळीच काळजी घेतल्यास हे त्रास कमी करता येतात.    

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. आरोग्यासाठी उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...